एका सूर सम्राज्ञीला विनम्र अभिवादन
सुमन कल्याणपूर ............
एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी.
आपल्या अवीट स्वरांनी गेली अनेक दशके भारतीय मनांवर राज्य करणाऱ्या सुमनताई म्हणजे संगीताच्या सम्राज्ञीच! उद्या २७ जानेवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !
"समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला गे माये " या त्यांनी गायलेल्या गीताने माझ्या बालपणात मला त्यांच्या आवाजाची ओळख झाली. संत ज्ञानेश्वर यांचा समाधीचा दिवस आणि त्यांची भावंडे तो सोहळा एका डोळ्यात तातातुटीच्या दु:खाचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात स्थितप्रज्ञ भाव एकत्र करून कसा अनुभवतात याची सुंदर प्रचीती या गीतातून येते.
हुबेहूब स्वरसम्राज्ञी लताताइंसारखा आवाज लाभल्यामुळे सुमनताई काहीशा दुर्लक्षितच राहिल्या. परंतु त्यांची गायन कारकीर्द हा भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आहे आणि राहील. रफी साहेब आणि लतादीदी यांचे काही काळ बिनसल्यानंतर रफी आणि मुकेश यांच्याबरोबर सुमन ताईंची युगल गीते केवळ अप्रतिम होती आणि ती अतिशय गाजली.
"दिल ए बेताब को सिने से लगाना होगा , आज परदा है तो कल सामने आना होगा"
"इतना ही तुमसे प्यार मुझे मेरे राजदार जितने के इस जमीन पार जर्रे है बेशुमार "
"आज कल तेरे मेरे प्यार के किस्से हर जुबान पर "
"तुमने पुकारा और हम चले आए "
(वरील सर्व रफी साहेबांबरोबर )
"ये किसने गीत छेडा दिल मेरा नाचे थिरक थिरक " (मुकेश यांचेबरोबर)
ही काही युगल गीते म्हणजे सुमन ताईंच्या प्रतिभेची अलौकिक उदाहरणे होत.
याशिवाय "जुही सी कली मेरी लाडली " हे बाहुलीसारख्या गोड गोड मुलीचे गोड कौतुक करणारे गीत सुमनजींनी असे काही गायले आहे की प्रत्येक आईसाठी ते एक सुंदर ठेवा आहे.
याशिवाय मराठीत तर सुमनताईनी आपल्या प्रतिभेने सर्व रसिकांना थक्क करून सोडले
"पार्वती वेची बिल्वदळे … शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे …. "
"बुडता आवरी मज भवाचे सागरी"
"देह शुद्ध करोनी भजनी रमावे" ही भक्तीगीते .
"जिथे सागरा धरणी मिळते" यासारखी मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील गीते
"या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार" अशी बोधपर गीते
"तुला ते आठवेल का सारे" अशी भावगीते अशा अनेक मराठी गीतात सुमन ताइनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला
पंचम (आर डी बर्मन ) एकदा म्हणाले होते की लता ही संगीत क्षेत्रातील डॉन ब्रॅडमन आणि अशा गेरी सोबर्स आहे याच धर्तीवर सुमन ताई या संगीतातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहेत.
पुन्हा एकदा सुमन ताईना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देऊन हा लेख संपवण्याआधी त्यांचे एक अप्रतीम मराठी गाणे उल्लेखत आहे .
या गीतात धरणी माय शेतकऱ्याना श्रम आणि स्वाभिमानाचे मोल समजावून सांगते आणि तितकेच ते सर्वांसाठीही बोधप्रद आहे.
______________________________________________________________________________________________________________________
गीतकार : गदिमा संगीतकार - स्नेहल भाटकर
मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा
होते तैसी अजून उते मी
सधन अन्नदा सुवर्णभूमी
खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा ?
अपार लक्ष्मॆ माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी
एक मुठ भर अन्नासाठी
जगतोस तरी का भ्याड जीवा ?
काय लाविशी हात कपाळी
फेकून दे ती दुबळी झोळी
जाळ आळसाची तव होळी
तू जिंक बळाने पराभवा .
मोल श्रमाचे तुला कळुदे
हात मळे दे घाम गळू दे
सुखासीनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा.
वर्गीकरण
एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी.
एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी.+१००अजून नाही
सुमनताईंना शुभेच्छा !
In reply to सुमनताईंना शुभेच्छा ! by सस्नेह
+१
In reply to सुमनताईंना शुभेच्छा ! by सस्नेह
मला वाटते
In reply to मला वाटते by राही
+१
In reply to मला वाटते by राही
हो, बरोबर
निगर्वी हे विशेष.
वाह वाह वाह
मन:पूर्वक शुभेच्छा!
माझी आवडती गायिका! त्यांचे
.
In reply to . by मोगा
कधी नव्हे ते +१
In reply to . by मोगा
+१ हे इतका वेळ शोधत होतो...
In reply to . by मोगा
येस्स्स
हो ना!+१
सुमनताईंना शुभेच्छा!
सुमनजींची बरीच गाणी आवडतात
In reply to सुमनजींची बरीच गाणी आवडतात by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to सुमनजींची बरीच गाणी आवडतात by ज्ञानोबाचे पैजार
निंबोणिच्या झाडामागे चंद्र
मेरे महबूब न जा
ठेहेरिये होशमें आउ तो चले
रे क्षणांच्या संगतिने मी अशी