Skip to main content
लेखक mahesh jahagirdar यांनी बुधवार, 31/12/2008 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
हासताना याद आली सोसताना याद आली अगणी प्राजक्त हा मी वेचताना याद आली सूर माझ्या अतरीचे छेदताना याद आली चादण्याशी बोलताना जागताना याद आली घेतला कोणी उखाणा ऐकताना याद आली रोखलेली आसवे तू या क्षणाना याद आली महेश जहागीरदार
लेखनविषय:

वाचने 2107
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सोपी मांडणी आवडली... साधे शब्द लिहिणं अवघडच असतं :) -------- >> छेदताना याद आली ह्या ठिकाणी 'छेडताना' जास्त चांगलं वाटेल का?

In reply to by संदीप चित्रे

पुढील लेखनासाठी महेश जहागिरदार यांना शुभेच्छा. **गझलेची काटेकोर नियमावली थोडक्यात चुकली आहे असे वाटते - रदिफ काय आहे, हे पहिल्या दोन द्विपदींत स्पष्ट होत नाही. पण कवीने अमुक नियम पाहिजेत असा काही नियम नाही. कल्पक कविता म्हणून आवडलीच.**

छान रचना. आवडली. साधे शब्द याविषयी सहमत.