प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच.
सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही.
१. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.
२. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात.
३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा.
४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला.
५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला.
६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले.
८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली.
९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात.
१०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.
वाचने
32188
प्रतिक्रिया
200
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे! एवढं सगळं घडलं?
In reply to काय आहे की मी तुमच्यासारखा by तर्राट जोकर
रे भाइ केहना क्या चाहते हो?
In reply to बापरे! एवढं सगळं घडलं? by बोका-ए-आझम
का तो "दलित" असला तरी विश्व
In reply to रे भाइ केहना क्या चाहते हो? by तर्राट जोकर
ओक्के. तो माहूर का कोण दलित
In reply to का तो "दलित" असला तरी विश्व by सुबोध खरे
असं जर त्याचं विच्छेदन केलं
In reply to ओक्के. तो माहूर का कोण दलित by तर्राट जोकर
म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला
In reply to असं जर त्याचं विच्छेदन केलं by सुबोध खरे
रोहित च्या प्रकारणा बद्दल
In reply to म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला by तर्राट जोकर
सोयीचे तेवढे बघावे, इतर ते
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
ह्या… हे पत्र काय कामाचं
In reply to सोयीचे तेवढे बघावे, इतर ते by तर्राट जोकर
जर आपण मानस शास्त्राचा अभ्यास
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
तुमच्या हिशेबाप्रमाणे सीताराम
In reply to जर आपण मानस शास्त्राचा अभ्यास by सुबोध खरे
डोळे भरुन आले
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
परवा ला चेन्नई ला एका मेडिकल
In reply to असं जर त्याचं विच्छेदन केलं by सुबोध खरे
जाऊ द्या. बंडारू दत्तात्रय
In reply to परवा ला चेन्नई ला एका मेडिकल by श्री गावसेना प्रमुख
तुम्हाला अभाविप च्या मदतीला
In reply to जाऊ द्या. बंडारू दत्तात्रय by तर्राट जोकर
कहना ये चाहता हूं मेरे जोकर
In reply to रे भाइ केहना क्या चाहते हो? by तर्राट जोकर
कैसा है ना बोकाभाऊ, आपल्याला
In reply to कहना ये चाहता हूं मेरे जोकर by बोका-ए-आझम
अजिबात नाही तजो
In reply to कैसा है ना बोकाभाऊ, आपल्याला by तर्राट जोकर
एक्सप्रेसच नव्हे तर
In reply to अजिबात नाही तजो by बोका-ए-आझम
तात्कालिक फायद्यासाठी वर्तमानपत्रे
In reply to एक्सप्रेसच नव्हे तर by नाना स्कॉच
जो स्टँड घेऊन तुम्ही हे सगळे
In reply to अजिबात नाही तजो by बोका-ए-आझम
मला एक कळत नाही
In reply to जो स्टँड घेऊन तुम्ही हे सगळे by तर्राट जोकर
तुम्ही कोणत्याही पक्षाची बाजू
In reply to मला एक कळत नाही by बोका-ए-आझम
+१
In reply to तुम्ही कोणत्याही पक्षाची बाजू by तर्राट जोकर
व्हाटअबाउटरी
In reply to तुम्ही कोणत्याही पक्षाची बाजू by तर्राट जोकर
भारतीय राज्य घटने मध्ये कलम
In reply to व्हाटअबाउटरी by सुनील
अहो, कलमं कुठं घुसडताय मध्येच
In reply to भारतीय राज्य घटने मध्ये कलम by सुबोध खरे
तसेच येथे परत वाचायला मिळणार
In reply to अहो, कलमं कुठं घुसडताय मध्येच by तर्राट जोकर
आ बैल मुझे मार करायचंच कशाला.
In reply to तसेच येथे परत वाचायला मिळणार by सुबोध खरे
कलम ignore करा. त्याचा matter बघा.
In reply to अहो, कलमं कुठं घुसडताय मध्येच by तर्राट जोकर
कलम इग्नोर मारलं. कन्टेन्ट
In reply to कलम ignore करा. त्याचा matter बघा. by बोका-ए-आझम
एका सरकारने जर चुका केल्या असतील तर
In reply to कलम इग्नोर मारलं. कन्टेन्ट by तर्राट जोकर
बोकाशेठ, आपलं ह्यावर आधीच
In reply to एका सरकारने जर चुका केल्या असतील तर by बोका-ए-आझम
ओके.
In reply to बोकाशेठ, आपलं ह्यावर आधीच by तर्राट जोकर
एक चुकीचा प्रश्न...सेक्युलर
In reply to आता खर्या सेक्युलर ची by प्रकाश घाटपांडे
शब्द बंबाळ आणि गोल लेख आहे
In reply to एक चुकीचा प्रश्न...सेक्युलर by सुबोध खरे
राजीव सान्यांचा लेख
हिंदुत्व ज्याला म्हणतात ते
In reply to राजीव सान्यांचा लेख by गामा पैलवान
हे काय विचारणं झालं !
In reply to हिंदुत्व ज्याला म्हणतात ते by नाना स्कॉच
भगव्यांचे थोबाड फुटले
ब्रिगेडी बंधू धावून आलेले
In reply to भगव्यांचे थोबाड फुटले by दिवाकर देशमुख
आप अपना पिछवाडा संभालो, शायद
In reply to ब्रिगेडी बंधू धावून आलेले by मम्बाजी सर्वज्ञ
भगव्यांचं नाही रे बाळा
In reply to भगव्यांचे थोबाड फुटले by दिवाकर देशमुख
आमचे कड़े देशमुख म्हणजे जो
मुद्दे नसले की भगत लोक पर्सनल
बरोबर.
In reply to मुद्दे नसले की भगत लोक पर्सनल by तर्राट जोकर
.?
जे लोक मुस्लिम धर्माच्या पाई
अरे काय चालवलंय! एकमेकांवर
भगव्यांची थोबाड़ फुटली
अरे रे
कालच अर्थसंकल्प जाहीर केलेला आज पासून "यु टर्न" करायला सुरुवात केली.
बिचारे बहुमताच्या सरकारवर अशी लाचारीची वेळ यावी अत्यंत दुर्दैवी घटना आहे.अब की बार लाचार युटर्न वाली सरकार
अरे बाळा, तुला राजकारण समजत नाहीये.
In reply to अरे रे by दिवाकर देशमुख
बोका ए आझम साहेब गावाचा शिपाई
In reply to अरे बाळा, तुला राजकारण समजत नाहीये. by बोका-ए-आझम
ती बातमी बहुधा अर्धवट आहेhttp
In reply to अरे रे by दिवाकर देशमुख
vs
असो
तेच तर म्हणी राह्यनु इरसाल भो
In reply to असो by इरसाल
बरोब्बर गुरुजी.
200