आजपासुन नास्तिक...
आताशा वाटु लागलंय द्याव फेकुन हे श्रद्धा नावाचं जळमट;
होतेय नुसती घुसमट यात , काढायलाही धजावत नाहीत हात इतकी किळसवाणी जळमट..
काढायला जाता सर्वांग किळसवाणे करणारे...
आताशा वाटु लागलंय पद्धतशीरपणे शिकवलंय आपल्याला पाळायला श्रद्धा;
शिकवलंय पाया पडायला "जेजीच्या", लावलेत अंगारे आपल्याही नकळत..
भारुन टाकलेय आपले मस्तक त्याच्यात त्या उग्र दर्पाने...
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला मोठ्यांचा आदर करायला, खोटं न बोलायला
कारण त्याशिवाय का चालणार आहे समाजाचा गाडा अव्याहतपणे, व्यवस्थितपणे..
जरा मोठे होताच शिकवले, पाया पडलं की जाते रक्त डोक्याकडे, म्हणुनच तर झाले इथे आर्यभट्ट , विवेकानंद..
मग का झाले तिकडे डार्विन, आइनस्टाईन ? का ते ही टेकवतच होते डोकं वेगळीकडे, वेगळ्याप्रकारे ?
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलं नाही तटस्थ विचार करायला..
सांगितल्या गोष्टी सत्याच्या विजयाच्या वा असत्याच्या पराजयाच्या.
आताशा सांगावसं वाटतंय जगाला कुठे होतो विजय सत्याचा, चांगुलपणाचा नेह्मीच ?
क्रुरपणे मारनारेही जगतात आनंदाने अन् करतात सहन वेदना काही संभाजी, याच समाजासाठी , तुमच्या माझ्यासाठी.
आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला जिवंतपणाची कदर करायला;
नाहीतर उठला असता एखादा आदिम अन् अन फेकुन दिलं असतं त्यानं हे जगणं भयाण अंधारात जिथुन हे आलंय वासनेचा उत्कट वा लिबलिबीत हात पकडुन..मग कसा राहिल यांच्या समाजाचा गाडा सुरक्षीत, एकसंध.
म्हणे 'इथं केलं ते इथंच फेडायचय !' मग का नाही फेडावं लागलं अनन्वित अत्याचार्यांना ?
म्हणे 'उपरवाला सब देखता है|' मग का नाही केला हस्तक्षेप, होताना अबलेवर अत्याचार, निरपराध्यावर वार ?
म्हणे 'आहे हे सर्व माया' मग देउ का एक सणसणीत ? होतील वेदना का त्याही माया ?
मग का खाताय अन्न नावाची माया ? का घेताय हवा नावाची माया दर श्वासाला अव्याहतपणे?
बरं मग काय म्हणावी प्रेरणा तुमच्या माझ्या उत्पत्तीमागे ? का घडवतात , वाढवतात फक्त वासना
करतात तयार वासनेची अनुभुती घ्यायला ? समाजाचं नवीन पिक घ्यायला ?
म्हणतात कळाले सत्य त्यांना . मग त्यांनी का सांगीतले आम्हाला ? का आम्ही जगावं असच ,मनाची खोटी वा खरी समजूत काढत , जगाच्या रहाटगाडग्याची चाकं फिरवत ?
शोधावी का प्रेरणा या उत्पत्तीमागची ? का मानावं जे आहे त्यालाच सत्य - जसं मानत आलोय ? अन् जगावं याच समाजात एक प्रतिष्ठीत म्हणुन ?
वाचने
6543
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
चांगलं लिहिलंय मित्रा. आवडलं.
उत्तम
In reply to उत्तम by भंकस बाबा
औरंगजेब खिन्नपणे मेला
In reply to औरंगजेब खिन्नपणे मेला by गामा पैलवान
म्हणून का जस्टिफाय होतात
लेख आवडला. पापपुण्य व त्यांचा
जुनाच विषय.
चांगलं लिहिलंय
मन हा माणसात उत्क्रांत झालेला
In reply to मन हा माणसात उत्क्रांत झालेला by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +१ by सतिश गावडे
+++++१११११
In reply to मन हा माणसात उत्क्रांत झालेला by डॉ सुहास म्हात्रे
नाय ओ
ही अवस्था चांगली आहे. फक्त
विचार पटले. धन्यवाद!
चांगले लिहिलेय ...
श्रद्धा म्हणजे काय ? आणि
In reply to श्रद्धा म्हणजे काय ? आणि by माहितगार
मला तर नाही वाटत असं .
लेख आवडला, शंभु राजांविषयी
सुरेख मांडलय
छान लिहिलत