Skip to main content

(महवांची गाळ फुले)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 16/02/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवी वा. रा. कांत ह्यांची क्षमा मागूनच >> महवांची गाळ फुले अजुनि पिंपड्यात चोरपावली पळशी काय तू वनात? आले ते जोमात तीन शुंभ पोलिसाचे ओल्या रानात खुले दार गाळपाचे मनकवडा मग पळतो दूर डोंगरात ती जागा, ती भट्टी नारळिच्या खाली पूर्ण तोच लगबग मी मग करतो खाली रिमझिमते अमृत 'तो' विकल मंडईत हातांत लोहाचे बंध गुंफताना सगळ्यांना स्वच्छ कळे मिळुनि मोजताना कमलापरी मिटति दिवस उमलुनी सळ्यात तू गेलास सोडुनि तो माळ, सर्व अड्डे तडफडणे 'स्वामींचे' फक्त उरे खड्डे सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ? -- स्वामी संकेतानंद
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1922
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

स्वालीड म्हणजे स्वालिडच माळ उडवली आहे बगळ्यांची काय ते एकएक पहिल्या धारेचे शब्द, एकदम कडक आणि पिव्वर माल चाखायला मिळाला बर्याच दिवसांनी पैजारबुवा,