Skip to main content

कोणता शब्द बरोबर्..."चिटकवले" की "चिकटवले"

लेखक सुहास.
शुक्रवार, 09/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1629
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

इतर किंवा दोन्ही हे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मतदान केले नाही. असो, दोन्ही शब्द वापरात असल्यामुळे चूक किंवा बरोबर हा प्रश्न निर्माणच होत नाही. दोन्ही बरोबर, हेच खरे उत्तर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

असेच म्हणतो. दोन्ही+ पर्याय निवडलेला नाही.

चिकट वरुन चिकटवले त्यामुळे दुसरा पर्याय योग्य वाटतो.

पदार्थ चिटक असेल अथवा माध्यम चिटक असेल तर चिटकवणे बरोबर. पदार्थ चिकट असेल अथवा माध्यम चिकट असेल तर चिकटवणे बरोबर. अर्थ समजला म्हणजे झाले. असा अजून एक पर्याय संभवतो. चिकटले म्हणजे झाले असाही एक पर्याय संभवतो. :) मी चिकटवणे असा शब्द प्रयोग करतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

पदार्थ चिटक असेल अथवा माध्यम चिटक असेल तर चिटकवणे बरोबर. पदार्थ चिकट असेल अथवा माध्यम चिकट असेल तर चिकटवणे बरोबर. =)) मीही चिकटवणे असा शब्द वापरते (म्हणून बरोबर असेलच असं नाही.) अदिती सगळ्या गोष्टी बरोबरच करण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.

(|: हा कौल कशाला घेतला आहे? चिकटवणेच बरोबर आहे. पण "चटईला टाचणी टोचली" किंवा "कच्चा पापड पक्का पापड" म्हणताना जे होते ते होवून चिटकवणे होत असावे.

In reply to by नितिन थत्ते

हा कौल कशाला घेतला आहे? हा एकदम अचूक पर्याय आहे. आमचे मत या पर्यायाला...

In reply to by नितिन थत्ते

हा कौल कशाला घेतला आहे? चिकटवणेच बरोबर आहे. पण "चटईला टाचणी टोचली" किंवा "कच्चा पापड पक्का पापड" म्हणताना जे होते ते होवून चिटकवणे होत असावे.
मी तुमच्या हसमत आहे.

जेंव्हा एखाद्या 'चिकट' पदार्थाच्या मदतीने एक वस्तू दूसर्‍यावस्तूला 'चिकटवली' जाते तेंव्हा 'चिकटवणे' असा शब्द वापरतात. जसे 'पाकीटाला स्टँप चिकटविणे'. 'वहीत कात्रणे चिकटवणे.' 'भिंतीवर पोष्टर चिकटवणे.' पण, 'चिकट' पदार्थाच्या मदतीशीवाय जेंव्हा एखादी गोष्ट 'चिटकवली' जाते तेंव्हा 'चिटकवणे' म्हणतात. जसे, 'एखाद्याला नोकरीस चिटकवणे.' 'दूर सरक. उगीच चिटकून बसू नकोस' (आई आपल्या लहान मुलाला म्हणतेय, हो!) 'उगीच खोटे आरोप त्याच्या नावाला चिटकवू नकोस.' निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

'चिकट' पदार्थाच्या मदतीशीवाय जेंव्हा एखादी गोष्ट 'चिटकवली' जाते तेंव्हा 'चिटकवणे' म्हणतात. काहीतरीच काय. असे काही असेल तर कंजूष माणसाला 'चिटक' म्हणावे लागेल ना.

In reply to by बट्टू

कंजूष माणूस कोणाला चिटकलेला नसतो. इथे त्याच्या 'वृत्ती'ला उद्देशून 'चिकट' (चिकट पदार्थासारखी) असा शब्द वापरला जातो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

पैशाला चिकट असतो. चिटक हा शब्द चुकिचा आहे आणि चिटकलेलाही चुकिचाच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

सारखे चिटकू (!) पाहणार्‍या माणसास 'चिकट माणूस' का म्हणतात? 'चिटक माणूस' का म्हणत नाहीत? - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

त्यांचे आडनाव चिटको. कोंकणी लोकात असते. तुमचा प्रतिसाद माझ्यासारखाच आहे. :)

In reply to by बट्टू

तुमचा प्रतिसाद माझ्यासारखाच आहे. :)
'ग्रेट माइंड्ज़ थिंक अलाइक'... - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

त्याला 'चिकटू' नाही तर 'एक नंबरचा 'चिटकू'' असेच म्हणतात. (निदान माझ्या माहितीत तरी). तसेच सर्वसाधारण पणे 'चिकटू' आणि 'चिटकू' शब्दाबद्दल सर्वांच्याच मनांत संभ्रम असतो. 'चिकटू' शब्द जास्त प्रचलीत असल्याने आपल्या मनातही तोच शब्द बसलेला आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

'चिटक' हा शब्द अस्तित्वात नाही आणि 'चिटकवणे' हे क्रियापदही अस्तित्वात नाही. कुठेतरी ऐकला आहे किंवा लोक वापरतात किंवा मनाला वाटते म्हणून 'चिटक' हा शब्द अस्तित्वात आहे, हे म्हणजे लोक updation हा शब्द वापरतात म्हणून तो अस्तित्वात आहे असा निष्कर्ष काढण्यासारखे आहे.

In reply to by शक्तिमान

हा शब्द मी अनेकांना वापरताना पाहिले आहे. कोणत्या डिक्शनरीत सापडतो ते सांगा. :)

`चिटकवणे' हा अपभ्रंश आहे. चिकट, चिकटवणे, हे मूळ शब्द आहेत.

... हे प्रमाणभाषेतले रूप आहे. चिटकवणे हे बोलीभाषेतले. अर्थात 'चिकटवले'ला मत दिले आहे. :-) - झुरळ मारणारा क्षत्रिय.

नेहेमी 'चिकटवले' असाच शब्द वापरतो. माझासाठी तोच बरोबर वाटल्याने चिकटवले ला मत दिले आहे.

हाच शब्द मूळ असावा. हा मराठी शब्दकोषातला दुवा पहा. त्यात मला 'चिटकवणे' असा शब्द आढळला नाही. कदाचित बोली भाषेत हा बदल झाला असावा. दोन्ही शब्द वापरले जातात पण मी व्यक्तिशः चिकटवणे असा वापरतो त्यामुळे त्यालाच मत दिले आहे. पेठकरकाका, फक्त कागद, स्टँप वगैरे चिकटवायचा असेल तरच चिकटवणे असा शब्द नाही मी (बहुदा पुलंच्या लेखात चूभूदेघे.) वाचले आहे "तो मॅट्रिक झाल्यावर जो पोष्टात चिकटला तो अगदी पाकिटाला लावलेल्या स्टँपासारखा!" चतुरंग

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अत्यानुधिक' हा शब्द देखिल सर्रास वापरला जातो पण बरोबर शब्द 'अत्याधुनिक' असा आहे. तसेच काहीसे असावे.

In reply to by कोलबेर

कोलबेरा, 'अत्यानुधिक' हा शब्द नाही दिसत राव ! पण काय सांगू नका लिहितही असतील. 'दै. संध्यानंदला' दिसतो का असा शब्द ;) अवांतर : तात्या, इथे मिपाकर शब्द चिवडू लागले आहेत. लेख अप्रकाशित करा बरं :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अत्यानुधिक सोयीसुविधा असे लिहिलेले हज्जारदा वाचले आहे. नेमक्या कोणत्या पेपरात ते सांगणे अवघड आहे पण पेपरात छापुन आलेले तेवढेच शुद्ध काय? आम्ही समस्त पेपरांना फाट्यावर मारतो. ;)
अवांतर : तात्या, इथे मिपाकर शब्द चिवडू लागले आहेत. लेख अप्रकाशित करा बरं
बरोब्बर! पण चर्चा सुरु होउन इतके प्रतिसाद आल्यावर नेमेके आमच्याच प्रतिसादावर मास्तरांना आठवण आली :(

In reply to by कोलबेर

अत्यानुधिक सोयीसुविधा असे लिहिलेले हज्जारदा वाचले आहे. नेमक्या कोणत्या पेपरात ते सांगणे अवघड आहे पण पेपरात छापुन आलेले तेवढेच शुद्ध काय? आम्ही समस्त पेपरांना फाट्यावर मारतो.
मीसुध्दा वाचले आहे. मी तुमच्याशी सहमत आहे व डॉक्टरकाकांशीही सहमत आहे. चिवडणे ऐवजी चिडवणेही मी ऐकले आहे. शब्द आता चिडवु लागले आहेत असे म्हणणेही चुक नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणून तो बरोबर आहे हे पटण्यासारखे नाही. "माझ्या घरासमोर अमुकतमुक दुकान आहे" हे इंग्लिशमधे सांगताना "अपोझिट टु माय हाऊस" असा शब्दप्रयोग केलेला आपल्याला सर्रास ऐकू येईल पण तो चूक आहे "अपोझिट माय हाऊस" हेच बरोबर आहे. त्यामुळे चिकटणे हेच बरोबर आहे, चिटकणे सर्रास असले तरी! (आशीर्वाद आणि आर्शिवाद ह्यातही असेच - आर्शिवाद सर्रास दिसतो!) चतुरंग

In reply to by चतुरंग

उत्तर भारतीय देवनागरी लेखनामध्ये रफार अगोदर देणे शिकवले जात असावे. माझ्या एका मारवाडी मित्राला आर्शिवाद चूक आणि आशिर्वाद बरोबर हे पटत नसे. (हा मित्र जन्मापासून महाराष्ट्रात वाढलेला होता, त्याचे वडील पूर्वाश्रमी राजस्थानमध्ये शिक्षक होते आणि त्याला मराठी भाषेत माझ्याइतकीच गती निदान त्यावेळी तरी होती.) उत्तर भारतीय पेंटरने रंगवलेल्या ट्रकमागे "आई तुझा आर्शिवाद" लिहिले जाणे सहज शक्य आहे.

In reply to by चतुरंग

होय वाक्य बरोबर आहे. कदाचीत पुढे जी उपमा दिली आहे आणि त्यातून जो परिणाम अपेक्षित आहे तो अधोरेखित करण्यासाठी 'चिकटला' शब्द वापरला असावा. पण 'तो मॅट्रीक झाल्यावर जो पोष्टात 'चिटकला' तो निवृत्त होई पर्यंत.' असे वाक्य असते तर पुलंनीही (मला वाटते) 'चिटकला' असाच शब्दप्रयोग केला असता. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

चिकट - चिकटवणे हेच बरोबर आहे. चिटकवणे हा चुकीचा शब्द आहे पण तरिही लोक बोलताना वापरतात. जसे आमच्या गावाकडे 'डुलकी लागली' ह्याला लोक 'डुकला लागला' म्हणतात , 'इलाज' ला 'विलाज' म्हणतात तसेच. >>पण, 'चिकट' पदार्थाच्या मदतीशीवाय जेंव्हा एखादी गोष्ट 'चिटकवली' जाते तेंव्हा 'चिटकवणे' म्हणतात. जसे, 'एखाद्याला नोकरीस चिटकवणे.' 'दूर सरक. उगीच चिटकून बसू नकोस' (आई आपल्या लहान मुलाला म्हणतेय, हो!) हे काही पटले नाही बॉ. आम्ही तर 'ह्याला नोकरीला चिकटवला' , 'चिकटून बसू नकोस' असेच म्हणतो .

In reply to by पक्या

जसे आमच्या गावाकडे 'डुलकी लागली' ह्याला लोक 'डुकला लागला' म्हणतात , 'इलाज' ला 'विलाज' म्हणतात तसेच.
बरोबर असे बरेच घोटाळे दिसतात.. उदा. पेट्रोल ला प्रेटोल म्हणताना ऐकले आहे.

आम्ही तर 'ह्याला नोकरीला चिकटवला' , 'चिकटून बसू नकोस' असेच म्हणतो होय. बहुतेक जणं तसेच बोलतात. (मीही कधी कधी बोलतो) पण माझ्या मते इथे 'चिटकवणे' शब्दप्रयोग योग्य आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

तसेच 'बादली' आणि 'बालदी' असाही एक घोळ आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

बादली असे मी म्हणतो. इतर अनेकाना बादलीच म्हणताना ऐकले आहे. पण बालदी असे नाही ऐकले त्याऐवजी बाल्डी असे ऐकले आहे. (चूभूदेघे) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पोर्तुगीज मूळ असलेला हा शब्द पोर्तुगिजात "बाल्दि" असाच वापरतात. आमच्या घरी "बादली" असा वापरतो. काही लोक "बाल्दी" असा वापरतात. वर्णविपर्याय (ध्वनीच्या क्रमाची आदलाबदल) होणे हे भाषांमधील शब्दांत बरेचदा घडते. त्याच्याबद्दल "बरोबर-चूक" वाद भाकड असले तरी फार मजेदार असतात, असे वरील चर्चेतून दिसते.

सुहास, तूसुद्धा अंमळ वेडझवच दिसतोस. अरे कुठलाही शब्द वापर ना! काय फरक पडतो? माझ्या मते दोन्ही शब्द बरोबर! आपला, (भाषातज्ञ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुहासने कुठलाही शब्द वापरावा.

वाईट वाटायला नको कुणा एका शब्दाला

In reply to by जृंभणश्वान

वाईट वाटायला नको कुणा एका शब्दाला चि ट क ट व ले..! हा हा हा, हे एकदम मस्त! :)

In reply to by जृंभणश्वान

चि ट क ट व ले..! जंभृण महाशय मनात ट क ट व ले..! असे म्हणत आहेत व स्वतःची पाठ थोपटवत आहेत अशी आम्हास शंका आहे ;)

चिकट वरुन चिकटवले हाच शब्द बरोबर! चिटकवले हा शब्द अशुद्ध हे! जसे की पिशवी ऐवजी पिवशी वगैरे आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by वेताळ

पेस्टवले चालेल का? आभार: टारझन मित्र मंडळ अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

असेच काही घोळ. नोकरी हा शब्द नौकरी, पारंपरिक हा पारंपारिक, ड्युटी- डिवटी असा सर्रास उच्चारला जातो. आणखी एक शंका. प्रश्न हा शब्द उच्चारताना त्याचा उच्चार साधारणपणे प्रश्ण असा होतो. मग तो लिहिताना प्रश्न असा का लिहिला जात असावा? प्राध्यापक 45 मिनिटात सोपा विषय अवघड करून सांगतो. पत्रकार तेवढ्याच वेळात अवघड विषय सोपा करून सांगतो. (असं आपलं म्हणायचं) (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अहो, मराठीवर बलात्कार करणारे तसे बरेच आहेत. वर ,ती अशुध्द भाषाच बरोबर आणि तुमची पुणेरी चुकीची ,असे सांगणारे महाभागही आहेत! या कलियुगांत हेच अपेक्षित आहे.