जगावं की मरावं हा एकच सवाल... कराव्या या वैद्यकीय चाचण्या, की फेकुन द्यावं हे........
माझा थोडेफार आकलन आणि अनुभवाचा विषय सोडुन येथे लिहिण्याची ही पहिलीच वेळ, सहाजिकच येथे भर माहिती 'शेअर' करण्याऐवजी माहिती गोळा करणे, शंका निरसन करुन घेणे यावर आहे ( कोण रे ते तिकडे हुश्श्श...म्हणाले??)
समजायला लागल्यापासुन मी दरवर्षी सर्वसामन्य स्वरुपाच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेत आलो आहे. याशिवाय कुटुंबातील अनेक सद्स्याच्या आवश्यक चाचण्यांही वेळप्रसंगी होतच असतात. चाचण्याचे बाकीचे स्वरुप काहीसे तेच असले तरीही गेले काही वर्षे व्हीटॅमिन B12 वा D3 या चाचण्या करुन घेण्यावर भर आहे असे दिसते...संशयास जागा महणजे नेमक्या याच चाचण्या अन्य नियमित चाचण्यांच्या तुलनेने महागही आहेत.
गेले अनेक वर्षांत आमच्या कोणातही न आढळ्लेल्या ही B12 वा D3 ची कमतरता हल्ली वारंवार अधोरेखित होते. एवढेच काय मी केलेल्या चर्चे अंती अनेक लोकांना हाच अनुभव आला आहे असे समजते. माझ्या परिचित एक डॉक्टरांच्या मते ह्या तपासणीऐवजी सरळ B12 वा D3 कमतरतेव्र्रेल गोळ्या घेतलेल्या उत्तम, तसेही ही व्हिटॅमिन्स अतिरिक्त स्वरुपांत शरिरात साठुन रहात नाहीत मग एकदा ही 'टेंडन्सी' माहित झाल्यावर या टेस्ट्वारी अनावश्य्क पैसे का घालवावे?? असा त्यांचा दृष्टिकोण आहे.
एकीकेदे सर्वसामान्य तपासण्यांच्या यादीत ही 'घुसखोरी' म्हणावी तो दुसरीकडे अनेक डायग्नोस्टीक सेंटर्सनी प्रचंड जाहिरातबाजी करुन व अगदी MLM सारख्या पद्धती वापरुन 'Preventive Checkup' ची अनेक पॅकेजेस विकण्याचा तडाखा लावला आहे. टोमोग्राफी, ॲजिओग्राफी, M.R.I, कॅरोटिड आर्ट्रीलरी सारखी नावे ( काही चुकले असल्यास माफी असावी) तोंडावर फेकुन हे मार्केटिग एजंटस (जे बहुतेकदा नॉन मेडीको असतात) समोरच्याला आधी गांगरवतात, नंतर घाबरवतात आनि मग आम्ही हे सारे ईतरांपेक्षा कसे स्वस्त देतो असे सागुंन 30/35 हजाराचे 'Preventive Checkup' पॅकेज त्याच्या गळ्यात मारतात..
ठराविक काळाने आपले मेडिकल चेक-अप करायलाच हवे यात अजिबात दुमत नाही मात्र एखाद्या विषयातील कोणतीही प्राथमिक तपासणी (उदा ECG) न करता थेट डॉप्लर वा ॲजियोग्राफी करणे कितपत आवश्यक आहे??
मागे एकदा मी या वैद्यकिय चाचण्यांसंदर्भात एक लेख ( बहुधा पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचा, पण खात्री नाही) वाचला होता ज्यांत यतील कोणतीच चाचणी 100% अचुक नसते व अगदी ठणठणीत, निरोगी अशा 100 लोकांच्या ह्या चाचण्या केल्यास त्यातील काही निरोगी लोकांच्या reports मध्येही अनियमितता दिसुन येतील.... असा काहीसा युक्तीवाद होता.
असो. येथील डॉ खरे आणि वैद्यकिय विषयांतील अन्य तज्ज्ञ् (हा शब्द असाच का लिहितात??) माझे गैरसमज दुर करतील आशी आशा बाळगतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जय हो !
तर सारांश असा की
आठवड्यात तीन वेळेस तरी
डॉक्टर साहेब - तुमच्या एथिक्स
D SOL ६० K, CALCIROL
डॉ. मनःपुर्वक धन्यवाद...
एक प्रश्न.
मला स्वतःलाच सूर्यप्रकाशाची
डि३-प्राॅब्लेम नसेल तर
डॉ., मनःपुर्वक धन्यवाद...
दोन्ही डॉक्टरांचे मनःपूर्वक
रात्रपाळी करणाऱ्या लोकानी
वेळच्या वेळी व्यवस्थीत जेवावे
साडे दहा हजाराच्या टेस्ट्स दोन हजारात
बुफे मध्ये जेवण आणी अ ला
डॉ. खरे
याचा लाभ घ्या
चाचण्या जरा जपूनच करा
कारण प्रत्येक गोळी थोड्या
अवांतर प्रतिसाद.
ब जीवनसत्वाची कमतरता