कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात. असे हे कुळीथ जन्मापासून आवडीचे असल्याने विविध प्रकारांनी आहारात वापरले जातात.
कुळथाचे पिठले सर्वांनाच माहित आहे, रूची विशेषांकातही याची कृती आली आहे. हे पिठले तर आठवड्यातून एकदा होतेच. शेजार पाजारचा कोणी माणूस गेल्यावर घरच्यांना पिठलं भात दिला जातो. म्हणून शक्यतो कुळथाचे पिठले दिवसा करत नाहीत. ज्यानी कुळीथ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो:
कुळथाचे लाडू:
साहित्यः कुळीथ पीठ दोन वाट्या, किसलेला गूळ पावणे दोन वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, वेलची पावडर.
कृती: कुळीथ खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावीत. ही डाळ दळून आणावी. कुळीथ पीठ कोकणात प्रत्येकाकडे असतेच. हे तयार पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करावा, नीट मिसळून तूप घालावे. थोडी वेलची पावडर घालावी. खरंतर कुळथाचा वासच इतका खमंग असतो की वेलचीची गरजच नाही. तूप घालून मिश्रण एकत्र करून आवडीनुसार लाडू वळावेत. थंडीच्या दिवसात हे लाडू उत्तम!
माझी आजी जेव्हा ताजे तूप कढवले असेल तेव्हाच हे लाडू करायची, आणि तुपाची बेरी त्यातच घालायची.
कुळथाची उसळः
साहित्यः दोन वाट्या कुळीथ, तीन चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, दोन चिमुट हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबिर.
कृती: कुळीथ सकाळी भिजत घालावेत. रात्री उसपून चाळणीवर काढावेत. घट्ट झाकण ठेवावे. सकाळी छान बारीक मोड येतील. निवडून घेऊन कुळीथ कुकरला शिजवून घ्यावेत. शिजताना पाणी थोडे जास्त घालावे. कुळीथ शिजले की हे जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सगळे पाणी गाळू नये. ह्या पाण्याचे कळण करणार आहोत. आधी उसळ करून घेऊ. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. शिजलेले कुळीथ घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. कोथिंबिर घालून पोळीबरोबर खावी. मला ही उसळ नुसतीच खायला आवडते.
कळणः
साहित्यः कुळीथ शिजल्यावर गाळलेले पाणी ३ वाट्या, नारळाचे दूध ४ वाट्या, ताक ४ वाट्या, ७/८ लसूण पाकळ्यांची पेस्ट, एक चमचा मिरचीचे वाटप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जीरे, हळद.,कोथिंबिर, मीठ, साखर.
कृती: गाळलेले पाणी जेवढे असेल त्याच्या अडीच पट नारळाचे दूध आणि ताक मिळून घ्यावे लागते. हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात नारळाचे दूध आणि ताक मिसळावे. लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार घालावी. मिरची पेस्ट चवीनुसार मिसळावी. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी, हिंग व्यवस्थित असावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. कळण जेवण्यापूर्वी अगदी थोडे गरं करावे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते.
कळणाची चव अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान वाटते.

वाचने
21662
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान रेसिपीज
Arey wa!! Me kadhich kulith
सुंदर माहिती
वाह, मस्तं पाककृती आणि फोटो.
मस्त पाककृती.
मोड आणून वाफवलेली कुळीथ वजन
मोड आणून वाफवलेली कुळीथ वजन
अरे वा.सर्वच करुन बघण्यासारखं
अरे वा.. मी पण कधीच कुळीथ
वा मस्तच!
ओह्ह, बरं झालं सांगितलस. मी
In reply to वा मस्तच! by पैसा
अरे वाह मस्तच
कुळथाचे लाडू करतात हे
कुळीत जरूर खावेत..
मस्त रेसिपिज.लाडु मी हि
कुळीथाचे सगळेच खाद्यपदार्थ
अगं रुची विशेषांकात आहे त्याची रेसिपी
In reply to कुळीथाचे सगळेच खाद्यपदार्थ by यशोधरा
ओह, अच्छा :)
In reply to अगं रुची विशेषांकात आहे त्याची रेसिपी by अनन्न्या
पहिल्यांदाच पाहिलंय हे कुळीथ
अरेवा!
च्यामारी सॅण्डी, हे हुलगे
In reply to अरेवा! by चांदणे संदीप
हा पाकृचे नुसते फोटो बघल्याचा
In reply to च्यामारी सॅण्डी, हे हुलगे by अभ्या..
हुलगे घालून सुके मटण/चिकन
In reply to अरेवा! by चांदणे संदीप
खरच खूप पौष्टीक आहेत कुळीथ!
मला स्वतःला हुलग्याचा वास
छान माहिती आणि सुंदर सादरीकरण
जबराट!
धन्यवाद!
आमच्याकडे हुलग्याचे शेंगोळे
वा! छान पाककृती
हुलग्याचे शेंगोळे हा अत्यंत
हुलग्याची भाकर पण एकलेली आहे
येग्झॅट्ली!
In reply to हुलग्याची भाकर पण एकलेली आहे by नाव आडनाव
भारी पाकृज
प्रचंड आवडणारे प्रकार
भाकरीचे मीही ऐकलेय आजीकडून.
अनन्न्या..
भारी, पिठलं आणि भाजी मिस
हुलगे.औषधी उपयोग
माहितीबद्दल धन्यवाद पण
In reply to हुलगे.औषधी उपयोग by बाबा पाटील
हुलग्याची उसळ आणि बाजरीची
ते कोकणात करत नाहीत ना!