प्रदिपशेटने म्हटल्याप्रमाणे 'प॑चम' हा एव्हढा प्रच॑ड विषय आहे की त्यावर एक महाकाव्य लिहिता येईल!
सहमत आहे!
दाढेसाहेब, छोटेखानी प्रकटन आवडले. पंचमदांना सलाम..!
तात्या.
प्रदिपशेटने म्हटल्याप्रमाणे 'प॑चम' हा एव्हढा प्रच॑ड विषय आहे की त्यावर एक महाकाव्य लिहिता येईल!
सहमत आहे!
अरे, मग लिही की !!
वाट पाहतो आहे.
बाकीबाब ने गांधींवर महाकाव्य लिहायला सुरुवात केली होती, असे ऐकिवात आहे. तू पंचमसारख्या क्रांतिकारकांवर लिही ! (तुझे पूर्ण झाले की मी मग हिमेशवर लिहायला घेतो, कसे ?) ;-)
-- सर्किट
पचंमदा म्हणजे संगीताचा राजा. त्यांची बहुतेक गाणी मी संगणक आणि मोबाईलवर ऍकत असतो. कुठलेही गाणे घ्या कितिही ऐकले तरी कंटाळा येत नाही. आनंद आश्रम मधले "सारा प्यार तुम्हारा" घ्या १९४२ लव्स्टोरी मधले "कुच ना कहो" घ्या. मेलडी ठासुन भरलेली.
मला सगळ्यात आवडते ते त्यांच्या सर्व गाण्यातले दोन कडव्यामधले संगीत.. :)
--(पंचमदांचा पंखा) दिपक
ठेका/रिदम ही त्यांची एक विशेष खासियत होती. मुखड्यात गाणं कुठं उचलायचं ह्याचा इतका अचूक अंदाज फारच थोड्या लोकांना असावा.
अजनबी मधलं "एक अजनबी हसीना से" ऐका किंवा आंधीमधलं "तुम आ गये हो" घ्या. रिदम अशा ठिकाणी सुरु होतो आणि थांबतो की आपण त्या गाण्याबरोबर हेलकावत जात रहातो संमोहित झाल्यासारखे. त्यातून सुटका नाही!
चतुरंग
'तुम आ गये हो' ऑफ बीट उचललेलं आहे, म्हणून तसं वाटतं. आरडी हे ऑफ बीट (म्हणजे अक्षरशः) गाण्यांचे बादशहा आहेत. ४ बाय ४ टाईप मधे एवढं काही करता येऊ शकतं ह्याची कल्पनाच करता येत नाही....
पंचम दा ग्रेट यात वादच नाहि..प्रतिभावान संगितकार सचिन दा चा मुलगा..ह्याने प्रथम आपले करिअर वडिला कडेच चालु केले..देवानंदच्या ज्वेल थिफ ला त्याला तनुजावर एक गाणे तयार करण्यास परवांगी मिळाली..."रात अकेली है..बुझ गये दिये" हे गाणे त्याने स्वतंत्र पणे कंपोज केले..पंचम म्हणजे एक चमत्कार होता..त्याला अभिनेता मेहमुद ने संधि दिलि अन त्याने मेहमुद च्या विश्वासाचे चिज केले..आणि मग मागे वळुन बघणेच नाहि...मेहमुद/राजेश खन्ना/देव आनंद यांच्या साठी केलेल्या सिनेमाचे व एकुण सारे संगीतच अप्रतिम आहे..मदन मोहन व सी रामचंद्र यांच्या संगीत बध्ध केलेल्या गाण्याना जसा लता दिदि शिवाय कुणीच न्याय देवु शकत नाहि तसेच पंचम व अशा ताईंचे रसायन होते..दोघांचे कॉम्बिनेशन ग्रेट होते..पंचम दाला भाव पुर्ण अदरांजली
प्रतिक्रिया
प्रदिपशेट
अरे, मग लिही की !!
चला
धन्यवाद
वाह !
इथुन
पंचमदा हे संगीतातला चमत्कार होते!
'तुम आ गये
दिल हाय मेरा दिल्.....कन्यादान
पंचम दा