Skip to main content

मिपा रंगभूषा मंडळ

लेखक सरपंच यांनी बुधवार, 02/03/2016 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, मिसळपाव.कॉम वर येणार्‍या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय. आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील. यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा. - सरपंच

वाचने 31832
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

हाबिणंदन अभ्या भौ

रंगभूषा मंडळाची कल्पना छान आहे. अभ्या व मंडळातील सहकार्‍यांना शुभेच्छा! स्वाती

फोटोशॉप हे एक म्हटले तर सोपे पण व्यावसायिक सफाई साठी अवघड साधन आहे. यात मुख्यत्वाने जे काम होते त्यासाठी इथे एक सहकारी चळवळ निर्मायची असल्यास( व पर्यायाने अभ्या वरील ताण कमी करायचा असल्यास ) तर खालील प्रमाणे ज्ञान दान होणे गरजेचे आहे. १. बिटमॅप व व्हेक्टर इमेजमधील फरक कळणे. २. हयु ,सॅचुरेशन व लाईटनेस मधील फरक कळणे. ३.आर जी बी व सी एम वाय के या कलर मॉडेल मधील फरक कळणे. ४.पेन टूल वापरून रेखाटन करता येणे. ५.पाथ ही संकल्पना समजणे. ६.ब्रश व पेंट मोडस , ब्रश डायानामिक्स समजणे. ७. अत्यंत उपयुक्त अशी लेअर व इरेझर की कल्पना समजणे. ८. ग्रेडिअन्ट, पॅटर्न व स्टाईल यांचे सामर्थ्य ओळखणे. ९. कलर बॅलन्स ने चित्र दुरुस्त करता येणे. १०.फिल्टर वापरून मूळ फोटोला कॅन्व्हास हाफटोन पोस्टर अशी चित्रशैली लावून देता येणे. या केवळ वानगीदाखल गोष्टी आहेत. पण एवढे बेसिक आले की मग नन्तर. स्काय इज द लिमिट . आता परिणाम पातळीवर काय करता येऊ शकते हे पाहू. १. चित्रातील रंग घालवून चित्र कृश्णधवल, सेपिया, द्विरंगी करता येणे .चित्र मोठे करता येणे ( मर्यादेत) लहान करता येणे. २. चित्रात फोरग्राउन्ड व बॅकग्राउन्ड निर्मिती करता येऊन त्यात हवी तशी पारदर्शकता निर्माण करता येते.( लेअरचा वापर) ३. टाईप टूल वापरून त्यात लेअर स्टाईल नावाचे टूल मिसळून अचाट लेटरिंग करता येतात. उदा निऑन साईन इफेक्ट. ४. ब्रश डायनामिक वापरून फुलांचा रम्गीबेरंगी सडाच पाडता येतो. ५. पाथ वापरून फुलांच्या पानांच्या माळा, पाना भोवतालची रांगोळी , पैठणीचे काठ , बुट्या काय वाटेल ते करता येते. ६. एखाद्या चित्रातील एखादीच गोष्ट गायब करता येते. व नसलेली आणताही येते. ७.आपल्याला आपली स्वतंत्र पेन्टीग बनविता येतात.

ही घोषणा थोडीशी उशीराच पाहिली . वाचल्यावर अतिशय आनंद झाला. मिपा मालकांनी अभ्या ची केलेली निवड एकदम सार्थ आहे. त्याचे काम आपण सगळे जण मागची काही वर्षे पहात आहोत. आता या घोषाने मुळे इतके दिवस पडद्या आडून चाललेल्या कामाला आता एक अधिकृत मान्यता मिळाली. अभ्या सारखे मनस्वी कलावंत मिपावर आहेत म्हणुनच मिपा वर आवर्जून यावेसे वाटते. मिपा परिवार असाच वाढत राहो ही सदिच्छा. पैजारबुवा,