मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवी आहे.

गौतमी · · भटकंती
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. मि. पा. वर नवीन आहे आणि पहिलच लेखन मदत करण्याबाबत करते आहे. मुंबईहून महाबळेश्वर पिकनिक (विरंगुळा) काढायची आहे. तर तसा प्लान बनवायला मदत हवी आहे. तिथे बघण्यासारखी स्थळे काय आहेत.(२८ ला निघुन २ मार्चला परत यायचय) जेजुरी पहायचीही फार इच्छा आहे. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. (कसे जाणे जास्त सोईस्कर असेल? कुठे उतरावे? जवळपासची चांगली हॉटेल्स आणि चांगल जेवण.)

वाचने 3979 वाचनखूण प्रतिक्रिया 7

कंजूस गुरुवार, 02/18/2016 - 16:30
कोयना एक्सप्रेस 11029 जाते जेजुरिला.तीच गाडी पुढे वाठारला थांबते.वाठारहून १८ किमी वाई,अजून १३ किमी पाचगणी,आणि ११ वर महाबळेश्वर.दोन दिवसात अशक्य आहे.तिथे काय झाडाला हात लावून येणार का? मुंबईसेंट्रल महाबळेश्वर बस सहाची डकाव डकाव करत दुपारी दोनला पोहोचेल महाडमार्गे महाबळेश्वरला.खासगी गाड्या (रात्रीच्या) पहाटे साडेचारला नेऊन फेकतात. हॅाटेलवाले सकाळी दहापर्यंतचा फुल्ल चार्ज मारतील.

In reply to by गौतमी

कंजूस गुरुवार, 02/18/2016 - 17:53
टिंगल नाही केली.असं किमी चं अंतर २३० असलं तरी कारनेही बराच वेळ जातो.४६ किमी घाट आणि अरुंद रस्ते.

तुषार काळभोर गुरुवार, 02/18/2016 - 16:56
मुंबईतून महाबळेश्वरला जाण्यायेण्यातच १२-१४ तास जातील ४८ मधले. जेजुरीला गेलात तर मुंबई-बेंगलोर महामार्गापासून जेजुरीला जाताना केतकावळ्याचा बालाजी पाहिला, तर १-२ तास तिथे. जेजुरी महामार्गापासून ३६ किमी, म्हणजे तिथे जाण्यायेण्यात २ तास. जेजुरी गड चढून दर्शन घेणे व उतरणे २ तास. (रविवार असेल तर एखादा तास अतिरिक्त). तरी, तिथे जाऊन करण्यासाठी: जुन्या महाबळेश्वरात महाबळेश्वर मंदीर व पंचगंगा मंदीर जरूर बघा. केट पॉईंट, विल्सन पॉइंट, सनसेट पॉइंट बघा. सह्याद्रीच्या भव्यतेने दीपून जा. संधाकाळी अंधार पडू लागला की मार्केटमध्ये फिरा. मुक्कामाच्या ठिकाणी फक्त झोपण्यासाठी जा. (गर्दी असणारच. त्या गर्दीचा बाऊ न करता, न करवादता, महाबळेश्वराचा आनंद घ्या.) राहण्यासाठी ८०० पासून ३७००० पर्यंत दर असणारी हॉटेल्स आहेत. मी स्वतः दोन वेळा ग्रँड रिसॉर्टमध्ये राहिलो आहे. जास्त न फिरता निवांत वेळ घालवायचा असेल तर मार्केटपासून १ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण चांगले आहे.)

मराठी कथालेखक गुरुवार, 02/18/2016 - 18:07
वेण्णा लेकला बोटिंग वगैरे करु शकता, पाचगणीला टेबल लँड जवळच प्रतापगड बाकी काही पॉईंट्स आहेत वर सांगितलेले , खेरीज नीडल होल पॉईट पण खर सांगायच तर आवर्जुन पहावे असे काही पॉइंटस नाहियेत. वेळ मिळेल तसे पहा. सोबत लहान मुले अस्तील तर मॅप्रो गार्ड्नला अगदी आवर्जुन जा. बाकी तिथल्या हवेची मजा अनुभवा. वेण्णा लेकजवळ काही हॉटेल्स आहेत तिथे राहिलात तर निसर्गाचा मस्त आनंद मिळेल. पण ते महाबळेश्वर शहरापासून दूर आहे. माझ्या माहितीप्रमाणे राजेश हे महाबळेश्वरचे सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे. (मी तिथे कधी राहिलो नाहि) तिथल्या रेस्टॉरंट्स मध्ये मक्याची टिक्की वा पॅटिस हा पदार्थ बराच चालतो. तो आवर्जुन चाखावा.