प्रजासत्ताक आणि पद्मश्री सुभाष पाळेकर
२६ जानेवारीच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची यादी जाहीर झाली. खरतर त्या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यावी म्हणुन हा सन्मान दिला जातो. पण प्रजासत्ताक दिनाला लष्करी धुरळा इतका उडतो आणि त्यात पद्म पुरस्कारांनी सन्मानीत व्यक्ती, त्यांचे कार्य याची दखल घेण्याची जागा शिल्लक रहात नाही. त्यातुन १० पद्मविभुषण , १९ पद्मभुषण आणि ८३ पद्मश्री ने सन्मानीत अश्या लोकांपैकी अनेक मुळचेच सुप्रसिध्द त्यामुळे आढावा तरी कशाचा घेणार.
जय जवान आणि जय किसान ही घोषणा एकत्र दिली जात असली तरी जय किसान ला तितकेसे प्राधान्य प्रजासत्ताक सोहळ्यात नसते कारण हा सर्व सोहळा लष्करी नोकरशाही आणि गणमान्य व्यक्तींच्या सुरक्षा आनि प्रोटोकॉल्स मधे गढुन गेलेला असतो.
२६ जानेवारीला शनी शिंगणापुरला महिलांना प्रवेश का नको यामुद्यावरच्या गलबल्यात एका महाराष्ट्रातील एका अपरिचित पद्मश्रींचा प्राप्त शेतकर्याचा कार्याचा आढावा घ्यायला कुठल्याही चॅनलला वेळ बहुदा मिळाला नाही . ह्यांच नाव आहे श्री सुभाष पाळेकर.
फक्त व्यकंय्या नायडु यांना त्यांची महती माहित होती काय म्हणुन त्यांनी “Congratulations to all Padma awardees… Very happy that for the first time a Padma award is bestowed on a farmer, Shri Subhash Palekar”, -winning-padma-shri अस ट्वीट केल.
कारणच तस आहे. विदर्भातले सुभाष पाळेकर आपल्या सेंद्रीय खतांच्या आग्रहामुळे आणि शुन्यावर आधारीत शेती प्रयोगामुळे विदर्भ आणि कर्नाटकात प्रसिध्द आहेत.
https://www.youtube.com/watch?v=ESuZc2l-tfY
सुभाष पाळेकर म्हणतात एक गाय रोज १० किलो शेणखत देते. ज्यातुन सुमारे २० एकर शेतीला पुरेल इतके शेणखत तयार होते. शेणापासुन शेणखत कसे बनवायचे याचे तंत्र त्यांनी विकसीत केले आहे. जर गाय दुध देत असेल तर तो बोनस अन्यथा भाकड गाय सुध्दा शेतकर्यांना वरदान आहे अस त्यांच मत आहे.
आंतरजालाची वरची माहिती घेतल्यावर असे कळले की शेणखताच्या वापराने भाताचे दर एकरी उत्पन्न १२ क्विंटल वरुन २० ते २४ इतके वाढते शिवाय औषधे किटक नाशके यांचा वापर कमी करावा लागतो कारण शेणखतामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
जमिनीचा कस वाढवण्यासाठी ते आणखी काही प्रयोग सांगतात शिवाय स्वतः ला लागणारे बी- बियाणे स्वतः बनवुन अल्पभु धारक शेतकरी कसे किफायती शेती करु शकतात हे सांगणारे हे शेतकरी आपल्या विदर्भातले आहेत हे वाचुन मला फारच आनंद झाला.
नाम ( नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ) जे काम करत आहेत ते उत्तम आहे पण शेतकरी आत्महत्याच होऊ नयेत म्हणु सर्वांनी श्री सुभाष पाळेकरांचा मंत्र जर गावोगावी पोचवला तर मला वाटत मुलभुत काम होईल.
सुभाष पाळेकर यांचे किमान चार व्हिडीओ तर यु ट्युबवर आहेत . आजवर त्यांनी हा संदेश अनेक शेतकरी यांना दिलाय.
१. https://www.youtube.com/watch?v=_JOSnwZAzo8
२. https://www.youtube.com/watch?v=nF0nICMUors
३. https://www.youtube.com/watch?v=K3p4cBay8rU
४. www.dailymotion.com/video/x2k3zp4
ही माहिती आपल्याला जास्त शेतकर्यांपर्यंत पोचवण्यासाठी काय करता येईल ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एका सकारात्मक काम करणार्या
सर्वांनी श्री सुभाष पाळेकरांचा मंत्र जर गावोगावी पोचवला तर मला वाटत मुलभुत काम होईल.+१००,०००नितीनचंद्रजी , खरंच मनापासून
पाळेकरांची झीरोबजेटशेती ही
सुभाष पाळेकरांचे अभिनंदन!
सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन
गाईचं स्थान
नितीनचंद्र
सुरेख ओळख, धन्यवाद.
आजच्या अॅग्रोवन मध्ये आलेला
दोघांचेही
माहितीबद्दल धन्यवाद....
त्यांच्या वेबसाईटवरून.
माहितीबद्दल धन्यवाद....
असे लोक प्रसिद्ध झाले पाहिजेत
उत्तम ओळख
उत्तम माहिती नितीनचंद्र आणी
जयघोष व्हावा
मग झीरो बजेट शेती किंवा
ते काही बोलले तर त्यांचे
छ्या
बरे झाले नाखु काका तुम्ही
जाता जाता -
थेट वापरकर्त्यांचे अनुभव
+१११
अगदी लेखमाला झाली तरी बेहत्तर.
धुराळी धाग्यांच्या भाऊगर्दीत एखादा तरी (लाभकर्त्याचा )दर्दी धागा येऊद्या की!!! आनंदी आनंदा गडे जिकडे तिकडे चोहिकडे खुष (मस्करीवाला) नाखुबाडीस!
+१११
फार सकारात्मक बातमी.
श्री पाळेकरांचे अभिनंदन! अगदी
आज साम मराठी वाहिनीवर पद्मश्री सुभाष पाळेकर
आताच मुटे साहेबाना हा लेख
तुम्हाला
सहमत व्हावेच लागेल ;-)
बरोबरीने डांगे साहेबांना
सुभाष पाळेकर हे एक मोठे नाव
लष्करी धुरळा इतका उडतो
खात्री आहेच श्रीमान! :)
एक नंबर!!!!!!! सुभाष
जसं लष्कराच्या धुरळ्यात
शारुख खान आमीर खान ऐश्वर्या
आजची मुलाखत ऐकली...
मेगासेसे किंवा नोबलने सन्मानीत करावे
हाहाहा, पाळेकरांना पद्मश्री!
Thank you नितिनचंद्रजी , पाळेकरांचा विषय काढलात
ऊत्तम परीचय
.
आता कुठे पद्मश्री
या अनुषंगाने