विज्ञान लेखमाला समारोप
नमस्कार मंडळी,
शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमालादेखील मिपाच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेखदेखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला.
तसं म्हटलं, तर विज्ञान हा एक किचकट, बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलीकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगताइतक्या, या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते. लांबून बघणार्या निरीक्षकाला त्या हत्तीची कधी शेपटी, कधी सोंड तेवढी अधूनमधून दिसणार. पण या लेखमालेच्या निमित्ताने अनेक लेखकांनी वेळ काढून अतिशय अभ्यासपूर्ण लेख सादर केले. त्यांची विषयाची निवड, त्यातला सखोल अभ्यास, जिज्ञासू नजर यांनी तो हत्ती आपल्यासमोर साकार केला. कक्षेपलीकडचं हे विज्ञान आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे. येता-जाता वापरात असणारं उद्वाहन (लिफ्ट) असो किंवा गुन्हे अन्वेषण विभागातलं डिजिटल फोरेन्सिक असो किंवा सरहद्दीवर आपल्या संरक्षणासाठी उभे ठाकलेल्या सक्षम सेनेची शक्ती असो.. अनेक रूपांनी, अनेकविध अंगांनी हा विज्ञान बटू आपलं विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे. या सर्वच विषयांवर आणि कल्पनाही नव्हती अशा प्राण्यांचं वागणूकशास्त्र, स्पायडरगोट, पाण्याचं संवर्धन अशा पैलूंवरदेखील या लेखकांनी प्रकाश टाकला.
बोजड, किचकट ठरू शकणारा एक साहित्यप्रकार अतिशय रंजकरित्या आपल्यासमोर सादर केला गेला. या लेखकांचे आभार न मानता त्यांच्या ॠणातच आम्ही राहू इच्छितो.
आवाहनाचा धागा आल्यापासून मिपाकरांनी नेहमीप्रमाणेच खुल्या मनाने दाद आणि प्रोत्साहन देऊन आमचा आणि सहभागी लेखकांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल त्यांचेही आभार. मिपा जितकं लेखकांचं, तितकंच दर्दी, जाणकार वाचकांचंदेखील आहे. लेखमालेतील धाग्यांवर येणारे प्रतिसाद, जिज्ञासू प्रश्न याची साक्ष देतात. काही जणांनी या उपक्रमाच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या विषय-निवडीबद्दल आणि असलेल्या व्यापकतेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. लेखमालेतील एकाहून एक सरस लेखांनी या सर्व शंकांचं निरसन केलं असेल, असं आम्ही मानतो. त्या शंकांचा विचार करुन, त्यानुसार लेखमालेचं स्वरूप आणखी प्रगल्भ करण्यास आम्हाला मदतच झाली. अजूनही काही शंका असतील तर ती जबाबदारी आमच्या आयोजनाची, लेखकांनी त्यांचं २००% योगदान दिलेलं आहे.
लेखमालेचं अनुरूप जाहिरात बॅनर आणि मुखपृष्ठ हेमांगी के आणि आपल्या 'स्पेस जंक' लेखाचे लेखक Keanu या दोघांनी मिळून बनवून दिलं. त्या मुखपृष्ठाने लेखमालेला शोभा आली. या कल्पक बॅनर आणि मुपृबद्दल त्या दोघांचे आभार मानावे तितके कमीच.
या आणि पडद्यामागच्या अशाच अनेक हातांनी लेखमाला आकारास आली आणि तुम्ही तिला साजिरं करून घेतलंत.
मिपकरांच्या जिवावर आणखी एक यशस्वी उपक्रम राबवल्याचं समाधान पदरी घेऊन आज लेखमालेचा समारोप करतो. पुन्हा लवकरच येऊ, मराठी दिनाची मेजवानी घेऊन!!
वाचने
15957
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
या लेखमालेची संकल्पना
या लेखमालेची संकल्पना
In reply to या लेखमालेची संकल्पना by यशोधरा
+१
अरे ! संपली पण ? रच्याकने जे
In reply to अरे ! संपली पण ? रच्याकने जे by उगा काहितरीच
कोणाचेच लेख रिजेक्ट झालेले
अरेरे एवढ्या लवकर मालिका संपली? :(
सर्व
संपादक मंडळाचे आणि लेखकांचे
संकल्पना आणि सादरीकरणार्थ मनःपूर्वक धन्यवाद!
अरेरे! इतक्या लवकर संपली?
छान झाली ही लेखमाला
In reply to छान झाली ही लेखमाला by सुधांशुनूलकर
सहमत आहे.
लेखमाला खुपच सकस होती. सर्व
उत्तमच झाली ही लेखमाला!!
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी
शीर्षक वाचून मला वाटलं.....
मस्त होती लेखमाला
संपली पण..
विज्ञान लेखमाला
मनपुर्वक धन्यवाद!
लेखमाला फारच वाचनीय झाली.
In reply to लेखमाला फारच वाचनीय झाली. by मुक्त विहारि
Thank you kaka!!