पप्पा इन्टॉलरंस म्हणजे काय हो ? माध्यमात सुरु असलेली चर्चा ऐकून माझ्या मुलाचा मला प्रश्न. अरे इन्टॉलरंस म्हणजे असहिष्णुता..पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखकांच्या मते देशात सध्या जे वातावरण आहे त्याला म्हणतात असहिष्णुता ....मी उत्तर दिले. पप्पा, मी तुम्हाला अवघड नाही तर सोपं करण्यासाठी प्रश्न विचारला आहे. बर सांगतो सोपं करून.
आता हे बघ.. देशावर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना तुरुंगात बिर्याणी ऐवजी वरणभात खाऊ घातला तर ती झाली असहिष्णुता आणि त्याने कितीही जीव घेतले आणि फासावर गेला तरी त्याचा जयजयकार करणा-यांना आपण सहन करतो हि झाली आपली सहिष्णुता.
पप्पा...तुम्ही जे काही सांगताय ते काही लक्षात येत नाही. थांब अजून सोपं करून सांगतो.
अरे..श्रीमंताच्या ( हिंदीत अमीर )कानात त्याची बायको रात्री जे कुजबुजते ती असते असहिष्णुता आणि त्याने हे जगजाहीर करून कितीही वाद केला तरी सरकार त्याला आपल्या उपक्रमात सहभागी करून घेते हि झाली सहिष्णुता.
मम्मी भाजी विकत घेताना त्या गरीब कष्टकरी शेतक-यांशी घासाघीस करते ती झाली असहिष्णुता आणि दररोज पहाटे उठून तुझ्यासाठी केलेली भाजी तू न संपवता डब्यात परत आणतो म्हणून ती जे सहन करते हि झाली तिची सहिष्णुता.
आता समजलं ?..हे विचारताच मुलगा म्हणाला..पप्पा...तुम्ही खूप सहिष्णु....त्याच हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. पुरस्कार वापसी वाल्या लेखकांचा सरकारला जसा अडचणीत आणण्याचा हेतू होता तसाच मलाही हा प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा मुलाचा हेतू माझ्या लक्षात आला होता. सहिष्णुता-असहिष्णुता काही नाही इथे...चल अभ्यास कर आपला असं म्हणून मी विषय संपवला.
वाचने
3836
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओक्के.
"असहिष्णुता आहे" असं खुलेआम
"असहिष्णुता आहे" असं खुलेआम बोलू शकण हेच मुळात "सहिष्णुतेचे" उदा
In reply to "असहिष्णुता आहे" असं खुलेआम by उगा काहितरीच
आपल्याला न आवडणाय्रा गोष्टी
न संपणारे राजकीय धागे
अहं
In reply to न संपणारे राजकीय धागे by कपिलमुनी
Freedom of expression
नितीनचंद्र आपले म्हणणे
In reply to Freedom of expression by नितीनचंद्र
धागा लेखास =))
ताजी बातमी
१-२ राउंडस्
In reply to ताजी बातमी by तिमा
१-२ राउंडस् नदीपलिकडे फायर
दुर्दैवाने सैन्याकडून एक जरी
In reply to १-२ राउंडस् नदीपलिकडे फायर by होबासराव
Armed Forces (Special Powers) Act (AFSPA)
In reply to दुर्दैवाने सैन्याकडून एक जरी by सुबोध खरे
माहितगार
विरोधी पक्षाचा उत्कर्ष सहन
असहिष्णुतेचा पोकळ नारा