Elementary, my dear Watson!
शेरलॉक होल्म्स साठी जरी काही गोष्टी इतक्या elementary असायच्या तरीही माझ्या आयुष्यात मात्र "elementary exam" हि काही इतकी elementary गोष्ट न्हवती. त्या काळी, म्हणजे अस्मादिक जेंव्हा आठवीत होते, तेव्हा आमच्या पालकांना कोणी सांगितला कोणास ठाऊक, कि बुवा elementary आणि Intermediate ह्या २ चित्रकला परीक्षा पास झाल्या कि दाहावीच्या परीक्षेत अर्धा का एक टक्का बोनस मिळतो म्हणे! तसेही, आमची अभ्यासातली एकंदर गती बघता ,आमची drawing च्या क्लास ला रवानगी न झाली तरच नवल! आणि त्या काळी, मी हे करणार नाही, किंवा मला जमणार नाही असे ऐकून घेणारे समजूतदार पालक जन्माला यायचे होते.
तर, माझी elementary आणि त्या नंतर Intermediate ची तयारी सुरु झाली. घरा जवळच एक drawing च्या शिक्षिका होत्या, त्यांच्याकडे दर शनिवार आणि रविवार, दुपारची झोप मोडून मी drawing च्या तासाला जायला लागलो. एकंदरीत माझी आणि चित्रकलेची गट्टी कधी जमलीच नाही (हो उगाच खोटं कशाला बोलू). त्या बाई मात्र दिवस रात्र प्रयत्न करून माझ्या कडून चित्र विचित्र चित्र काढून घेत. पण माझी एकूण प्रगती बघता त्या देखील कधीतरी लाजेकाजेस्तव मला चित्राचं रेखाटन करून देत. ते चित्र मी पेन्सिल ने गिरवून त्यात रंग भारत असे.
हे असं जरा बंर आलेले चित्र घरी दाखवावे तर, "हे तू काढलाय?" असा प्रश्न आणि मग "परत काढून दाखव बघू"! मग मी माझी चित्रकारिता पणाला लावून तेच चित्र पुन्हा काढायचा केविलवाणा प्रयत्न करायचो. (अर्थात तेच चित्र पुन्हा तसंच येणार नाही ह्याची खात्री असून सुद्धा).
आणि शेवटी ती परीक्षा! ३ तासात काढायचे ते still life चित्र! हे still life माझेच life stand still करून टाकायचे! प्रत्येक वर्गात नेहमी तेच चित्र (आता नेहमी ह्याचा अर्थ काही सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेला असेलच, कि आमचा निकाल काय लागायचा ते!)
कुठल्या तरी आगम्य रंगाची एक बदली, त्याच्या शेजारीच एक वेगळ्याच रंगाचा टमरेल, एक टॉवेल त्या बादलीतून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय आणि शेजारी त्या season मध्ये असलेली काही मोजकी फळे, त्यात केळी हि हमखास! उगाच कधीतरी बद्दल म्हणून एखादा ब्रेड आणि त्याचे तीन चार तुकडे मान टाकून पडलेले.
अश्या ह्या नयनरम्य देखाव्याचे आम्ही रेखाटन करायचे, त्यात रंग भरायचे आणि ते भरताना, खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे होणाऱ्या रंगछटा ह्या देखील दाखवायच्या! आता माझी रंगछटा म्हणजे एकीकडे लख सूर्यप्रकाश, तर दुसरीकडे भरून आलेले पावसाळी ढग अशीच दिसायची. एकतर ते चित्र काढताना, कधी टमरेलच बदली एवढे मोठे व्हायचे. केळी आणि सफरचंदांच तर काही विचारूच नका! आजूबाजूचे मात्र, एक डोळा बंद करून पेन्सिलीने मापं घेत ते चित्र रेखाटण्यात दंग असायचे. मला मात्र ते नक्की काय करतायत हे कधीच उमजलं नाही. मी देखील एक दोनदा तसा प्रयत्न करून पाहिला, पण त्यात फार काही यश आल नाही. त्यात परत ते चित्र काढून रंगवे पर्येंत ती पिवळी धम्मक केळी काळी पडून जायची, म्हणजे आली का पुन्हा पंचाईत!
ह्या Elementary च्या परीक्षेने माझी दोन वर्ष खाल्ली! शेवटी एकदाचा "C" grade मध्ये ती परीक्षा मी कशीबशी पास झालो! Intermediate चे एक दोन प्रयत्न करून शेवटी जेव्हा तो अर्धा का एक टक्का रद्दबादल झाला, तेव्हा कुठे माझी सुटका झाली!
So Mr. Holmes, the next time you think its elementary, think twice!
याद्या
4574
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
हाहाहा! शेवटच्या टायपोने
धन्यवाद चुकीची दुरुस्ती केली
In reply to हाहाहा! शेवटच्या टायपोने by एस
:-)
In reply to धन्यवाद चुकीची दुरुस्ती केली by केडी
आमच्याकडे या प्रकाराला ग्रेड
नावाने वाटले एक निघाले वेगळेच
हा हा हा ...
मी लहान असतांना सकाळ वगैरे
आयला, चित्रकला न जमणारे आम्ही एकटेच नाही तर....
Moderators ना एक विनंती
खुसखुशीत मजा आली :)
काय राव, इलिमेंटरीलाच
मस्त लिहिलंय! स्टिल लाईफ,
महाबळेश्वर, दिवेआगार कसं
भलत्याच ठिकाणि पोस्ट झालं वाटलं.
In reply to महाबळेश्वर, दिवेआगार कसं by अर्धवटराव
हे हे हे. मस्तं खुसखुशीत लेख.
हाहाहा!
हाहाहा, लेख मस्त. तुम्ही
हेहे
ऐला!!
मी कोणत्याही चित्रकलेच्या