सर्वसाधारपणे संस्कृती आणि धर्म यांची बेमालुम सरमिसळ दैनंदिन मानवी व्यवहारात एवढी सवयीची झालेली असते की वस्तुतः संस्कृती आणि धर्म या बाबी भिन्न असू शकतात याकडेच मुळी दुर्लक्ष होऊ शकते. संस्कृती आणि धर्म हे एकमेकांवर प्रभाव पाडत असतात ते सहाजिक असते. धर्मसंस्था संस्कृतीतील त्यांना वाटणार्या काही सांस्कृतीक गोष्टी त्याज्य ठरवते काही नव्याने जोडते उर्वरीत संस्कृती जशीच्या तशी स्विकारली जाते. उर्वरीत संस्कृती जिचा धार्मीक तत्वाशी प्रत्यक्षतः संबंध नाही तरी सुद्धा ती त्या धर्माची ओळख आहे असा भास निर्माण होऊ शकतो. बहुतांश सांस्कृतिक देवाण घेवाण हि खरेतर मनमोकळे पणाने करण्या जोगी असावी परंतु एखादी सांस्कृतिक गोष्ट एखाद्या धर्माशी एवढी तदरुप होऊन जाते की त्यावर केवळ त्याच धर्माचा संबंध आहे आणि इतर धर्मियांनी त्या सांस्कृतीक गोष्टी स्विकारल्यास त्यांचा धर्म बुडेल इतपत मानसिक असुरक्षा आणि दुश्वासाची स्थिती असलेली असंख्य उदाहरणे असतात.
धर्म आणि भाषांचा संबंधही असाच, या संबंधांचा एक सांस्कृतिक भाग म्हणजे व्यक्तिंचे नाव, समजा कुणी धर्म बदलला तर त्याचा व्यक्ती नावाशी खरेतर प्रत्येक संबंध असलाच पाहीजे असे नाही. पण एखाद्या धर्माची सुरवात जेथून झालेली असते तेथील भाषेतील नावे दुसर्या प्रदेशात आयात केलेली दिसतात. स्थानिकांची त्या परकीयभाषेशी नाळ जोडलेली नसेल तर ती नावे परकीय वाटू शकतात का ? मग धर्मांनी स्थानिक भाषीय नावांचाही उपयोग करणे श्रेयस्कर नसू शकते का ? अर्थात धर्मांतरे घडवतानाचा हा तिढा सहसा धर्मसंस्थेच्या कक्षेत येतो, पण नंतरच्या पिढ्यांनी व्यक्ती नामांमध्ये परकीय भाषातील नावे वापरूच नयेत असे नव्हे पण स्थानिक भाषेतील नावे टाळण्या जोगेही काही नसावे.
केक अथवा पुरणपोळी हे केवळ खाद्य पदार्थ आहेत ह्यांचा ख्रिश्चन अथवा हिंदू धर्माशी काही संबंध असू शकतो का ? बेसिकची काळजी घेऊन एकमेकांना प्रिय पदार्थ खाउन पहाण्यात काही उणीव नाही हे तौलनिकदृष्ट्या अधिक सहज स्विकारले जाते. कुंकू आहे रांगोळी आहे अथवा साडी हा पोषाख आहे यांच्यावर एकाच धर्माचा कॉपीराइट असू शकतो का ? इतर धर्मीयांनी कुंकू/टिकली कपाळावर शृंगारासाठी वापरली अथवा रांगोळीने घर सजवले किंवा बुरख्याच्या आत साडी वापरली, ख्रिसमस ट्री सजवला तर धर्म भ्रष्टता येते का ? तरीही मानवी मन संस्कृती आणि धर्माशी अशी गल्लत का करत असावे ?
* ऑगस्ट २०१८ बॉलीवूड आंतरधर्मीय कुटूंबातील भाऊ बहीण धर्म आणि संस्कृतीची गल्लत न करता रक्षा बंधन साजरा करण्याचे वृत्त दिसते तर त्याच आधी महिनाभर केरळात एका चिमुकलीला कपाळावर गंध लावण्यासाठी धर्मांध शाळेतून काढतात आणि धर्म आणि संस्कृतीची गल्लत कशी होत असते हे दाखवून देतात.
वाचने
13582
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
धर्म आणि संस्कृती भिन्न हे
ह्म्म रांगोळी घालणे ही बाब
In reply to धर्म आणि संस्कृती भिन्न हे by प्रचेतस
धार्मिक नाहीच ना. पण तरीही तो
In reply to ह्म्म रांगोळी घालणे ही बाब by माहितगार
+१ केवळ माहितगार ह्यांचा लेख
In reply to धर्म आणि संस्कृती भिन्न हे by प्रचेतस
सगोत्री विवाह केल्यास खून
In reply to +१ केवळ माहितगार ह्यांचा लेख by कैलासवासी सोन्याबापु
सहमत.
In reply to सगोत्री विवाह केल्यास खून by यशोधरा
सहमत.
In reply to सहमत. by प्रचेतस
खीक्क
In reply to सहमत. by पगला गजोधर
गोमांस खाणे वैदिक धर्मात
In reply to सहमत. by पगला गजोधर
सगोत्री विवाह हे
In reply to सहमत. by प्रचेतस
संस्कृती आणि धर्माशी अशी
प्राचीच्या निरिक्षणाशी सहमत.
हिंदू प्रतिकं आता वापरणं कमी
In reply to प्राचीच्या निरिक्षणाशी सहमत. by अजया
बौद्ध आणि जैन
In reply to हिंदू प्रतिकं आता वापरणं कमी by माहितगार
बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेने स्वतःची संस्कृती आणली
In reply to बौद्ध आणि जैन by पैसा
येथे काही प्रमाणात सांस्कृतीक
श्री प्रचेतस यांचे प्रतिसाद
संस्कृती हा धर्माचा superset
वास्तवीक
माहितीगार
पाकिस्तानी लोकांनी स्पेन वर
पाकिस्तानी लोकांनी स्पेन वर
धर्माचा आणि खाण्यापिण्याचा ,
वेगावेगळे दृष्टीकोण वाचतोय.
केरळातील एका छोट्याश्या