वन्स मोअर,
का पलिकडुन खुणावते आहे, मला कुणी
का आठवुन देते,जे विसरले, मला कुणी
चुंबनाचि गोडी, टाकली पुसुन, ओठावरुन मी
का करुन देते आठवण,अधर चाळवुन ,मला कुणी
फाडल्या, केल्या नष्ट ज्या प्रेम कविता मी
का ऎकवते आहे ,ते प्रेमगीत, मला कुणी
कधिराग,कधि अनुराग,कधि प्रेम,कधि आग,
कधि हो, कधि नाहि,का गोंधळुन टाकतय, मला कुणी
मुश्किलिन बुजत आहेत घाव, धरल्या खपल्या
का उकलत आहे त्या,दंतव्रण दाखवुन, मला कुणी
चुकलो,गमावल सारे, हरलो, ह्या खेळात मी
का करतय उद्युक्त पुन्हा, डाव खेळण्या, मला कुणी
पडला पडदा, संपली ,तिन अंकि शोकांतिका
का सारखा वन्स मोअर, देत आहे, मला कुणी
अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2299
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम!!!
उत्तम!!!
सुरेश भट यांची आठवण करुन दिलीत ... धन्यवाद !
गजल नाही...