साहित्य :- मैदा १.५ कप, साधी साखर (पिठीसाखर नको) १ कप, बेकिंग पावडर २ टी स्पून, मीठ २/३ टी स्पून, लोणी ७ टेबल स्पून, दूध २/३ कप, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, अंडी २.
बेकिंग पॅन, हँड मिक्सर.
कृती : - एका भांड्यात मापाचे कक्ष तापमानाचे (रुम टेंपरेचर) लोणी व साखर चमच्याने एकजीव करुन घ्यावे. दुसर्या भांड्यात अंडी फोडून चमच्याने फेसून घ्यावीत. पहिल्या भांड्यातील लोणी साखरेचे मिश्रण फेसलेल्या अंड्यात मिसळावे. चमच्याने हलवून घ्यावे. आता मापाचा मैदा घेऊन त्यावर मीठ व बेकिंग पावडर घालावी. हळूहळू मैदा भांड्यातल्या मिश्रणात टाकावा आणि चमच्याने हलवून सारखे करावे. हँड मिक्सरने अर्धा मिनिट फेटून घ्यावे. त्यात दूध घालावे पुन्हा फेटावे. मिनिटभरानंतर व्हॅनिला इसेन्स घालून आणखीन मिनिटभर फेटावे. चमच्याने मिश्रणाची साधारण धार पडेल इतपत ते पातळसर असावे. वाटल्यास किंचित दूध घालावे.
अवन ३५० अंश फॅ. तपमानाला प्रीहीटिंगला १० मिनिटे लावावा.
बेकिंग पॅनला लोणी (असल्यास शॉर्टनिंग जास्त चांगले) लावून मैद्याने डस्ट करावे. आता मिश्रण पॅनमधे ओतावे.
केक बेक करावा. केकचा रंग साधारण बिस्किटाइतपत तपकिरी झाल्यावर विणायची सुई अथवा टूथपिक खुपसून बाहेर काढावे. पीठ चिकटलेले असल्यास केक झालेला नाही. सुई/टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक लगेच बाहेर काढून तारेच्या रॅकवर अथवा स्टीलच्या चाळणीवर पॅन उलटून काढून ठेवावा. गार होऊ द्यावा.
गार केक मोठ्या सुरीने जमिनीला समांतर आडवा कापावा (केकच्या दोन तबकड्या होतील). अननस किसणीवर किसून घ्यावा (टीनमधील तयार क्रश्ड अननस वापरला तरी चालेल. किंवा इतरही फळे आवडीप्रमाणे वापरावीत). अननसाचा रस पिळून वाटीत काढावा व पिठीसाखर घालून ढवळावा. हे मिश्रण चमच्याने केकच्या दोन्ही तबकड्यांच्या आतल्या (पांढर्या) बाजूस सगळीकडे पसरावे ते शोषले जाईल. आता व्हिप क्रीममधे अननसाचा चोथा घालून एकत्र करावे व केकच्या दोन तबकड्यांपैकी खालच्या तबकडीवर ते मिश्रण साधारण १/४ (पाव) इंच जाडीचे होईल असे पसरावे. त्यावर केकचा वरचा भाग (तबकडी) ठेवावी.
फ्रॉस्टिंग बनवण्याची कृती :-कक्ष तापमानाच्या १० टेबलस्पून लोण्यामध्ये आवडीप्रमाणे पिठीसाखर मिसळा हँडमिक्सरने घोटावे. आवडत असल्यास त्यात वॅनिला इसेन्स घालावा. सुरीने संपूर्ण केकला साधारण १/८ इंच जाडीचे कोटिंग करावे. उरलेल्या फ्रॉस्टिंगमधे आवडते रंग मिसळून केकवर आयसिंग करावे.
रेवती
वाचने
8204
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!!
असेच
In reply to वा!!!! by वल्लरी
+१
In reply to वा!!!! by वल्लरी
रेवतीकाकू,
धन्यवाद
In reply to रेवतीकाकू, by विसोबा खेचर
व्वा..
कसला भारी....
वा!
मस्त :)
केक मस्त
कुठलाही
In reply to केक मस्त by लिखाळ
बर.
In reply to कुठलाही by रेवती
मस्तच ग.
हेच म्हणते..
In reply to मस्तच ग. by शितल
जरूर करीन,
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
केक मस्त
स्वातीताई..
In reply to केक मस्त by स्वाती राजेश
आभार!
वूव ! मस्तच
In reply to आभार! by रेवती
+१
In reply to वूव ! मस्तच by लिखाळ
जबरा फोटू..!
In reply to आभार! by रेवती
अतिशय
In reply to आभार! by रेवती
बेकिंग पॅन
मी नेहमी
In reply to बेकिंग पॅन by मीनल