मागच्या आठवड्यात एका केरळी मित्राकडे जेवायला गेलो होतो. तेव्हा त्याच्या आईने एक प्रकारची चटपटीत कोलंबी केली होती. मला ती प्रचंड आवडली आणि मी एकट्याने १५-१७ कोलंब्या फस्त केल्या. एव्हढे कमी म्हणून कि काय पण दुसर्या दिवशी घरी दोन पौंड आणुन
(रम बरोबर) हादडल्या. त्या कोलंबीची चित्रमय कॄती येथे देत आहे. (चित्रात कोलंब्या कमी दिसतील कारण मिपासाठी पुन्हा खास फोटोसेशन करण्यात आले.
(बाकीच्या कोलंब्या मी हादडल्या) )
साहित्य :
कोळंबी - अर्धा किलो (शक्यतो खार्या पाण्यातील पांढर्या कोलंब्या मिळतात, त्या वापराव्या)
मीठ - १ चमचा
लाल तिखट - २-३ चमचा (किती तिखट हव्या आहेत त्यावर)
हळद - चिमुटभर
तेल - ३ चमचे
कृती :
साधारणतः अर्धा किलो कोलंबी निट धुवून घ्यावी.
कोळंबी व्यवस्थीत साफ करुन घ्यावी. साफ करताना त्यातील मधला धागा काढ्ण्याची काळजी घ्यावी.
त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट निट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे.
त्यानंतर एक मोठा तवा मंद आचेवर ठेवावा. त्यात तेल टाकून तेल गरम झाल्यावर कोलंबी निट पसरून ठेवावी आणि मंद आचेवरच १०-१२ मिनिटे होवू द्यावी.
त्यानंतर एका बाजुने खरपुस भाजुन झाल्यावर चिमट्याने दुसरी बाजु पलटावी आणि परत १०-१२ मिनिटे खरपूस भाजावी.
दोन्हीकडुन भाजुन झाल्यावर डिश मध्ये काढुन सजवावी.
ही आहे सजवलेली चट्पटीत कोळंबी...
मस्त
प्रॉब्लेम
मस्त साधी पध्दत आहे
वारलो..!
In reply to वारलो..! by विसोबा खेचर
: )
मे काल
In reply to मे काल by खादाड
खूप वेळ शिजवली का?
हो कदचित !
नव्या म्हणी
कोलंबी
कालच देशी कोलंबी खाल्ली सही
pudhalya velela 4-5 kg aan
हो नक्कीच...