Skip to main content

सदस्यांतर्गत भेदभाव आणि धोरण

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 06/02/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्यात दोन व्यवसाय: मान अपमान बॅटमॅन नामक सदस्याचा हा प्रतिसाद आहे : विठाकाका, नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली? या प्रतिसादाविषयी सं.मं.कडे तक्रार करुन योग्य मार्गानं निवाडा होईल अशी रास्त अपेक्षा होती पण अजूनही प्रतिसाद कायम आहे. तर प्रश्न असा पडतो की एखादा प्रतिसाद व्यक्तिगत आणि शिष्टाचाराचे नियम सोडून बेतालपणे दिला आहे किंवा कसे, याचा काय निकष आहे. इथे `व्यक्तिगत प्रतिसाद' या कारणाखाली आयडी बॅन होतात मग वरचा प्रतिसाद कशा प्रकारात मोडतो? आणि मग व्यक्तिगत प्रतिसाद देणार्‍यांना तंबी दिली जाते तर ज्यांच्या बाबतीत असे प्रतिसाद दिले जातात त्यांना उत्तर देण्याची किंवा काय निवाडा झाला ते सांगण्याची, शासकांची किमान जवाबदारी नाही काय? आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला, शासक काहीच करत नाहीत म्हटयावर, त्याच पातळीवर येऊन पुरतं वाजवलं, तर तो उत्तर देणार्‍याचा फाऊल का धरला जाईल का किंवा का धरला जातो?

वाचने 11096
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

ते दोन्ही प्राशन केल्यामुळेच तर तुम्हाला, मद्यप्राशन आणि तर्कशुद्धता यातला संबंध आणि स्वतः केलेली सारवासारवी समजू शकत नाही. आता काहीही न घेता पुन्हा स्वतःचे प्रतिसाद वाचा म्हणजे समजेल.

In reply to by विवेक ठाकूर

दोघांनी आता एकमेकांना तिरपे प्रतिसाद लिहिणं थांबवावं असं एक मिपाकर म्हणुन वाटतं. वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही. एकमेकांवर आपण दोघं जितकी चिखलफेक कराल तितकी आमची वाचक प्रेक्षक म्हणुन करमणुक होईल. आपण दोघंही चांगलेही चांगले पहिलवान आहात कोणाचीही पाठ लवकर लागणार नाही, तेव्हा दोघांनीही हा सामना आता थांबवावा. धन्यवाद. ह्याव अ गुड डे. -दिलीप बिरुटे (पंच)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही. असं फ़क्त तर्क गुंडाळून सरकार पक्षा संबंधी प्रचारकी लेख लिहिणाऱ्या अन विरोधकांप्रती विखारी घाण ओकणाऱ्या एका आयडीला वाटते सर!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही पंच ना ओ सर! मला वाटले तुम्ही दोन राउंड्स च्या मधली विश्रांती दिलीय. पुन्हा शिट्टी वाजली की म्याच सुरू होईल. =))

In reply to by पैसा

आता पुरे हं. मला जिंकु द्या. एक आवडलेल्या कवितेच्या ओळी टाकतो. उपप्रतिसाद देऊन दाद द्यायची नाही. खरडवहीत दाद द्यायची. काल (काल्पनिक) मैत्रीणीची धावती भेट झाली. तो आनंद असा - सांग कसा होऊ मी ताजवरती फिदा त्यास येईल का तिच्या लाजण्याची अदा पत्थराची पूजा मी कशाला करु चालता बोलता काल मी ताज पाहिला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता त्या कवितेखालील प्रश्न सोडवा. ताज का चालतो? वरील कवितेत नक्की कुणाला लाज वाटत आहे आणि का? पत्थराची पूजा का करू नये स्पष्ट करा. ताज काय बोलत आहे? पु ना ओक यांच्या दृष्टीने ताजची १० वाक्यात माहिती लिहा. फिदा आणि अदा यास मराठी संस्कृत प्रतिशब्द लिहा. --( पहिली ते बारावीचे उट्टे काढणारी) माऊ ;)

In reply to by बॅटमॅन

"किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् | अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम् ||" फक्त या गोष्टींसाठी हा माणूस इथे हवा .. बाकी
या प्रश्नावर दुखावले जाणे म्हणजे कुठेतरी मनातच दारू = वाईट असे समीकरण लपलेले आहे याची पोचपावतीच आहे.
यासाठी +१

छे विठा, इतक्याशा इशु मुळे हललात

तर असं आहे बुआ हे प्रकरण नाही !! (ओ आय सी असा सगळा प्रकार झाला तर च्या चालीवर) धागाच अज्ञानोत्भव दिसतोय ! एकंदरित श्लोक भूमिका पाहता बॅटमॅन ह्यांनी एक स्पष्टीकरण दिलेले आहे! तरीही, चियर्स (सोमवेत्ता) बाप्या

बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू प्यायल्यावर असे प्रतिसाद सुचतात' असा प्रश्न विचारून प्रचंड चूक केली आहे याबाबत विठांशी सहमत. मी खात्रीने सांगू शकतो की १९२० साली जी दिडकी होती, तिची किंमत आत्ता फारतर शंभर रुपये असेल, त्यापेक्षा जास्त नाही. मी तेवढ्या किंमतीची दारू अनेक वेळा, वेगवेगळ्या परिस्थितीत प्यायलेली आहे. पण असा प्रतिसाद मला कध्धीही सुचला नाही. बॅटमॅन, तुम्हाला एवढं कळत नाही का, 'नशा शराब मे होता तो नाचती बोतल' असं एक थोर हिंदी कवी म्हणून गेला आहे. अहो बॅटमॅन, हा असला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही किती ताक पिऊन बसला होतात? (आता याबद्दल बॅटमॅन माझ्याविरुद्ध धागा काढणार...) बाकी तो मूळ प्रतिसाद वाचला. कॅन्सरपासून बचाव करणं इतकं सोपं असेल तर अनेक स्त्रियांना त्यासाठी मदत करायला मी उत्सुक आहे. फेसबुकावर कायम ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वगैरे खुळं चालू असतात. मला वाटतं आपण त्यापुढे जायला हवं. मिपाकरांनी एकत्र येऊन 'ब्रेस्ट कॅन्सर एलिमिनेशन ग्रुप' काढायला हवा. त्यासाठी गरजवंत स्त्रियांना हा मुद्दा पटवून देऊन त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम सुरू करावी. हे भयंकर कष्टाचं काम असेल, पण ब्रेस्ट कॅन्सर निवारणासाठी आपण तेवढा त्याग करायला तयार झालं पाहिजे.

In reply to by राजेश घासकडवी

मोहीम :):):) इच्छुक कार्यकर्त्यांनी नावनोंदणी कुठे करायची? प्रा.डाँ. चा कोनाडा वाला धागा? :)

In reply to by राजेश घासकडवी

मला विदा गोळा करायचा होता की किती एमेल आणि कुठल्या प्रकारची (बियर व्हिस्की इ.) व कुठल्या ब्रँडची दारू पिल्यावर कशी क्रिएटिव्हिटी बहरते ते. त्या उदात्त उद्देशाकरिता विचारत होतो ओ.

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.विठाकाका,बॅटमॅन आणी घासकडवी यांचा सत्कार एक एक क्वार्टर देऊन करण्यात येत आहे. -शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते *आजपासुन राज्यात लिकरचे भाव कमी झालेत ;)

कोय ते बी बोला इदर फ्री में दारू मिल रया करके, वो लेकिन फ्री के दारू में भेदभाव नै चलेगा. अपन पुरा खंबा पियेगा हे अपना दोरण रैताय. पैले बोलके रखताय... जिनको पिने का नै, अपना अपना गिलास उठाके घर जावो...

ये ग ये ग विठाभाइ

मिपाच्या इतिहासात हाणामारीचा पहिला प्रकट धागा म्हणून नोंदला जाईल हा धागा!! सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि मिपाला मनापासून शुभेच्छा!!

आमचे प्रत्येक विषयावर हटकून मत असतेच. तेव्हा ह्या विषयावरही देऊन टाकतो. सदस्याने अशा पद्धतीच्या वादात पडू नये, उघड द्वंद्व असल्याने कोण किती पाण्यात आहेत हे लगेच कळतं, विचारसरणीचे कपडे फाडले जातात. वादात कोणीच जिंकत नाही, वादात फक्त कोणाचा 'स्व' कसा आहे एवढंच कळतं. हसं होतं.