चालते व्हा
चालते व्हा...
शीर्षक वाचून कोण कुणाला चालते व्हा म्हणतोय असे वाटेल.
चलते रहो, चाला,चालत रहा,नसाल तर चालणे सुरु करा या अर्थाने ते आहे.
आजकाल कॅच लाईन लागते म्हणणे खपवायला .काय करणार.
चालण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत.
मग नवीन काय.
नवीन , ह्या कारणाचा शोध कि का चालत नाही व चालणं सुरु करण्यासाठी काही उपाय असू शकेल का.
आपण का चालत नाही?
सुरक्षीत मार्ग नाहित.
ह्याला काहीच करू शकत नाही.
दुसरे काय?
मोटीवेशन /प्रेरणा नाही ?
मला वाटत हे खरं कारण नाही
चालण्याचं मोजमाप नाही हे खरं कारण असावं.
एका कंपनीने (इच्छूक) कर्मचा-यांना ला पेडोमिटर दिले आणि walk in to health campaign सुरू केला. दिवसाला साधारण 10,000 steps (~6किमी/अंतर प्रत्येकाच्या stride वर अवलंबून)चालण्याची अपेक्षा ठेवली.
नेहमीप्रमाणे निराशावादी मंडळींनी त्याकडे दुर्लक्षचं केले.
काहींनी मात्र पेडोमिटर खिशात ठेऊन चालण्यास सुरवात केली. किती पावलं चाललोय हे पहाण्याचा चाळाचं लागला.
यात मुख्य म्हणजे नियमितता महत्वाची,कारण कंपनीने दर आठवड्याला सरासरी जास्त असणा-यांची रॅकींग प्रसिध्द करायला सुरवात केली. त्यामुळे चालण्या-यांना किती चालणं शक्य आहे आणि आणि आपण त्यात कुठं आहोत हे कळू लागलं.एक निरोगी स्पर्धा सुरू झाली.
मी आधीचं आठवड्यात 3-4 वेळा 4 किमी धावत होतो,आता अंतर वाढवण्यासाठी चालण्यास सुरवात केली. 17,000 steps दर दिवसापर्यंत पोचलो.(12 तास बैठं आॅफिस काम झाल्यावर)
माझा एक मित्र आधीपासूनचं चालत होता,त्यानं जोर लावला,3 आठवडे तोच टाॅप रॅंकर आहे.पठ्या सरासरी 26,000 steps/ day चालत होता ,आता 36,000 steps /day पर्यंत पोचला. खरं म्हणजे तो ही स्पर्धा येण्या आधीच पेडोमिटर असलेले घड्याळ बांधून चालत होता. आधी तंबाखू चघळायचा,आता म्हणे 3 आठवड्यापासून स्पर्श नाही.त्याचं मनोबल सोलीडच वाढलयं
आपल्याला अतिरेक करा हा सल्ला द्यायचा नाहिय.पण जरा आपला वकूब कुठंवर आहे हे माहित करून घेण्यात पण मजा असते.
दहाहजारी मनसबदार व्हायला काय हरकत आहे मग जमलं तर पुढची पायरी.
आजकाल मोबाईलवरही काही पेडोमीटर चे अॅप आहेत पण मोबाईल बॅटरी लो असली की चालणं टाळण्यासाठी बहाणा होऊ शकतो त्यामुळे पेडोमीटर युनीट घेणेच चांगले. अगदी हलके असते, क्लीपने आपण कपड्याला लावू शकतो /खिशात ठेवू शकतो.घड्याळासारखी त्याची बॅटरी वर्ष, 2वर्ष चालते.
न्यूटनचे गतीविषयक नियम आपल्या सवयींबाबत पण लागू होत असावेत का ?
external unbalanced force (आॅफ मोटीव्हेशन अर्थात )लावल्याशिवाय शरीरे चल होणार नाहित कि काय.
एकदा सवय लागली,त्याचे फायदे /उत्साह दिसला की सांगायची गरज नाहीच.
ह्याचे रिच डिव्हिडेंडस् नजीकच्या भविष्यात दिसणारच.
एक प्रकारची ही अल्पबचत आहे,सहा महिन्यांनी आपल्याला त्याचे परिणाम स्पष्ट दिसतील.
पेडोमीटर वर्तमानात जगायला शिकवतो असे म्हणायला पाहीजे कारण तारीख बदलली कि पाटी कोरी होते (display 0)
दिवस बदलला कि स्वत:ला नव्याने सिध्द करायचं.त्यामुळे भूतकाळात रमण्यात अर्थ नाही,आजचा रोकडा प्रत्यय पाहिजे.
सांगे कालची कीर्ती,
तो एक मूर्ख !
असे तर पेडोमीटर सुचवत नाही ना ?
बाॅलीवूडचा डायलाॅग आठवतोय,
"इज्जत मे कोई discount नही साहब" (धूम कुठलातरी)
याप्रमाणे ,
Target मे कोई discount नही.
असं आपणच आपल्याला म्हणायचं.
चालतांना फक्त शरीरच नाहि तर मन ही चालत असतं, आपणस भोवती एरवी न पाहीलेला निसर्ग पहातांना,
आकाश मंडप, पृथ्वी आसन........
आपलाच वाद आपल्याशी
किंवा
तेरा कोई साथ ना दे तो,
तू खुदसे प्रीत जोडले,
अशी अवस्था होत जाते,नकळत अनेक गोष्टींवर चिंतन होत जाते.मनाचीही मशागत होते.
एक प्रकारे चल-समाधीच लागते.
किंवा गाणी ऐकतांना मंत्रमुग्ध व्हायला होतं,अर्थाची नवीन भेंडोळी उलगडत जातात.
कोई पत्ता हिले हवा तो चले
कौन अपना है ये पता तो चले
तू सितम से न खींच हाथ अभी
और कुछ दिन ये सिलसिला तो चले
चालणं आणि सुरक्षा : कालच शिरडीला चालत जाण्या-या 5 जणांना भिवंडीजवळ गाडीने ठोकरल्यामुळे एक ठार व इतर जबर जखमी झाल्याचे वाचून फार दु:ख झाले. हायवे वर चालणे अतिशय धोकादायक असतेच. चालणा-यांना सेफ लेन सारखी जागा देणारा कोणी आमदार /संस्था(न) नाहिच का.
चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे म्हणजे येणारे वाहन समोरुन दिसेल व सुरक्षा वाढेल.
आपण कायकाय वाचत असतो, भारतात मधूमेहाची आकडेवारी वाढतेय वगैरे आणि त्या साठी सरकारचे बजेट इतके आहे वगैरे.
मला वाटतं समाजाचं आरोग्य योग्य जिवनशैली व आहार विहारातून येतं. चकचकीत हाॅस्पीटलमधून नाही.
जर नियमित चालण्याची सवय व त्यातलाआनंद जास्त लोकांनी अंगिकारला तर तेआरोग्यविषयक खर्चात कपात करुन एक प्रकारची देशाला मदतचं करतील.
whatsapp वरआपण हा मेसेज कदाचीत वाचला ही असेल.
30 मिनीट चालण्याचे ३० फायदे जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्यासाठी
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!
आता नवीन वर्ष येतयं. सालाबाद प्रमाणे काही जण नवीन वर्षाचा निश्चय करतात, आणि साधारण फेब्रुवारीत सपशेल शरणागती स्विकारतात. मी तर ठरवून टाकलंय रोज 10,000 + पावलं चालायचचं.सध्या चालतोच आहे आता हीच जिवनशैली कायम ठेवायची म्हणतोय.
मंजिले खुद करीब आयेंगी
ए अजिजानो काफ़िला तो चले
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लिहिलय. आजकाल बर्याच
अप्रतिम. चालणं हा सर्वात
+१!
नुसतंच चालून फारसा फ़ायदा होत
हां. ब्रिस्क वॉकिंग जवळपास
ब्रिस्क वॉकिंग ने दुखापत
सहमत
अॅप कोणती चांगली आहेत?
काही टॉप अॅप्स
दुव्याबद्दल धन्स.
सुंदर लेख
सकाळी सकाळी वाचला... प्रसन्न
छान माहिती
खूपच उपयोगी लेख लिहिला आहात,
फार छान
लेखन आरोग्यासाठी उपयोगी आहे.
खूप छान लेख. आवडला.
खूप छान लेख. आवडला.
हेल्थ इज नॉट अबाउट इन्चेस तै.
उत्तम माहिती. मी देखील रोज ४
आधी
रच्याकने...
एमआय बॅन्ड
मालक कृपया ह्या ८०० वल्य
mi band
हो हाच तो
धन्यवाद लेखाबद्दल आणि
आता मिळतोय हा ब्यान्ड ९९९
एम आय बँड भारी आहे. व्हॅल्यू
पेडोमीटर हे आप भ्रमणध्वनी
जिव्हाळ्याचा विषय,
(किमान) चालायला (तरी) पाहिजे
पैतैच्या सांगण्यामुळे मला वॉक
Walk at home हे मी गेली २
पेडोमीटर कोणता घ्यावा?
सुरु आहे.
आधि मि भाजि किराणा सामान
'लोगोंको चलानेवाले को बाजीगर
जो चालतो
बेहद खूष
माहितीपुर्ण लेख...चालायला हवे
चालते व्हा ! !
बाजीगर भाऊ लेख छान. शायरी
चालणे महत्त्वाचे. पेड़ोमीटर
चालते व्हा ! !
सुरेख लेख ! शीर्षकदेखील!
हाहा हे अगदी खरं बोललात.