Skip to main content

पावतीवर CST/BST क्रमांक पाहता का ?

लेखक सातारकर
शनिवार, 03/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1018
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आत्ता पर्यंत नव्हतो बघत, पण मला अस वाट्त याच्यापुढे पावतीवर CST/BST क्रमांक पाहिलाच पाहिजे. (डोळस) निखिल

खरचं खुप मह्त्व आहे याचे देवमाणसा.... धन्यवाद !!! पण तुम्हि ती पावती स्विकारली की नाही ???

In reply to by अवन्तिका

पावती घेतली, पण वरती लिहील्याप्रमाणे त्या क्रमांकाशिवाय तिला काहीच अर्थ नव्हता. त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.

आता बी एस टी / सी एस टी ऐवजी व्हॅट नंबर पहावा. त्याचबरोबर टॅक्स पावती हवी असेल तर जास्त बिल होईल असे दुकानदार सांगेल. ती टॅक्सची रक्कम द्यायची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. ती तयारी नसते याचाच फायदा दुकानदार घेत असतात.

व्हॅट कायदा २००२ मधील तरतुदी नुसार रु. ५० पेक्षा जास्ती रकमेच्या प्रत्येक विक्रीचे बिल देणे व्यापार्‍याला बंधनकारक आहे. नाहीतर त्याला दंड होउ शकतो. पण आपल्या कडे "काय द्याचे " राज्य असल्याने सगळे खपते. विक्रीकर विभागाची अंमल बजावणी शाखा प्रामाणिक पणे काम करु लागली तर महाराष्ट्राचा महसूल दुप्पट होईल. असॉ. शासनाने कर चुकव्याची माहीती देणार्‍यास बक्षीस देण्याची योजना जाहीर केलेली आहे. (जुनी आहे) आपले नाव गुप्त ठेवले जाते.

In reply to by सागरलहरी

विक्रीकर विभागाची अंमल बजावणी शाखा प्रामाणिक पणे काम करु लागली तर महाराष्ट्राचा महसूल दुप्पट होईल.
मान्य आहे.
शासनाने कर चुकव्याची माहीती देणार्‍यास बक्षीस देण्याची योजना जाहीर केलेली आहे. (जुनी आहे) आपले नाव गुप्त ठेवले जाते.
वरच्या लिखाणातच एक लिन्क दिली आहे, जिथे आंतरजालावरुन तक्रार नोन्दवता येइल.

क्याश मेमो च्या ऐवजी त्याच्याच सारखा दिसणारा एप्रुव्हल मेमो देतात. आपण शीर्षक न वाचताच पावती घेतो आणि नंतर घेतलेली वस्तु बिघडली की दुकानदार हात वर करतो. गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा, मेथांबा

मुळात विक्रीकर (व्हॅट ) ची रचना, विक्रीकर खाते, त्यांच्या कामाची एकूण जबाबदारी आणि त्यांच्याकडे असणारे मनुष्यबळ - हे सर्व घटक, नोंद नसणारे व्यापारी, विक्रीकराची वसुली आणि तदनुषंगाने येणार्या अनेक इतर गोष्टींसाठी जबाबदार आहेत. पण त्यांच्याकडेही यावर उपाय नाही, कारण कुठल्याही करखात्यात ,नोंद नसणार्या व्यापार्याना हुडकून काढणार्या खात्यात (Survey Department ) माणसेच अत्यंत कमी आहेत.मुळात जे नोंदीत व्यापारी आहेत ते गोळा केलेला कर व्यवस्थितपणे भरताहेत कि नाही हेच लक्ष ठेवणारी माणसेच खात्यात अगदी कमी आहेत, तर नोंद नसणार्या व्यापार्याची गोष्ट तर दूरच. बरं, जी आहेत ती हतबल किंवा पैसेखाऊ आहेत. ह्या सर्व गोष्टींना आपले कार्यक्षम राज्य सरकार जबाबदार आहे. गंमत म्हणजे तक्रारी विचारात घेणारी यंत्रणा तरी कुठे धडपणे काम करते ? आता तुम्ही विचार करा कि ज्या व्यापार्याने नोंद केली आहे, बिलातून कर लावला आहे पण भरलाच नाही, तर काय ? ते कोण, कसे आणि कुठे ( कारण विक्रीकर खात्याची माणसे दुकानात जाऊ शकत नाहीत- कारण वेळ, अंतर आणि कायद्यातली तरतूद ) तपासणार ? मग मी बिलावरचा व्हॅट नंबर बघूनसुध्दा मी दिलेला व्हॅट हा सरकारपर्यंत पोहचेल ह्याची काय खात्री ? पण, सजग नागरीक म्हणून व्हॅट नंबर बघणे हे एक कर्तव्य आहे.