Skip to main content

क्रीमी लेयर आणि आरक्षण : एक चर्चा

लेखक अस्वस्थामा यांनी बुधवार, 28/10/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला माहीत आहे की आरक्षण हा बर्‍यापैकी चर्चिलेला विषय आहे. पण असं वाटतं की बर्‍याचदा ही बाब भावनिक पद्धतीने मांडली जाते. म्हणजे असं की आरक्षणाचे हेतू तर नाकारता येत नाहीत, त्याचबरोबर त्या ध्येयाकडे जाताना थोडी दिशा भरकटलेली आहे हे ही तितकंच खरं आहे. आज हा विषय आठवायचे कारण म्हणजे, आज लोकसत्तामध्ये एक वाचण्यात आली ते अशी : ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको! यावरुन असं वाटलं की आरक्षणावर समग्र विचार व्हायला हवा. आधीच्या चर्चा आणि त्यावरुन बनवलेल्या काही मतांवरुन "काय असावे" अशी मांडणी करुन बघायचा हा प्रयत्न आहे. हे मान्य की लगेच कोणी या बाबी अमलात आणायला जात नाही परंतु एक सर्वसमावेशक धोरण म्हणून, समाजहितासाठी म्हणून आरक्षण कसे असेल अशी चर्चा अपे़क्षित आहे. प्रथमतः एक मान्य बाब म्हणजे आऱक्षण कोठेही जात नाही आणि एक समाज म्हणून पुढील काही काळासाठी ते राहणार आहे हे इथे स्वीकारलेले आहे. त्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकिय कारणे असतील पण ते राहू नये आणि समाजात किमान समतोल साधावा हाच त्यचा हेतू असेल हे महत्वाचं. १. जात ही फक्त जात प्रमाणपत्रावर नोंदलेली असावी. इतर ठिकाणी (शाळेचा दाखला इ. इ.) फक्त त्या प्रमाणपत्राचा नंबर वापरावा फारतर. पण कोठेही जातीचा उल्लेख हा जातीयता जिवंत ठेवण्यास मदतच करेल. (जातीप्रमाणेच धर्माचाही उल्लेख सरकारी कागदपत्रातून कमी झालेला पहायला आवडेल पण ते अवांतर इथे. ) २. सर्व आरक्षण प्रवर्गांसाठी क्रीमी लेयर ही अधोरेखित व्हावी. वरच्या बातमीनुसार ओबीसी या प्रवर्गासाठी क्रीमी लेयरची प्रस्तावित अट ही वार्षिक १० लाख उत्पन्नाची आहे (किती उत्पन्नाची अट हा वेगळा मुद्दा आहे आणि इथे त्यावर चर्चा अपेक्षित नाही. मुद्दा सर्वच प्रवर्गांसाठी ही क्रीमी लेयर लागू व्हावी हा आहे). ३. खुल्या प्रवर्गासाठी इबीसी ही एक रेखा आहे (जी क्रीमी लेयरपेक्षाही दारिद्र्य रेषेच्या जवळ जाणारी संकल्पना आहे) त्यांना ओबीसी अंतर्भूत करावे. ४. एकाच घरातील तीन पिढ्यांनंतर नोकरीतील आऱक्षण व उच्च शिक्षणासंदर्भातील आरक्षण व सवलती यांवर मर्यादा याव्यात (जर क्रीमी लेयर हा मुद्दा लागू होत नसेल तर). हे सहज आठवलेले आणि सुचलेले मुद्दे. अजून काही मुद्दे असतील तर स्वागत आहे. फारसं अवांतर, विखारी जातीय चर्चा होऊ नये व झालाच तर या संदर्भात दृष्टीकोन अजून स्पष्ट व्हायला मदत व्हावी ही अपेक्षा.

वाचने 34874
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

In reply to by राही

मुद्दा ब्राह्मांनी बाकीच्यांना न शिकवल्याचा आहे आणि त्यावर भाष्य न करता आता त्याची व्हाल्यू काय वगैरे वर गेलात. एकाच मुद्दा ग्राह्य आहे तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा पण तशी ती क्षत्रियांना पण आहे. आणि सध्याचे क्षत्रिय तर पुढेच आहेत पण जेंव्हा वेळ येते तेंव्हा फक्त आणि फक्त ब्राह्मण हि पंचिंग ब्याग होते. तुम्हाला ते मान्य नसेल तर स्पष्ट सांगा पण बाकीचे मुद्धे घुसडून मूळ मुद्याला बगल देवू नका. दुसरा मुद्दा पण मान्य आहे कि पारंपारिक कसबाचे महत्त्व अगदीच कमी झाले आहे.पण त्याच बरोबर जे मुळात चांभार होते त्यात अशी पण उदाहरणे आहेत ह्यांची कोटीच्या कोटीचे व्यवसाय उभे केलेत फक्त ते नजरेसमोर नको आहेत कारण पुन्हा पंचिंग ब्याग वापरून आपली पोळी भाजून घेणे. निवडणुका राखीव जागांवर जिंकता येतात हे तितकेसे खरे नाही. पण तो एक वेगळा मुद्दा होईल.>> आत्ताच बिहार मध्ये काय घडले? भागवत बोलले एक आणि त्याचा विपर्यास करून रान मांजवले आणि भाजपा सपशेल पडला. प्रवीण पाटील नावाचा एक सांखिकी आहे. त्याच्या ब्लोग वर त्याने आकडेवारी सकट हे सांगितले आहे कि भागवत बोलले आणि एक रात्रीत अनेक लोक फिरले. तेंव्हा राखीव जागा मुद्दा नाही असे अजिबात नाहीये.

In reply to by चैतन्य ईन्या

किती biased असावे माणसाने? वाईट वाटते असे प्रतिसाद वाचून.. मुळात इथे ब्राह्मणांचा(जातींचा उल्लेख मी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी उपाय नसतो!) विषय कुठून आणलात? कसली काय "पंचिंग ब्याग"? कोणी टीका केलेली नाहीये जातीवरून... मुळात तथाकथित उच्चवर्णीय म्हणजे फक्त ब्राह्मण होत नाही त्यामुळे विशिष्ठ जातीच्या समुदायाला टीकेचे लक्ष्य आजिबातच केलेले नाही.. पेठकर काकांनी त्यांचे स्वतःचे उदाहरण दिले, तसाच एखादा मागासवर्गीय त्याच्या हलाखीचे आणि सामाजिक उपेक्षेचे वर्णनही करू शकतो त्यामुळे त्यांचा प्रतिसाद हा त्यांचा वैयक्तिक अनुभव होऊ शकतो. पण तुम्ही हे जे काही लिहिलंय त्याचा काय पाया आहे? तुम्ही म्हणता "१० वी पर्यंत समजू शकतो किंवा ३०-४०% टक्के जागा राखीव हे पण समजू शकतो पण सगळेच राखीव हे अजब आहे." कोणी मागितलंय सगळे आरक्षण? जरा चर्चा पूर्ण वाचण्याचे कष्ट तरी घ्या बर आणि हे जे खोब्रागडे पुराण आहे ती एक किचकट केस आहे ज्याच्या मध्ये देवयानी आणि रिचर्ड दोघांचीही चूक होती. पण हव्यास हा दुर्गुण कोणत्याही माणसात असू शकतो.(सोयीस्कररीत्या) जात बघून ते ठरवण्याची गरज काय पडलीये? नाहीतर इतिहासात शेकड्याने उदाहरणे सापडतील! चांगली वाईट माणसे प्रत्येक समाजाचा भाग असतात पण दुर्दैवाने काही लोक मुख्यत्वे वाईट गोष्टींचे सार्वत्रीकरण करतात...

In reply to by चैतन्य ईन्या

आणि पुरोहित काय करायचे ? विविध जातीतील मुले एकत्र करुन मंत्र म्हणणे / सत्यनारायण घालणे वगैरे शिकवायचे की काय ?

माझ्यामते काही वर्षांनी शिक्षणातलं आरक्षण इम्मटीरिअयल होइल. ऑनलाइन अभ्यासक्रम हे आज बाल्यावस्थेत असले तरी अजून १५-२० वर्षांनी ते अधिक परिपूर्ण आणि अ‍ॅक्सेप्टेबल होतील. यामुळे इच्छुक १०००० आणि सीटा १०० यातून येणारे प्रॉब्लेम, कमी मार्कवाल्याला सॉट-आफ्टर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यातून येणारी भावना या कमी होतील. आत्ता देखील जिथे लिमिटेड सीट आहेत अशी सिचुएशन नाही, उदा सीए, सीएस सारखे वाणिज्य शाखेचे कोर्स, तिथे आरक्षण हे इम्मटिरिअयल आहे. हा हा सिलॅबस, त्यावरचे पेपर तुम्ही कसाही अभ्यास करा आणि पास व्हा, इतके वर्ष आर्टिकलशिप करा की तुम्ही झालात सीए. अभियांत्रिकी शिक्षण जर या मॉडेलवर गेलं तर आरक्षण हा प्रश्न उरणार नाही. अर्थात वैद्यकीय अभ्यासक्रम जिथे प्रॅक्टिकल अत्यंत महत्वाचे असतात तिथे ऑनलाइन अभ्यासक्रम चालणार नाहीत. पण हे प्रॉब्लेम सुटूही शकतील.

मुळात जातिआधारीत आरक्षण ही संकल्पनाच मला शिक्षणाच्या बाबतीत व्यक्तिगतरित्या चुकीची वाटते.आरक्षण हे संपुर्णरित्या व्यक्तिच्या अथवा कुटुंबाच्या सकल वार्षिक उत्पन्नावर असावे.यामुळे सर्वच जातिंना शिक्षणाची समान संधी उबाबतीत होईल.यामुळे सर्वांना समान संधी मिळेल.राहता राहिला प्रश्न नोकरीतील आरक्षणाचा तर तिथे मुळात आरक्षणाची काहीच गरज नाही. ती निवड अंगभुत गुणांवर व्हावी.

ब्रिटीश राज्य संपल्यावर आपण ज्या पध्दतीने आपला राज्यकारभार चालू आहे ते पाहता ग्रीस अथवा इजिप्त सारखी अराजकता माजायला फार दिवस वाट पहावी नाही लागणार असे दिसते. केवळ जन्म अमुक जाती मध्ये झाला आहे म्हणून गुणवत्तेचे नियम जिथे सोई प्रमाणे वाकवले जातात तिथे परिपूर्णता कशी फळाला येणार ? माझ्या मते किमान काही क्षेत्रात जातीवर आधारीत आरक्षण ताबडतोब काढले पाहिजे जसे कि शिक्षक भरती , वैद्यकीय सेवा, संरक्षण व्यवस्था, लोक प्रतिनिधी. हि पदे समाजाचा आधारस्तंभ आहेत, इथे आपण भेसळ केल्यास पुढच्या कैक पिढ्यांना आपण नरकात ढकलण्याची कामे करत आहोत. माझ्या पत्नीला बारावीला ९२ टक्के मार्क असून सुद्धा MBBS ला प्रवेश मिळाला नाही तेच तिच्या मैत्रिणीला सहज मिळाले जिला जेमतेम ६० टक्के होते. आज आपण वैद्यकीय क्षेत्रात किती तरी अपघात डॉक्टरांच्या अज्ञानामुळे बघतो. माझ्या मते हि तर सुरवात आहे! माझ्या मते आरक्षण फक्त आर्थिक दुर्बलांना असावे.

In reply to by महेश श्री देशमुख

>>ब्रिटीश राज्य संपल्यावर आपण ज्या पध्दतीने आपला राज्यकारभार चालू आहे ते पाहता ग्रीस अथवा इजिप्त सारखी अराजकता माजायला फार दिवस वाट पहावी नाही लागणार असे दिसते. म्हणजे? मे २०१४ ची क्रांती फुकटच की काय?

In reply to by महेश श्री देशमुख

माझ्या पत्नीला बारावीला ९२ टक्के मार्क असून सुद्धा MBBS ला प्रवेश मिळाला नाही तेच तिच्या मैत्रिणीला सहज मिळाले जिला जेमतेम ६० टक्के होते. आज आपण वैद्यकीय क्षेत्रात किती तरी अपघात डॉक्टरांच्या अज्ञानामुळे बघतो. माझ्या मते हि तर सुरवात आहे! प्रचंड बायस्ड प्रतिसाद! जातसंकुचित मानसिकतेतून आलेला. अ‍ॅड्मिशन ९५ वर मिळो वा ३५ टक्क्यांवर एमबीबीएस पास करायला तर कुठले आरक्षण नाहीयेना? मग डॉक्टरांच्या गुण्वत्तेचा आणि आरक्षणाचा काय संबंध? आरक्षण विरोध असणारे नेहमी हा बालिश प्रतिवाद करतांना दिसतात. प्रवेशास आरक्षण आहे. परिक्षेस नाही. आणि MBBS ला प्रवेश मिळवण्यापेक्षा MBBS पास होणे जास्त कठिण आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे गुणवत्ता-रहित डॉक्टर्स समाजात आहेत ह्याच्याशी आरक्षणाचा संबंध जोडू नये.