औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय.
मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला.
माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच.
ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी.
मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन.
पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.
औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी :
पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत)
गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे.
औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात.
कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे.
अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच.
वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे.
खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे.
औरंगजेबाची कबर आहे.
म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही.
म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल.
जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत.
पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे.
औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे.
खरेदी
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे.
पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी.
गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत.
खादाडगिरी
गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक.
कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव.
उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही.
बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते.
ओमकार पावभाजी क्रांती चौक
लक्ष्मी सँडविच क्रांती चौक
पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते.
पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते.
चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर
मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात.
तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत.
गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान.
गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे.
कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे.
तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही.
मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात.
उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.
जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.
वाचने
40810
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर माहिती!!!!!!!!!!!!
बरीच माहिती आहे तुम्हाला
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.पूर्णानंद अजूनही सुरु आहे का
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.आ कृ वाघमारे प्रशाला. :)
In reply to पूर्णानंद अजूनही सुरु आहे का by बाबा योगिराज
बाब्बो
In reply to आ कृ वाघमारे प्रशाला. :) by आकाश खोत
२००४. तुम्ही कोणत्या वर्षी
In reply to बाब्बो by बाबा योगिराज
1998
In reply to २००४. तुम्ही कोणत्या वर्षी by आकाश खोत
सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P
In reply to 1998 by बाबा योगिराज
;-)
In reply to सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P by आकाश खोत
१९९८ ला ssc आणि नाव काय तर
In reply to ;-) by बाबा योगिराज
नै आजोबा योगीराज "नीट" वाटलं
In reply to १९९८ ला ssc आणि नाव काय तर by सप्तरंगी
seriously? sb मध्ये असताना
In reply to पूर्णानंद अजूनही सुरु आहे का by बाबा योगिराज
सभु?
In reply to seriously? sb मध्ये असताना by सप्तरंगी
सुरु आहे. आणि तीच चव आहे.
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
छान
हे सगळे वाचून एकदा औरंगाबादला
उत्तम माहिती! एक सुचवावसं वाटलं...
अनुमोदन ! रच्याकने या
In reply to उत्तम माहिती! एक सुचवावसं वाटलं... by बहुगुणी
प्रतिसाद हीन वाटला.
In reply to अनुमोदन ! रच्याकने या by उगा काहितरीच
आठवले का काही? ;)
In reply to प्रतिसाद हीन वाटला. by प्रचेतस
:)
In reply to आठवले का काही? ;) by यशोधरा
दोन अक्षरी नावाचं शहर आहेच
In reply to :) by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to दोन अक्षरी नावाचं शहर आहेच by यशोधरा
सॉरी भौ , हघ्या हे टाकायचे
In reply to प्रतिसाद हीन वाटला. by प्रचेतस
नदीपलीकडच्या लोकांनी सूड
In reply to प्रतिसाद हीन वाटला. by प्रचेतस
औरंगाबाद पदमपुरा अग्निशमन
आता एक नकाशाही टाका.
हा घ्या नकाशा
चांगली कल्पना आहे. वेळ मिळेल
In reply to हा घ्या नकाशा by बहुगुणी
माझ्याकडे एमटीडीसीचे
सविस्तर माहितीबद्दल आभार
In reply to माझ्याकडे एमटीडीसीचे by कंजूस
आता जायलाच पाहिजे औरंगाबाद ला
हाॅटेल चंपावती, काळे बंधू
औरंगाबाद,परवा भेटीला येतोय.या
थन्द हवेचे थिकन
:P
In reply to थन्द हवेचे थिकन by वैभव पवार
गुड़ वन
In reply to थन्द हवेचे थिकन by वैभव पवार
वाखु योग्य...
विकांताला औरंगाबाद वारी झाली.
च्यायला, निषेध.
In reply to विकांताला औरंगाबाद वारी झाली. by गणामास्तर
सर तुम्हाला भेटायचं अगदी मनात
In reply to च्यायला, निषेध. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि
In reply to विकांताला औरंगाबाद वारी झाली. by गणामास्तर
अजून काय करायला हवं होतं
In reply to औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि by प्रचेतस
बरंच काही हो :)
In reply to अजून काय करायला हवं होतं by गणामास्तर
औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि
In reply to विकांताला औरंगाबाद वारी झाली. by गणामास्तर
दोन दोन प्रतिसाद कशासाठी.
In reply to औरंगाबादेस जाऊन फक्त (आणि by प्रचेतस
बग असावा
In reply to दोन दोन प्रतिसाद कशासाठी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे