व्यवसाय आणि छंद यांचा आनंददायी समतोल
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
"तुम्हाला कोणतीही आर्थिक जबाबदारी नसेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्हाला केवळ आवड म्हणून आयुष्यात काय करायला आवडेल?" असा प्रश्न मी अनेक मित्रांना विचारतो आणि जी उत्तरं मिळतात ती आणि उत्तरं देणाऱ्या लोकांचा सध्याचा व्यवसाय/नोकरी यात बरेचदा ताफावत आढळते. अर्थात आर्थिक/कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपलब्ध होऊ शकलेल्या संधी या चौकटीत प्रत्येक जण काहीना काही धडपड करत असतो, प्रगतीच्य दिशेनी वाटचाल करत असतो. सातत्यानी नवीन गोष्टी शिकत राहणं आणि प्रगतीसाठी सकारात्मक धडपड चालू ठेवणं अशा वृत्तीतूनच अनेक माणसं मोठी झालेली आपण पाहतो.
लहानपणी वाचन, लेखन, संगीत आणि चित्रकलेची आवड होती. चित्रकलेविषयी विशेष ओढा होता. व्यंगचित्र असलेल्या मासिकांचं खास आकर्षण होतं. आजूबाजूला सुंदर हस्ताक्षर असणारी आणि चित्रकला आत्मसात असणारी माणसं होती. त्यातच शाळेत चित्रकलेचे खूप चांगले शिक्षक लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक स्पर्धेत भाग घेता आला. खास शालेय मुलांसाठी जपानला भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात भारतातल्या विविध शाळातून मागवलेल्या चित्रांमध्ये माझ्या चित्राची निवड झाली. पुढे फाईन आर्ट कॉलेजमध्ये कमर्शिअल आर्ट (applied art) ची डिग्री घेतल्यामुळे व्यावसायिकता आणि निर्मिती आधीच विक्रीचा विचार हे विचार मनावर ठसले. कलेच्या माध्यमापेक्षा संकल्पना (Concept) महत्वाची हे जाणवलं. जाहिरात संस्थेत करिअरची सुरुवात करून कालांतरानी आयटी/सॉफ्टवेअर उद्योगात प्रामुख्यानी वापरल्या जाणाऱ्या सर्जनशील (Creative) अशा युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन (User Experience Design) या क्षेत्रात स्थिरावलो. ज्या माणसाला विविध लोकांशी संवाद साधायला आवडतो आणि त्या अनुषंगानी 'उपयुक्त' (Usable) असे डिजाईन (मराठीत डिजाईनला 'अभिकल्प' म्हणतात! यापेक्षा सोपा शब्द अजून मलातरी सापडायचाय!) निर्माण करायला आवडतं अशा व्यक्तीसाठी हे क्षेत्र खूपच सर्जनशील आणि समाधान देणारं आहे. त्यामुळे माझ्यासारखा बडबड्या माणूस या क्षेत्रात नाही आला तरच नवल! युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन म्हणजे वापरकर्त्यांना (Users) काय हवंय त्याचा अभ्यास करून, त्या अनुरूप डिजाईन तयार करून, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सर्जनशील आणि 'उपयुक्त' उत्पादनाची निर्मिती! विविध देशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन करताना, त्यासाठी विविध देशातल्या ५०० पेक्षा जास्त लोकांशी संवाद साधून त्यांच्यासाठी उपयुक्त असे डिजाईन निर्माण करताना विलक्षण मजा आली, समाधान मिळालं. प्रचंड गोष्टी शिकता आल्या आणि खूप शिकायच्या आहेत!
युजर एक्स्पीरीअन्स डिजाईन या व्यावसायिक आणि सर्जनशील समाधान देणाऱ्या क्षेत्रात काम करतानाच चित्रकला, संगीत, वाचन, लेखन हे लहानपणीचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सर्जनशील कामाचं समाधान आणि निखळ आनंद देणारे छंद यांचा आनंददायी समतोल महत्वाचा, नाही का?
- निखिल वेलणकर
माझी काही चित्रं इथे पाहता येतील
Ditigal painting created on iPad
Acrylic painting on canvas
Oil painting on canvas
Oil painting on canvas "सुराज्य"
Met Hon'ble Chief Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis last year and dedicated my painting "Surajya" ("सुराज्य") to him. Humbled, honored and inspired by his appreciation.

Acrylic painting on canvas
Oil painting on canvas
Oil painting on canvas "सुराज्य"
Met Hon'ble Chief Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis last year and dedicated my painting "Surajya" ("सुराज्य") to him. Humbled, honored and inspired by his appreciation.

प्रतिक्रिया
चित्रे छान...!
शासकीय कला महाविद्यालय,
मस्त काम कल्पकराव. भारी वाटले
धन्यवाद
एक्कदम सुपर्र ! क्या बात है
वाह
सर्वच चित्रं फार आवडली.
मस्तं.
लगे रहो !
वा वा मस्तच हो
वाह!
+४
एका अनोख्या क्षेत्राचा छान
"कलेच्या माध्यमापेक्षा
चित्रं सुंदर!
नक्की विचार करीन. पण
खूप छान चित्रे. आवडली.
छान लेख!
आपण भारतात आहेत काय ?
मी अमेरिकेतल्या जॉर्जिया
असेच वाटले
काही संज्ञा व्याख्यांविषयी
छान मुद्दे मांडलेत आपण.
संकल्प
चांगले नाव होते राव. आधी
काही एक कृती ठरवणे, नियोजित
सम्
सुंदर.
.
सुंदर
सगळ्यांना धन्यवाद! माझी आणखी
चित्रं आवडली. मात्र चित्रांवर
रेडा
टाळया आणि टाळयाच फक्त..!
टाळया आणि टाळयाच फक्त..!
सर्व चित्रे छान,
छान.
अभिकल्प : डिझाइन म्हणजे काय?
छान चित्रे
छान चित्रे. अभिनंदन.