उन्हाळा आणि भटकंती... हे समीकरण अनेकांना ऑड वाटते, पण मित्रांनो उन्हाळ्यातही तुम्ही अगदी मनसोक्त भटकंती करू शकता उन्हाळा हा भटकंतीसाठी तसा खडतरच ऋतू म्हणायला हरकत नाही. पण हाडाच्या ट्रेकर्सना दुर्गभ्रमंती करण्यासाठी खरं तर कुठलीही वेळ आणि ऋतू आडवा येत नसतो.पाठीवर सॅक अडकवून द-या-खो-यांत, डोंगर शिखरावर, गड-किल्ल्यांवर, रानावनात, अभयारण्ये-जंगलात आपला आनंद शोधत फिरत असतात. यासाठी या भटक्यांना कोणतीही काळवेळ आडवी येत नाही. अमावस्येची काळी गडद छाया पांघरलेली रात्र असो वा पौर्णिमेचं पिठुर चांदणं अस पण डोक्यावर रखरखतं ऊन, अंगाची होणारी लाही-लाही, गडकिल्ल्यांवर असणारं पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे बरेच भटके या ऋतूत गडकिल्ल्यांपासून काहीसे दूरच राहतात पण माझ्यासारखे काही जण चांदण्या रात्रीतले छोटे-छोटे ट्रेक आखून या दिवसातही ट्रेकिंग चा आनंद लुटत असतात. तसा या उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास टाळण्यासाठी मस्त "मूनलाइट ट्रेक' करता येतो, रात्रीच्या या ट्रेक्सचीही एक वेगळीच मजा आहे. फक्त यावेळी निशाचरांपासून सांभाळून राहावं लागतं. गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडलेल्या कोणत्याही भटक्याची भटकंतीची इच्छा ती कुठल्याही ऋतूतली, अपुरी राहणारच नाही असा हा सारा सह्याद्रीचा आसमंत आहे. म्हणूनच सह्याद्रीच्या अरण्यात लपलेले काही वनदुर्ग आपल्याला ऐन उन्हाळी वातावरणातदेखील वेगळाच थरारक अनुभव देऊन जातात.
नाइट ट्रेकची मजा म्हणजे जणू मूनलाइट सफरच. शांत-निवांत वेळ, गूढरम्य वातावरण, दोस्त मंडळींची सोबत अन् आपले आवडते ठिकाण, यापेक्षा बेस्ट आणखी काय असू शकते? खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा दोस्त सोबत असेल तर रात्रीच्या आकाश आणि ताऱ्यांच्या स्थितीची माहितीही तुम्हाला मिळून जाते. इतिहासातला एकच विषय घेऊन रंगणाऱ्या गप्पांमध्ये केव्हा पहाटेचा गारवा जाणवू लागतो, ते लक्षातच येत नाही. पहाटेचा सूर्योदय त्या ठिकाणाहून पाहण्याचा आनंदही आगळाच. या गप्पांतूनच तुम्हाला खूप काही नवी माहिती मिळते अन् तुमच्या जाणिवा प्रगल्भ होत जातात. मित्रांनो, निसर्ग नेहमीच तुम्हाला शिकवत असतो. प्रत्येक पानाफुलातून, कीटकांच्या हालचालींतून, दिवस-रात्रीच्या चक्रातून अन् अशा अनेक प्रकारांतून तो आपल्याशी बोलत असतो. तेव्हा त्याच्याशी संवादाची संधी दवडू नका.मग चला अशाच आपणही निरार्गाशी संवाद सादुयात "लेटस चॅट विथ हिम''.
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा व्वा!
मस्त
मस्तच
नक्की
In reply to मस्तच by स्वच्छंदी_मनोज
वा वा
प्रबळगड व कलावंतिणी मुनलाईट ट्रेक
In reply to वा वा by राजेंद्र मेहेंदळे
छान
काय अनुभव आला ते पण सांगा...
In reply to छान by स्वच्छंदी_मनोज
साप आणी बिबट्या
In reply to काय अनुभव आला ते पण सांगा... by जिन्क्स
हो नक्की रानडुक्करा पासून मी
In reply to साप आणी बिबट्या by स्वच्छंदी_मनोज
यालासुध्धा काळजी न घेणे
In reply to साप आणी बिबट्या by स्वच्छंदी_मनोज
मस्त अनुभव. अशाच थरारक
In reply to साप आणी बिबट्या by स्वच्छंदी_मनोज
नक्की
In reply to काय अनुभव आला ते पण सांगा... by जिन्क्स
बरोबर
In reply to छान by स्वच्छंदी_मनोज
बरोबर आहे तुमच प्रबळगडावर वन्य श्वापदाचे वास्तव्य आहे अस एकले आहे आणि सापांसाठीही हा प्रसिद्ध आहे पण मी गेले ४ वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करतो आहे त्यामुळे सापांबद्दल थोडीअधिक माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त भीती नाहीये पण वन्य श्वापदाचे थोडे भय आहेच.
सर्पमित्र असाल तरी उगाच दिसला
सहमत. हे साप हातात घ्यायच फॅड
In reply to सर्पमित्र असाल तरी उगाच दिसला by अजया
त्यांना त्या दर्जाच्या
In reply to सहमत. हे साप हातात घ्यायच फॅड by जिन्क्स
सहमत
In reply to त्यांना त्या दर्जाच्या by उगा काहितरीच
अगदी बरोबर आहे तुमच
In reply to सर्पमित्र असाल तरी उगाच दिसला by अजया
अरेवा..
मूनलाईट ट्रेक म्हणजे
क्या बात!
In reply to मूनलाईट ट्रेक म्हणजे by प्रचेतस
व्वाह क्या बात..
In reply to मूनलाईट ट्रेक म्हणजे by प्रचेतस
नाणेघाट, सुधागड आणि रायगड
In reply to व्वाह क्या बात.. by स्वच्छंदी_मनोज
रायगडावर ...
In reply to नाणेघाट, सुधागड आणि रायगड by प्रचेतस
अगदी अगदी. कधीमधी गावात सप्ता
In reply to रायगडावर ... by स्वच्छंदी_मनोज
निरामय शांतता; वल्ली
In reply to अगदी अगदी. कधीमधी गावात सप्ता by प्रचेतस
सुरेख
In reply to निरामय शांतता; वल्ली by वेल्लाभट
चला!! कधी ठरवताय मग?
In reply to मूनलाईट ट्रेक म्हणजे by प्रचेतस
राजमाची बहुधा लवकरच.
In reply to चला!! कधी ठरवताय मग? by राजेंद्र मेहेंदळे
अम्हाला
In reply to राजमाची बहुधा लवकरच. by प्रचेतस
मीही केलाय हा. आम्ही चौघे
In reply to मूनलाईट ट्रेक म्हणजे by प्रचेतस
सर...
In reply to मूनलाईट ट्रेक म्हणजे by प्रचेतस
राजमाची
वा!
सुरेख धागा!