मिपा संपादकीय - समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची?
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची?
शितावरून भाताची परीक्षा, असे म्हटले जाते. ते स्वयंपाकघरात लागू होते तसेच बाहेर समाजातही लागू होते का?
मराठी माणसाची, भारतातील अन्य भाषी समाजात जी एक प्रतिमा बनलेली / बनवली गेलेली आहे, ती समस्त मराठी भाषिकांची प्रातिनिधिक म्हणता येते का? अन्य भाषी समाजांच्या प्रतिमांबाबत काय होते आहे?
हे आणि असे अनेक प्रश्न गेला कित्येक काळ माझ्या मनात घर करून आहेत. आज ह्या संपादकीयाच्या निमित्ताने त्यास मोकळी वाट करून देण्याचा मानस आहे.
समाजातील ज्या घटकांचा, अन्य समाजातील कोणत्या घटकांशी संबंध येतो, त्यावर ही प्रतिमा-उभारणी अवलंबून असते. मनोरंजन आणि माहितीची प्रसारमाध्यमे जी प्रतिमा उभी करतात, ती उर्वरीत देशात मुकाट्याने स्वीकारली जाते. ह्या प्रसारमाध्यमांनी मराठी माणसाची चितारलेली प्रतिमा आहे ती - भांडकुदळ आणि अल्पसंतुष्ट नोकरपेशी माणसाची. काय ही प्रतिमा संपूर्ण मराठी माणसाची प्रातिनिधिक मानता येईल?
तामिळ आणि बंगाली भाषिकांचे उदाहरण घेऊन बघू.
तामिळींची प्रतिमा - हुषार, अभ्यासू, कपाळावर उभे वा आडवे गंध लावणारा धार्मिक, शुद्ध शाकाहारी नोकरपेशी. तर बंगाळ्यांची प्रतिमा आहे ती, रसिक, कवि हृदयाच्या आणि हळव्या मनाच्या माणसाची.
तुम्ही जर तामिळनाडूत फिरलात, झक्कास चेट्टीनाड मटण ओरपलंत, तेथे चालण्यार्या अनेक चिट-फंडाच्या सुरस कथा ऐकल्यात, तर ही त्यांची प्रतिमा किती तकलादू आहे, हे समजून येते.
तीच गोष्ट बंगाल्यांची. अशिक्षित, अल्पशिक्षित बंगाल्यांशी - जे बहुसंख्येने आहेत -, बोलले की त्यांच्या, ह्या माध्यमांनी चितारलेल्या प्रतिमेला उभे-आडवे छेद जातात!
थोडक्यात, तामिळी काय किंवा बंगाली काय, त्यांच्याविषयीच्या प्रतिमा ह्या त्यांतील बहुजन समाजापेक्षा, अभिजन समाजाचेच प्रतिनिधित्व करतात, असे दिसून येईल.
पण हे मराठींबाबत होत नाही. मराठींची प्रतिमा ही, अभिजन समाजापेक्षा, बहुजन समाजाचेच प्रतिनिधित्व करते.
हा फरक का? आणि हे योग्य की अयोग्य?
फरक आहे तो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि तिच्या आर्थिक व्यवहारात मराठी माणसाच्या असलेल्या नगण्य सहभागामुळे. वर सांगितल्याप्रमाणे, मनोरंजन आणि माहितीची प्रसारमाध्यमे ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचा ज्या मराठी लोकांशी संबंध येतो, तशीच प्रतिमा ते उभी करतात.
द्रवीड चळवळीमुळे तामिळनाडूतून हाकलले-हुसकले गेलेले अय्यर-अय्यंगार ५०च्या दशकात तामिळनाडू बाहेर पसरले. साहजिकच हे उच्चवर्गीय तामिळी हीच संपूर्ण तामिळी भाषकांची प्रतिमा बनली.
इंग्रंजांमुळे इंग्रजीशी प्रथम संबंध आलेल्या बंगालमधिल भद्र लोकांबद्दलही असेच झाले. भद्र लोकांची प्रतिमा हीच बंगाल्यांची प्रतिमा झाली.
आता एखाद्या समाजाची प्रतिमा ही त्यांतील अभिजनांचे प्रतिनिधित्व करणारी असावी की बहुजनांचे?
एक अभिजन म्हणून, सुरुवातीला आपल्या ह्या प्रतिमेबद्दल वाईट जरूर वाटते पण अंतीमतः आपण बहुजनांचाच एक भाग आहोत, हे वास्तव स्वीकरणेच योग्य, असे वाटते.
पाहुणा संपादक : सुनील.
वाचने
12774
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
चांगला
छान विषय!
In reply to छान विषय! by पांथस्थ
विस्तार आवडला असता - सहमत
मलाही लेख चांगला वाटला.
अभिजन-बहुजन
प्रतिमा
चर्चाविषय आवडला.
लेख
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
In reply to प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट by विकास
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
सहमत
अशाच प्रकारचा एक लेख
व्यक्ती आणि समुह
विषय
बंगाली आणि आपण
नेहमी
अग्रलेखाचा
चांगला लेख
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
व्हाय डू ...
छान विषय
अग्रलेखाचा विषय
ठराविक साचे आणि सत्य