✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भागो जनता भागो

अ
अनुप७१८१ यांनी
Tue, 05/26/2015 - 13:19  ·  लेख
लेख
हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते. धावण्यात फार आनंद आहे. स्वत:शीच स्पर्धा लावण्यात मजा येते. गेल्या वेळचा रेकोर्ड पुढिल वेळी मोड्णे हेच एक ध्येय घेऊन धावायचे. अनेक ५०-६०+ वयोगटातील लोकही हिरिरीने या शर्यतीत भाग घेत असतात. त्यांना धावताना बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या फिटनेस ला सलाम व असा फिटनेस मलाही लाभो अशी देवाकडे प्रार्थना. बरं, माझी खात्री आहे मिपा वरही असे हौशी धावक नक्कीच असतील. कुणी माझ्यासारखाच धावण्याचा वेडा असेल तर जाणून घ्यायला आवडेल. शिवाय, पुढील मॅरेथॉन ला एकत्र धावता आलं तर बातच और होईल ! आहे का कुणी इच्छुक? :) जाता जाता: “If you want to run, then run a mile. If you want to experience another life, run a marathon.” – Emil Zatopek
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6289 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

पुढील लक्ष्य - ठाणे महापौर

वेल्लाभट
Tue, 05/26/2015 - 14:18 नवीन
पुढील लक्ष्य - ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ..... भेटूच तिथे आपण.
  • Log in or register to post comments

होय !

अनुप७१८१
Wed, 05/27/2015 - 12:02 नवीन
होय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

भागो जनता भागो च्या ऐवजी चुकून ….

पगला गजोधर
Tue, 05/26/2015 - 16:25 नवीन
आधी भागो जनता पकडेगी, असे वाचले...
  • Log in or register to post comments

अरे व्वा!!!

अनिल मोरे
Wed, 05/27/2015 - 08:44 नवीन
मलासुद्धा नुकतेच धावायचे वेड लागलेय. ठाणे हाफ मॅराथॉन- फेब्रुवारी 20१५ : 2 तास १2 मिनिटे गोवा हाफ मॅराथॉन- मार्च 20१५ : 2 तास १७ मिनिटे
  • Log in or register to post comments

मस्तच ...

अनुप७१८१
Wed, 05/27/2015 - 12:01 नवीन
मस्तच ... मित्रा....खुप छान वेळेत पुर्ण केली आहेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

धन्यवाद!!!

अनिल मोरे
Wed, 05/27/2015 - 14:35 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप७१८१

अरे क्लासच! मस्त. कीप इट अप.

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 14:20 नवीन
अरे क्लासच! मस्त. कीप इट अप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

मॅरेथॉनची कहाणी डिट्टेलमध्ये

मोदक
गुरुवार, 05/28/2015 - 16:17 नवीन
मॅरेथॉनची कहाणी डिट्टेलमध्ये लिहा. धावण्याला सुरूवात करावी असे का वाटले? किती अंतराने सुरूवात केली? अंतर वाढवत नेले त्यावेळी काय पद्धत वापरली? धावण्यासाठी कोणत्या प्रकारचे शूज आणि कपडे वापरले? एखादी दुखापत झाली का? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केले? दुखापत होवू नये म्हणून काय केले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

अरे वा!

पैसा
Wed, 05/27/2015 - 14:20 नवीन
आपल्याकडे अ‍ॅथेलेटिक्स हा सगळ्यात दुर्लक्षित प्रकार आहे. खरे तर धावायला काय लागतं? फक्त २ पाय. बूट नसले तरी चालेल. पण तेवढेही आपण करायला बघत नाही. सगळे काय ते आयपीएल च्या मागे!
  • Log in or register to post comments

तरी बरं...

वेल्लाभट
Wed, 05/27/2015 - 16:51 नवीन
आता कबड्डी, बॅडमिंटन सारखे खेळ ग्लॅमर आल्यामुळे लोकप्रिय होऊ लागलेत. रनिंगचंही तसंच आहे. स्टॅ.चॅ. मॅरेथॉन मधे सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे आजकाल हेही 'फॅड' होऊ लागलंय. असो. ज्यांना त्यात खरी मजा येते त्यांनी ती घ्यावी. ज्यांचा सेल्फी काढून वॉल वर चिकटवण्यापुरता स्वार्थ साधला जातो त्यांनी तसं करावं. ज्यांना निरर्थक वाटतं त्यांनी दुर्लक्ष करावं. पण रनिंग इज गुड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे अजुन एक निरर्थक अत्मरंजन =

प्रसाद गोडबोले
Wed, 05/27/2015 - 14:35 नवीन
हे अजुन एक निरर्थक अत्मरंजन =))
  • Log in or register to post comments

निरर्थक?

वेल्लाभट
Wed, 05/27/2015 - 16:46 नवीन
म्हणजे कसा अर्थ घ्यायचा याचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

१८ जुलै

अनिल मोरे
गुरुवार, 05/28/2015 - 08:07 नवीन
http://bnpgreenrunners.org/
  • Log in or register to post comments

PuneRunning

झकास
गुरुवार, 05/28/2015 - 17:12 नवीन
PuneRunning हा group join करा. FB वर आहे. निखील शाह ह्यांनी सुरू केलाय. पुण्याच्या विविध भागात त्यांचे सभासद run करतात रोज. नवीन runners साठी 'Leap of Faith' असं training program करतात. एखादा seasoned runner स्वतः volunteer करून guide करतो. http://www.punerunning.com/
  • Log in or register to post comments

Standard chartered mumbai marathon

अनिल मोरे
Sun, 01/17/2016 - 17:25 नवीन
Dear ANIL MORE. , Congratulations! you have finished your HALF MARATHON run in 02:28:56 . For more information logon to www.procamrunning.in
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sun, 01/17/2016 - 17:41 नवीन
यासाठी काय तयारी केलीत ते पण लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

अभिनंदन!

एस
Mon, 01/18/2016 - 12:20 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

हार्ट चा प्रोब्लेम

पीके
Sun, 01/17/2016 - 22:53 नवीन
हार्ट चा प्रोब्लेम असणार्यांसाठि वेगळि लाइन ठेवा हो...
  • Log in or register to post comments

वाह ! अनिल मोरे साहेब अभिनंदन

वेल्लाभट
Mon, 01/18/2016 - 12:17 नवीन
वाह ! अनिल मोरे साहेब अभिनंदन ! सहीच! २:२८ इज अ ग्रेट टाईम यू हॅव अचीव्ह्ड. लगे रहो! भागते रहो ! आणिक दोन मिपाकरांनी हाफ म्यारेथॉन पूर्ण केलेली आहे पण त्यांनी स्वतःच प्रतिसाद द्यावा व माहिती सांगावी याची वाट बघतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा