मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कारवार मुर्डेश्‍वर भ्रमंती

समीर१२३४५६ · · भटकंती
पावसाळयाचे दिवस होते. सहज म्‍हटलं बायकोला कुठेतरी फिरायला जाऊ, माझी ब-याच दिवसांची कारवार भ्रमंतीची इच्‍छा होती, जूलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात मी आणि मिसेस आम्‍ही दोघेही कारवार भ्रमंतीसाठी जायला निघालो. त्‍यासाठी सावंतवाडीतून बसची चौकशी केली. सकाळी 7.30 वाजता कदंबा बस होती, पण तिही फक्‍त मडगांव पर्यंत, तेथून पुढे आम्‍हांला दुसरी बस पकडावी लागणार होती. ठरल्‍याप्रमाणे सावंतवाडी स्‍टॅंडवर मडगांव जाणा-या कदंबा बसमध्‍ये बसलो, सावंतवाडी ते मडगांव कदंबा बसचे तिकीट 70 रुपये आहे. तासा दिड तासात आम्‍ही मडगाव ला पोहोचलो, तेथे माझी मेहूणीही येणार होती, ठरल्‍याप्रमाणे ती मडगाव ला आली, आणि तिथून पुढे कारवार जाणा-या बसमध्‍ये आम्‍ही बसलो. कारवारला पोचेपर्यंत दूपार झाली होती, तिथून पुढे मेहूणीने सांगितले की मुर्डेश्‍वरला शंकराचे एक सुंदर मंदिर पाहण्‍यासारखे आहे, तिथे जाऊया, त्‍याप्रमाणे चौकशी केली, खरंतर तिथे आमची भाषा कोणालाच समजत नव्‍हती, त्‍यांना हिंदीही थोडी थोडीच येत होती, सरतेशेवटी आम्‍ही मुर्डेश्‍वर जाणा-या बसमध्‍ये चढलो, आणि इथून पुढे आमचा प्रवास सुरु झाला, हा बराच लांबचा व जरासा कंटाळवाणा प्रवास होता, परंतू कर्नाटक सरकारचे रस्‍ते व तिथली स्‍वच्‍छता एकदम चांगली होती. शेवटी संध्‍याकाळी आम्‍ही मुर्डेश्‍वरला पोहोचलो. एकंदर बसने एकाचे सुमारे 200 रुपये तिकीट होते. मुर्डेश्‍वर मंदिर स्‍टेशनपासून अवघ्‍या 10 मिनिटांच्‍या अंतरावर आहे, तिथून आम्‍ही मंदिरात पोहोचलो. मुर्डेश्‍वर मंदिर बाहय भाग तिथे पाहण्‍यासारखे बरेच काही आहे. सर्वात मोठे आकर्षण म्‍हणजे शंकराची सर्वात मोठी आसनस्‍थ मुर्ती महादेवाची भव्‍य मुर्ती तिथून निसर्गाचे रुपही अत्‍यंत विलोभनीय असेच वाटत होते. समुद्राचा फोटो अशीच फिरती करुन थोडे बाजारात फिरलो, आणि तिथून स्‍टेशनला परतलो. स्‍टेशनवर रात्री उशिरा 2.30 वाजता नेत्रावती ट्रेन ने आम्‍ही परतलो.

वाचने 3826 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कंजूस 22/12/2015 - 21:12
भारीये.अजून उजवीकडून फोटो काढला असता तर शंकर देव कॅमर्यात( आपल्याकडेच ) बघतोय असं आलं असतं.ओंकारेश्वराच्या डोंगरावरही असाच आहे एक.देवळात प्रवेश नाही/ फोटो काढता येणार नाही वगैरे प्रश्न कायमचे सोडवलेत. एक विनंती :- या भटकंती सदरातील लेखाला "संपादन" आहे ते वापरून धाग्यातच उरलेले फोटो आणि माहिती वाढवा.