आमची ‘पद्ये’ भाषा (मराठी भाषा दिन २०१६)
आलतडीन जिरें पलतडीन जिरें, कां गो जिऱ्या रुजेना, रुजेना,
मज गायी तुडीवतात, तुडीवतात, कां गो गायांनो तुडीवतात, तुडीवतात,
आमांस राखणा राखेना, राखेना, कां रे राखण्या राखेना, राखेना,
मज शेत पिकेना पिकेना, कां गो शेता पिकेना, पिकेना,
मज पाऊस पडेना, पडेना, कां रे पावसा पडेना, पडेना,
आमचे दिवस आलेच नाही...
‘अशें आमची आई आमां ल्हान असतना म्हणून निजोवीत हती, जाणे मगो?’ मज भाऊ सांगीत हते. भाऊ आपणच कितके जाणटे असणार. त्यांची आई त्यांस हें म्हणून दाखवे म्हणून त्यांस याद हाय हीच मोठी गोष्ट. नाय जाल्यार कोणा इतके खबर हाय आता ‘पद्ये’ भाषेतली गाणी बी..
पण हें खबर नाय म्हणून काय आमां भाषा बलावया येत नाय अशें बी न्हवें हां. आमांस आमच्या भाषेचा बेस बरा अभिमान हाय. आमां आमची भाषा बलावया मातय कमीपणा दिसत नाय. फक्त गोव्यांतलें काय ब्राह्मण बोलता ती आमची ‘पद्ये’ भाषा. आमी तीस मायेन ‘भटी’ अशेय म्हणटात. तीस पद्ये कशा म्हणप म्हटल्यार, पद्यांत बोलतात तशे आमी हेळ काडून बोलतात म्हणून, अशें म्हणटात . पण पयलींच्या काळात अशेच बोलीत हते न्हवें लोक? जुनी मराठी बी बोलतात बघा त्या सिरीयलांनी, आमची तशीच जुनी मराठी म्हणावी पडली. आता ती सिरीयलांतली भाषा तुमांस कृत्रिम कशी दिसत अशेल. पण त्या सिरियली काडप्यांस कोठें खबर हाय ती कशी बोलत हतें ते? आता आमच्याभितरला कोणी भुरगा आमचे अनुनासिक स्वर आणि हेळ काडेनसतना बोल्ला, तर तें आमासंय कृत्रिम दिशेल. पण आमच्या घरांनी आमचीच भाषा बोलतात, म्हणटकच हा प्रश्नच आमच्याफुडें येणार नाय हें माज्यान तुमांस सामके आत्मविश्वासान सांगू येतें.
तर, आमी पद्ये लोक(आमांस आमच्या भाषेच्याच नावान वळखितात) येथें गोव्यांत कधी र्हावया आले, त्याचा अजून निर्णय झाला नाय म्हणटात. पण आमी येथें कितकीशीच शतकां हाय, ह्यात मात्र कायच दुबाव नाय. आमची भाषा बघा, मराठीच ती, पण इतकी वर्षां येथें हाय म्हणटकच तिचेर कोंकणीचे संस्कार हणारच न्हवें. आमी गोव्यांत खूप गावांनी ऱ्र्हायतात. पण प्रत्येक कडची आमची बलावयाची पद्धत वेगळी हां. कोंकणी, कन्नड भाषांचा प्रभाव पडतो न्हवे वेगवेगळ्या कडांनी. पुर्तुगेजांच्या काळांत पुर्तुगेज शब्दय पावले आमच्या भाषेंत. पण आमी भाषा सोडली मात्र नाय. आमच्या घरांनी आमचीच भाषा बलावी म्हणून आमचा सदीच आग्रह असतो. नाय जाल्यार कशी टिकणार आमची भाषा? आमांस जपवयाची हाय. आमांस तिची मातय लज दिसत नाय. भायर गरज पडटे ती कोंकणी, ऑफीसांनी बलावया इंग्लिश आमांस काय बरी येते. मराठी आता सामकी पुणेरी नाय, पण बऱ्यापैकी येतेच आमांसय. मग आमी घरी आमची मायेची भटी बोलवया कशा लजावें? माझे तर सामके स्पष्ट मत हाय की आपली आपली भाषा बलावया कोणेय लजू नये. घरांतली कुकुली भुरगीं आपल्या भाषेत बोलतात तेधवा कितके बरें दिसतें म्हणून जाणे तुमी? घरातल्या खोल्यांस हॉल, किचन आणि हें आणि तें म्हणोवच्यापेक्षा वासरी, रांदपघर, कोठये खोली, न्हाणी अशें शब्द म्हटल्यार घर घर कशें दिसते. आमच्या घरांतली भुरगी कोठे दूर रहावया जातात तेथें त्यांस आमची भाषा बोलपी कोणेय मेळ्यार कितकें बरें दिसते. आता आमची असली गाणीं बी भाउंसारक्या जाणट्यांसच याद हाय. पण हईल तितकी आमची सदी बलावयाची भाषा आमांस जतन करोवची हाय. आजच्या या सामक्या फाष्ट जगांत आपली भाषा सोडून आपले म्हणावे अशें दुसरें हाय काय, तुमीच सांगा बघूया मज..
वाचने
26987
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
नवीच माहिती.छान लेख.
अगदी हेलांसकट ऐकू आली वाचताना
ब$रेंSSS लिहले हाय गो तुवें.
पद्ये आणि भटी
लेख आवडला.
छानच
मस्त लिहीलंय !!
लेख आवडला.
ऑडीओ
सुरेख!
In reply to सुरेख! by पैसा
पद्ये आणि कर्हाडे ह्या
In reply to पद्ये आणि कर्हाडे ह्या by प्रीत-मोहर
क-हाडे?
In reply to क-हाडे? by बोका-ए-आझम
गोव्यात ब्राह्मणांच्या ४
छान !! आवडले.
आवडलं . अजून लिहीत रहा मजा
माझे तर सामके स्पष्ट मत हाय
In reply to माझे तर सामके स्पष्ट मत हाय by बॅटमॅन
लै वेळा +
माहिमला आमच्या नितेवाइकाचे
आमासंय तुमचा लेख सांमकां बरां
In reply to आमासंय तुमचा लेख सांमकां बरां by सूड
आवय्स.. सामकीच कळ्ळी मरे तुज
In reply to आवय्स.. सामकीच कळ्ळी मरे तुज by प्रीत-मोहर
हय तर!! कोकणींसार्खिल्लीच आसा
छान !
छान लिहिलेय.
मस्तच ग! गोड वाटली वाचायला !!
पिशे,गोड भाषा हां.बरेंssss
मस्त आहे भाषा!!!
भाषा छान
ह्या सगळ्या भाषांना आम्ही
लेख आवडला!
मस्त लिवलेस.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
In reply to सर्वांना धन्यवाद. by पिशी अबोली
पिशे हें बघ!!
गोड आहे ही बोली. या आधी कधी
सुरेख
अरे वा पिशा, मस्त लिहिलेस की