आता कुठे ...... ?
आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा तू द्यायला निघालीस
पण आता तर तुझ्या खर्या परीक्षांना सुरवात होणार
अशा अजून खूप सुखदु:खाच्या परीक्षा तू देणार आहेस
आकाशाच्या सरोवरात फुलणारे जीवन तुला उजळायचे आहे
त्यासाठी तुला स्वत:लाच दीप व्हायचे आहे
आणि इतरांना ज्ञानाचा प्रकाश द्यायचा आहे..
जीवनातल्या ह्या खडतर प्रवासात
तुला रक्ताळलेल्या पायांनी चालायचंय
आणि सुखाला मागे सारून , दु:खाला कवटाळायचंय
शिक्षणाने शिकवलं, तुला दुसर्यासाठी झिजणं
पण त्यासाठी विसरू नको स्वत:साठी फुलणं
दुनियेच्या शाळेत, व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यावर्
गुंफत रहा मायेची वीण..
जीवनाच्या सप्तपदीतून अनुभवाचे गीत तुला गायचे आहे
अन धरतीच्या कागदावर, समुद्राच्या शाईने
आभाळाएवढ्या मनाने भारताचे नाव लिहायचे आहे
शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब तुला उजळायचा आहे
त्यासाठी प्रत्येक फुलाला फुलण्याचा अधिकार तुला द्यायचा आहे
आजच्या स्पर्धेच्या युगात आयुष्याचे गीत मधुरतेने होण्यास
अभ्यासाच्या सुरात , ज्ञानाच्या तलत अनुभवाच्या बोलात
मधुर शब्दांत जीवनाचे गीत तुला गायचे आहे..
पूर्वी अंधाराला तुझे छोटे डोळे घाबरत होते
पण याच डोळ्यांनी तुला सार्यांना प्रकाश दाखवायचा आहे
चिमणीसारख्या चिवचिवलेल्या धरतीच्या प्रांगणात कधी काळी
इवलिशी पावलं टाकत तू आली होतीस
पण याच धरतीच्या प्रांगणात उद्या तुला ताठ मानेने
आदर्श पावले टाकीत यायचे आहे..
लक्षात ठेव -
अंधाराला घाबरणे सोपे असते
पण दिवा लावणे खूप अवघड असते
म्हणून सांगतो , फूल म्हणून जगताना
माती बनून दुसऱ्यांना सुगंध द्यायला विसरू नको
स्पर्धेच्या ह्या युगात प्रवेश करण्याआधी ,
जाता-जाता पित्यासारख्या शिक्षकाचे एवढे लक्षात ठेव
विद्यादानासारखे पवित्र दान आम्ही केले,
त्याचे चीज तुला करून दाखवायचे आहे
अन् सार्या संकटाना तोंड देऊन ,
यशाचे शिखर तुला गाठायचे आहे
आणि सुखदु:खाच्या या विशाल जीवनात
यशस्वी तुला व्हायचं आहे
शाळेत नववीत असताना ही कविता केली होती.
-- क्षितीजा
शब्द मनीचे फुललेल्या कळीचे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5105
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>शिक्षकांच
हो
In reply to >>शिक्षकांच by सखाराम_गटणे™
थोडी सुधारणा...
पण एवढ्या
In reply to थोडी सुधारणा... by आपला अभिजित
सहमत....
In reply to थोडी सुधारणा... by आपला अभिजित
चुका
सुंदर
In reply to चुका by क्षितीजा
तात्यासाह
In reply to सुंदर by विसोबा खेचर
शुद्धलेखनाचे फॅड...
In reply to सुंदर by विसोबा खेचर
अर्थात हल्ली काही सांगता येत नाही म्हणा!
In reply to शुद्धलेखनाचे फॅड... by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद!
In reply to चुका by क्षितीजा
आपण
In reply to धन्यवाद! by आपला अभिजित
कविता खुप
सुंदर कविता!!
अनिलजी आणि