सध्या आमीरच्या गोंधळात पंतप्रधानांचा सिंगापुर दौरा पार झाकोळला गेला. सिंगापुर दौरा कधी सुरु झाला आणि संपला हे कोणाला लक्षातही आले नाही. त्याचा फायदा भाजपाला घेताच आला नाही. एक मात्र नक्की की भाजपाला विरोधी पक्षांनी त्यांच्याच पद्धती वापरुन पार जेरीस आणले आहे. असहिष्णुतेचा मुद्दा भाजपाच्या गळ्यातील काटा बनत चाललंय आणि भाजपा त्यामागे फरपटत जाणे हे नक्की दिसते.
मला या पेक्षा यावेळचे संसदीय अधिवेशन अधिक महत्वाचे वाटते. त्याची दोन कारणे
१. जी.एस.टी.
२. विरोधी पक्षांना अधिवेशन सुरळीत चालु देण्यासाठी तयार करणे.
जी.एस.टी. लागु केल्याने सरकारला आपण कामकाज करतोय हे जनतेला दाखविता येईल. तसेच जी.एस.टी. लागु करणे हे आर्थिक बाबतही आवश्यक आहे. पण राज्यसभेत सरकार एकटे काहीच करु शकत नाही. त्यातच मागे केलेले आणि बोलले गेले त्याची सव्याज परतफेड करण्यास विरोधी उत्सुक आहेत. मागील अधिवेशन वाया गेल्याने आता भाजपा वर हे अधिवेशन सुरळीत पार पडण्याची जबाबदारी अधिक. त्याबाबत संसदीय मंत्री आणि जेटली दोघांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी आता वाकण्याची तयारी दाखवत असहिष्णुतेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची देखील तयारी दाखविली आहे. म्हणजे भाजपा आता विरोधीपक्षांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाटते. (फक्त शक्यता हं) अगोदर असहिष्णुतेवर चर्चा करुन घ्यायची आणि त्यावर गोंधळ घालुन संसदीय कामावर बहिष्कार टाकायचा. म्हणजे भाजपाचे अच्छे दिन संपले काय? म्हणजे बोलणे सोडुन कामाचे दिवस या उद्देशाने.
वाचने
4672
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एक समजत नाही की राज्यसभेत
अशा वेळी संयुक्त अधिवेशन कां
In reply to मला एक समजत नाही की राज्यसभेत by जयन्त बा शिम्पि
संयुक्त अधिवेशन बोलावण्यासाठी
In reply to मला एक समजत नाही की राज्यसभेत by जयन्त बा शिम्पि
हम्म या मुद्याकडे माझेही लक्ष
In reply to संयुक्त अधिवेशन बोलावण्यासाठी by sagarpdy
ह्यावर मोदींचे मत
In reply to हम्म या मुद्याकडे माझेही लक्ष by माहितगार
लोकसभा अध्यक्ष व उप राष्ट्रपतींची हयगय
सहमत.
In reply to लोकसभा अध्यक्ष व उप राष्ट्रपतींची हयगय by रमेश आठवले
संयुक्त अधिवेशन कधितरी घ्यावेच लागेल
सुरळीत पार पडेल असं वाटत नाही
नकारात्मक राजनीती
सहमत. जैसी करनी वैसी भरनी.
In reply to नकारात्मक राजनीती by बोका-ए-आझम
हम्म
म्हणजे बोलणे सोडुन कामाचे
मला असे वाटते की सरकारचे काम
पहिला दिवस
अगदी अगदी.
In reply to पहिला दिवस by तिमा
नवीन सरकार आल्यापासून
राज्यसभा
तिडीक
In reply to राज्यसभा by तिमा
पण राजकारणात आमचा इंट्रेष्ट
In reply to तिडीक by कपिलमुनी
तेव्हा ते टॅक्स भरत नसतील हो
In reply to तिडीक by कपिलमुनी
काँग्रेसचे गुलाम नबी आजाद