
थांबा! थांबा!! थांबा!!! पनीर आणि पर्यायाने माझ्यावर कमेंट करण्याआधी ह्या पाकॄचे व्हेरीएशन्स पहा. ह्यात पनीर एवजी बटाटा, सीमला मिरची, बटाटा - सीमला मिरची, तोंडली (उभ्या चीरुन), भेंडी, फ्लॉवर, गाजर, आलू-गोभी, मटार किंवा मिक्स व्हेज ई. विविध भाज्या सींगल किंवा काँम्बो करुन घालता येतील. जेवढे म्हणून पर्याय सुचतील तेव्हढ्या विविध अचारी फ्लेवर भाज्या करता येतील...
नॉनव्हेज वाल्यांनाही नाराज व्हायचं काम नाय. चिकन, मटण, कोलंबी, पापलेट घालून अचारी मुर्ग, अचारी प्रॉन्स चा लुफ्त घ्या.
टिपा: एका पाकृतून दुसर्या पाकृ सुचत जातात तसचं काहिसं ह्या पाकॄ बाबत झालं आहे. लिहिता लिहिताच खालील पाकॄ सुचल्या आहेत.
अचारी पनीर/मिक्स व्हेज टिक्का: आलं/लसूण पेस्ट, १ ते २ चमचे चक्का, चवीप्रमाणे लोणचे मसाला, मसाला तिखट, लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालून पनीर किंवा मिक्स भाज्या मॅरीनेट करुन ठेवा. नंतर नॉन स्टिक पॅन मधे ग्रील/रोस्ट करुन गरमागरम सर्व करा.
चिकन/फिश टिक्का: वरच्याच पेस्ट मधे पनीर/भाज्यां एवजी बोनलेस चीकन/फिश चे तुकडे, प्रॉन्स मॅरीनेट करुन मिक्स नॉन-व्हेज प्लॅटर सर्व करा. दारु/वारुणी सोबत साईड डिश.
चला मग घ्या पटपट साहित्य आणि डीट्टेल पाकृ लिहून.
साहित्यः
१. अर्थातच पनीर क्युब्स - अर्धा कि.
२. कांदे - २ मध्यम
३. टोमॅटो - ३ मध्यम
४. हिरवी सीमला मिरची - दोन मध्यम
५. लसूण पाकळ्या - ४ ते ५
६. पेरभरं आलं
७. लोणचं मसाला - १ ते २ चमचे (आवडीप्रमाणे कमी/जास्त)
८. मसाला तिखट - १/२ चमचा
९. हळद - पाव चमचा
१०. तेल - ५ ते ६ पळ्या (तेल मात्र जरा जास्तचं लागतं)
११. चवीप्रमाणे मीठ/साखर
१२. सुख्या लाल मिरच्या - २
१३. जीरं - १ चमचा
१४. बारीक चीरलेली कोथींबीर
कॄती:
१. पनीर क्युब्स गरम पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन मउ होतील. कांदे, टोमॅटो, १ हिरवी सीमला मिरची, लसूण पाकळ्या आणि पेरभरं आलं ह्यांची मिक्सर मधे मुलायम पेस्ट करुन घ्या. सीमला मिरची वाटणात घातल्याने भाजीला छान फ्लेवर येतो. उरलेल्या १ सीमला मिरचीचे चौकोनी तुकडे करुन घ्या.

२. मंद आचेवर एका नॉनस्टीक कढईत/वोक मधे तेल तापलं की जीरं तडतडलं की हळद, मसाला तिखट घालून वाटलेली पेस्ट घाला. पेस्ट पुर्ण शीजून कडेने तेल सुटायच्या एक ५ मि. आधी चौकोनी चीरलेली सीमला मिरची आणि लाल सुख्या मिरच्या घालून परतत रहा.

३. पेस्ट पुर्ण शीजली की लोणचे मसाला, मीठ, साखर घाला. गरजेप्रमाणे पाणी घालून ग्रेव्ही सारखी करा.

४. पनीर क्युब्स अॅड करुन मंद आचेवर एक ५ ते ७ मि. गेव्ही उकळू द्या. ग्रेव्ही नको असेल तर भाजी सुखीही छान लागते. गरमागरम अचारी पनीर पोळी, फुलका किंवा नान सोबत सर्व करा. मी ग्रेव्ही बरोबर व्हेज मेथी पुलाव केलेला.

५. झटपट आणि चविष्ट अश्या अचारी भाज्यांचा लुफ्त घ्या.
मस्त
मस्तच..
दुत्त दुत्त!
In reply to दुत्त दुत्त! by अत्रुप्त आत्मा
दिपकाबाबा पनिरवाले यांणी
In reply to दिपकाबाबा पनिरवाले यांणी by अत्रुप्त आत्मा
जौद्या ओ अता.
In reply to जौद्या ओ अता. by प्रचेतस
आगोबा-बुक्कीमारात्मबन्ध
In reply to आगोबा-बुक्कीमारात्मबन्ध by अत्रुप्त आत्मा
काय खतरा कलर आहे !
वाह !
In reply to वाह ! by सस्नेह
हो
मस्त ! पनीर म्हणजे विषय संपला
( वा वा वा वा ) × १०००००००...
वाह, मस्तं अचारी पनीर.
भन्नाट!
मस्त लागत असेल.नक्की करुन
In reply to मस्त लागत असेल.नक्की करुन by अजया
+१
हम्म**************
कढई नवीन का?
In reply to कढई नवीन का? by सूड
कढई नवीन का?
In reply to कढई नवीन का? by दिपक.कुवेत
असं असं!! भांड्याचं लक्षात
In reply to असं असं!! भांड्याचं लक्षात by सूड
आँ ईतक्यात???
In reply to आँ ईतक्यात??? by दिपक.कुवेत
प्रश्न कळला नाही.
प्रचंड भारी.
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthuduतोंपासु !
वाव!
मस्त फ़ोटो एकदम.पनीर आवडत नाही
मस्त फ़ोटो एकदम.पनीर आवडत नाही
मस्त
छान पाकृ,
धन्यवाद मंडळी
जबरा आणि मेथी पुलावासाठी
जबरदस्त!
धन्यवाद पुलावसाठी.
In reply to धन्यवाद पुलावसाठी. by त्रिवेणी
हो ते क्युब्स
मस्त पाककृती.फोटो तर..
छान पाकृ व फोटो.
अफाट!
In reply to अफाट! by बोका-ए-आझम
थॅक्स बोकाजी
मस्त!!!
तुमच्या बरोबर होणार्या.....
मस्तच , पुलाव पावभाजि मसाला
मॅगी क्यूब मिळाले नाहीत :(
:)
दुबैत या बुवा तुम्ही
वा!
या थर्टीफष्टाला रेसिपी बघून
करून पाहावीच लागेल
दीपक बाबा पनीर वाले , माझ्या
तुझ्या कृतीने मिक्स व्हेज केलीय
In reply to तुझ्या कृतीने मिक्स व्हेज केलीय by अनन्न्या
वाह!!
हो खूपच!
पहिलाच फोटो बघून जीव जाण्यात
मेथी पुलावाचे साहित्य किती
In reply to मेथी पुलावाचे साहित्य किती by स्नेह_म
मेथी पुलावाचे साहित्य
मेथी पुलाव करायचा आहे पण हे
In reply to मेथी पुलाव करायचा आहे पण हे by सुखी जीव
काय राव?
माफ करा, पण मेथी पुलावाचे
In reply to माफ करा, पण मेथी पुलावाचे by स्नेह_म
हे घ्या
दोन्ही पाकृ साठी धन्यवाद :)))))
बादवे एक सांगायचं राहून गेलं.
In reply to बादवे एक सांगायचं राहून गेलं. by के.पी.
अरेच्च्या खरचं कि!!
अप्रतिम..!