✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भावंडे

श
शितल यांनी
Mon, 12/29/2008 - 22:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11155 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

व
व्यंकु Mon, 12/29/2008 - 22:12 नवीन

वा मस्त

खरंच भावंडांच महत्व खूप आहे माझा भाऊच मला आमच्या कुटुंबात जास्त आवडतो जरी आम्ही कितीही भांडलो तरी. शितल ताई लेख छान आहे. तुमच्या लहानपणीचा प्रसंगही आवडला
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/29/2008 - 22:25 नवीन

मस्त..

भावंड असतातच अशी.. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/29/2008 - 22:37 नवीन

छान गं..

छान गं..
  • Log in or register to post comments
च
चकली Mon, 12/29/2008 - 23:16 नवीन

छान लेख

आठवणी जाग्या झाल्या. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
B
bhoja Wed, 12/31/2008 - 17:23 नवीन

@)छान खरच

@)छान खरच भाव पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली
स
संदीप चित्रे Mon, 12/29/2008 - 23:18 नवीन

एकाला दुसरा/री

असण्याचे फायदे सांगताच येत नाहीत. धन्स शितल.. आपण ज्या काही गोष्टी 'गृहित' धरतो त्यातच आपल्या भावंडाचे 'असणं' ही एक आहे... म्हणजे सुख-दु:खात बाकी कोण असेल्/नसेल पण आपलं भावंड नक्की साथ देईल असं !!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 12/30/2008 - 00:11 नवीन

शितल ताई...

शितल ताई... मस्त लेख.. खुप आवडला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हा तिघात मी सगळ्यात लहान... त्याचे फायदेच जास्तं झाले. लहान असताना दादापेक्षा ताईच जवळची वाटायची. शेंडेफळ असल्याने मी मला बरोबर न्या म्हणून मागे लागायचो आणि दादा कुठेच नेत नसे... तु तुझ्या मित्रांबरोबर खेळ असं म्हणून सटकायचा. त्याउलट ताई मला नेहमी बरोबर न्यायची... (तिचा खुप जीव आहे माझ्यावर). खुप काळजी घ्यायची. सहाजीकच मला ति अधिक जवळची वाटू लागली. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे त्या दोघांचही माझ्यावर किती प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून कळायला लागलं. आज तिघं तिन ठिकाणी आहोत, पण एकमेकांना बोलल्याशिवाय रहावत नाही... खरंच, मेरे भावंडोको मेरी भी उमर लग जाये!! सुंदर लेखासठी शितल तै चं अभिनंदन! अनामिक
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/30/2008 - 01:02 नवीन

ह्रदयस्पर्शी लेख

वाचताना डोळ्यात पाणी आले. आमच्याकडेही रोज भावंडासाठी हट्ट असतो माझ्या मुलाचा. दुसर्‍यांच्या घरी बाळ येणार असे समजले की आमच्या घरी बरीच वादावादी असते (मुलाची व माझी). माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. रेवती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 12/30/2008 - 01:16 नवीन

हा, हा, हा!!!!!

माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी. त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच. मग तुम्ही त्याला भाऊच आणा, कसे? :))))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 12/30/2008 - 01:21 नवीन

एकदा

निळ्या रंगात रंगून झालेय, आता म्हटलं गुलाबी रंग आणून बघावा. निदान मुलीमुळे नाजूकपणाचा स्पर्श होईल घराला, नाहीतर सदासर्वदा रांगडेपणाच असतो. (अर्थात ही गंमत करतेय मी.) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/30/2008 - 01:31 नवीन

मुली नं १च.....

मुली नं १च..... पण मुली नाजूकच असतात हे काय खरं नाय ब्वॉ. आमच्या धाकटीला भेटा एकदा. गैरसमज दूर होतील. विप्रंना डोस दिलाय तिने.... :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 12/30/2008 - 01:38 नवीन

अरेच्च्या!

काय म्हणताय? आपल्या प्रभूसराना? पण ते हात टेकणार्‍यांपैकी नव्हेत. मजा वाटली वाचून. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/30/2008 - 02:22 नवीन

मग काय!!!

काय म्हणताय? आपल्या प्रभूसराना?
अहो त्यांच्यासारखा 'स्पोर्ट' आणि 'सदैव सकारात्मक' विरळाच. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विनायक प्रभू Tue, 12/30/2008 - 17:14 नवीन

1011+

असेच म्हणतो. नतमस्तक विप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धनंजय Tue, 12/30/2008 - 01:10 नवीन

आवडले

भावा-बहिणीचे असे खासच नाते असते असे मी कितीतरी नातेवाइकांकडून ऐकले आहे. (मला बहीण नाही.) तुमची हृद्य आठवण आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/30/2008 - 01:20 नवीन

वा!!!

शितल, छान आठवण, छान लिहिलेली. माझी धाकटी पोट्टी अशीच आलेली आहे आमच्याकडे. :) कालच एका मित्राबरोबर हाच विषय निघाला होता. स्वतःच्याच घरात एकाला दोन असलेले खरंच चांगलं आणि मुलांसाठी खूप हेल्दी असतं. फक्त एकच सुधारणा सांगतो. कधी कधी नकळत्या वयात, वाढत्या वयात भावंडात (विशेषतः भावाबहिणीत) खूप भांडणं होतात, प्रसंगी मारामार्‍या होतात, पण हे सगळं नंतर पाऽऽर विरघळतं. हा माझा स्वानुभव आहे. लहानपणी लग्नांतून वगैरे जेव्हा नवरी मुलगी सासरी जायला निघते तेव्हा होणारी रडारड बघून आम्ही खूप हसायचो. ताईचं लग्न ठरलं तेव्हा मला पूर्ण खात्री होती की मी काही रडणार नाही. पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. पार पचका झाला माझा. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 12/30/2008 - 01:44 नवीन

असा पचका

असा पचका सगळ्याच भावांचा होत असेल नाही? एक किस्सा आठवला. माझ्या मामेबहिणीचं लग्न झालं तेव्हा मामेभाऊ जरा जास्तच रडत होता. तेव्हा ते भाऊजी म्हणाले 'अरे रडतोस कशाला, आपण एकाच गावात तर आहोत. कधीही भेटू शकतो.' मामेभाऊ रडता-रडताच म्हणाला 'म्हणूनच तर रडतोय!' अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/30/2008 - 02:23 नवीन

...

=)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 03:59 नवीन

सेंटी

पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. माझा सुद्धा माझ्या तायांच्या लग्नांत झालेला पोपट आठवला. :( भावंडं, विषेशतः बहिनी हा प्रकारच फारच स्पेशल आहे. आईचं वात्सल्य, बापाचा आधार, भावाची सोबत अन बहिनींची माया... जीवनाला आकार देणारी रसायनं. आपला, (श्रीमंत) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Tue, 12/30/2008 - 01:35 नवीन

छान लेख शीतल.

डोळ्यात पाणी आले. मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच, भरपूर आठवणी आहेत, आता वरचेवर भेटी होत नाहीत अंतरामुळे पण फोनवर बोलणे व्हायलाच हवे. आमच्या मुलाचा दिवसा-दोनदिवसाआड धोशा असतो 'मला ब्रदर किंवा सिस्टर का नाहीये म्हणून?' त्याच्या इतर सर्व आत्ते, मामे, मावस भावंडांची त्याला आठवण करुन द्यावी लागते पण त्याचे समाधान होत नाही. समजूत काढता नाकी नऊ येतात! एकाला दोघे असलेले कधीही चांगलेच असते पण दरवेळी ते शक्य होतेच असे नाही त्यामुळे ती कमी मग मित्र आणि इतर भावंडांशी संपर्क ठेवून पूर्ण करुन द्यावी लागते. आपल्याला जिवाभावाचे भावंड आहे ही भावना मात्र वेगळीच असते हे नक्की! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 04:03 नवीन

मग होऊन जाऊ द्या

अहो, बघताय काय... सामील व्हा!! ;) आपला, (पहिल्या लेकीच्या हट्टासमोर नमते घेऊन दुसर्‍यांदा बाप बनलेला आनंदी) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
निशा Tue, 12/30/2008 - 09:29 नवीन

खुपच छान

लेख खुप छान लिहिला.....लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 12/30/2008 - 09:34 नवीन

छान

छान लिहलं आहेस शितल. शेवटची मोगलीची आठवण तर मस्तच !! - आंद्या बगीरा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 12/30/2008 - 09:49 नवीन

मी

मी नोस्तल्गिक झाले चुचु
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 12/30/2008 - 10:20 नवीन

:)

आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले, ते पाहुन माझे पपा हसु लागले. :)
:) :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 12/30/2008 - 13:02 नवीन

छान

आत्या , छान लिहलं आहेस
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 12/30/2008 - 16:36 नवीन

मस्त

शीतल खरच मस्त लिहिले आहे मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/30/2008 - 16:48 नवीन

भारीच

भावंडे खासच असतात. आम्ही दोघे भाऊ भाऊ च आहोत. त्यामुले मारामारी हा आमचा सर्वात आवडता खेळ. अजूनही घरी गेलो की एकदा तरी एकमेकांच्या उरावर बसतोच. सख्खी बहिण नसल्याने चुलत / मामे बहिणींवर जास्तच प्रेम आहे. बहिणी वीक पॉइंट आहे असं म्हटलं तरी चलेल. नी त्या सुद्धा हे जाणून मला यथेच्छ इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. आणि मी पण आनंदाने बळी पडतो :) एकाला एक भावंड हवंच ह्या मताचा मी आहे. लहानपणी कधीच मित्राची उणीव भावामुळे भासली नाही. त्यात माझे सगळे काका आमच्या लहानपणी जवळ जवळच रहात असल्याने अजुनच धमाल. झक्कास विषय काढलात. भावंडांच्या सगळ्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/30/2008 - 17:03 नवीन

थोडे वायले

चिरंजीव एकदा शाळेतुन आले. वय वर्ष ५.सिनीयर के.जी. चेहेरा जरा तांबडा झाला होता. काय झाले रे तर काही सांगेना. नंतर थोड्या वेळाने आईला विचारता झाला. " तु हॉस्पिटल मधुन दुसरे बाळ आणणार आहेस का"? महेश ची(मीत्राची) आई आणणार आहे. तु आणु नकोस. मला नको. हम दो हमारा एक चा निर्णय पक्का झाला. आता हल्ली हल्ली एक मानस कन्या मिळाली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/30/2008 - 23:00 नवीन

आमच्याकडेही

आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. आम्हीही म्हटले मनात, चला हे एक बरं झालं. आता मात्र अवघड परीस्थिती आहे. रोज एकाच प्रश्नावरून त्याच्याशी चर्चा करावी लागते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/31/2008 - 01:18 नवीन

हम्म्म!!!

हा प्रश्न चर्चेने सुटणार नाही !!! :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
संदीप चित्रे Wed, 12/31/2008 - 07:23 नवीन

असेच म्हणतो !!

सगळेच प्रश्न चर्चेने सुटत नाही; कृतीची जोड आवश्यक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती Wed, 12/31/2008 - 07:42 नवीन

जरा गैरसमज झालाय आपला.

आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं. या वाक्यामधील तो हा माझा मुलगा आहे. माझ्या मुलानेच ठरवले की आपल्याकडे दुसरे बाळ नको. आणि सध्या माझ्या मुलाचा विचार बदलला आहे. बाळही दोन मिनिटात हजर व्हायला हवे आहे. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विनायक प्रभू Wed, 12/31/2008 - 08:41 नवीन

दोन मिनिट

लई भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
लिखाळ Tue, 12/30/2008 - 17:06 नवीन

लेख

लेख मस्त. शेवटचा भावा-बहिणीचा प्रसंग सुद्धा एकदम छान. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 12/30/2008 - 21:35 नवीन

छान

शीतल, आठवण छान. मला बहिणच आहे, पण एकत्र कुटुंब असल्याने सख्खा भाऊ नसणे जाणवले नाही. बहिणींचे नातेही खास असतेच.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 12/31/2008 - 01:11 नवीन

धन्यवाद !

सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :) तुम्हा सर्वाच्या स्वतःच्या लहाणपणीच्या भावंडा बरोबरच्या आठवणी जागा झाल्या हे वाचुन खुप छान वाटले. :)
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि Wed, 12/31/2008 - 05:33 नवीन

लेख खुप आवडला

माझ्याहि लहानपणिच्या आठवणि जाग्या झाल्यात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/31/2008 - 07:49 नवीन

सुंदर

सुंदर लेख..! शितल जियो..! आपला, (एकटा) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 01/01/2009 - 05:03 नवीन

खूपच छान लेख!

शितल, लेख फार आवडला. आम्ही तिघे भाऊ. मावस भावंडात ६ भाऊ आणि ३ बहिणी. नाते सख्ख्या भावंडांसारखे.खूप भांडायचो,खोड्या काढायचो. तू पार नॉस्टालजिक करून टाकलेस बघ!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 01/02/2009 - 16:36 नवीन

फर्मास लेख!

वा! फर्मास लेख! मला एक भाऊ आहे.. त्यामुळे एकमेकांचय भन्नाट खोड्या काढणे, मारामार्‍या, वस्तु ढापणे/लपवणे हे आवडते प्रकार.. विडीयो गेम्स, कंप्युटरवर कोणी बसायचे, कोणाच्या हातात रिमोट ही दैनंदिन भांडणे. :) आता दोघेहि मोठे झाल्याने खोड्या कमी झाल्या आहेत पण अजूनहि एकमेकांना नावांने हाक क्वचितच मारली जाते. हाका मारायला प्राणीसृष्टी मदतीला धाऊन येते. ;) बाकी एकास एक तरी भावंड हवे ह्यास अनुमोदन! (दादा)ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Fri, 01/02/2009 - 17:32 नवीन

छान

लेख छान आहे. मला एक मोठी बहिण जी सध्या अमेरिकेत असते. आम्ही पण खूप भान्डायचो आणि एकत्र यायचो (पुन्हा भाण्डायला) तिच्या लग्नात तर मी खूप रडलो होतो आणि नन्तरचे २-३ दिवस सारखे या खोलीतून त्या खोलीत, मधेच कधीतरी गच्चीत...मधे तिच्याकडे जाण्याचा योग आला. १५-२० दिवस धमाल केली आणि मग इकडे परत येण्याचा दिवस उजाडला. आता पुन्हा एक वर्श तरी भेट नाही या विचारनेच कसे तरी होत होते. विमानात बसल्यावर तर तिची सारखी आठवण येत होती. मग शेवटी तिथले पान्घरूण डोक्यावरून ओढून घेतले आणि पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेतले (हळू आवाजात!!).
  • Log in or register to post comments
स
सुन्या कोकणी Fri, 01/02/2009 - 17:41 नवीन

भावंडे

"शितल तायडे भावनीक झालो ना" ............सुन्या कोकणी
  • Log in or register to post comments
स
समिधा Sun, 01/25/2009 - 11:57 नवीन

छान

शितल ,खरच खुप छान लिहील आहेस, मला ही माझ्या भावाची आठवण आली.आणि माझ्या लग्नाच्या वेळचा प्रसंग आठवला. :( खुप आठवण आली भावाची.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 01/25/2009 - 12:07 नवीन

>>खुप छान

>>खुप छान लिहील आहेस हेच म्हणतो ! सुंदर ! कालच वाचला होता... प्रतिसाद देणे विसरलो होतो ;) ह्यामुळेच माझी तायडी मला बावळट म्हणते... काही ही विसरु शकतो मी ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Sun, 01/25/2009 - 12:21 नवीन

शितल.. खूप

शितल.. खूप छान लिहिले आहेस. मी व माझा भाऊ आम्ही आजी कडे रहायचो... भाऊ बॅन्केत लागला होता व मी शिकत होते... एखाद्या दिवशी मन उदास असतान्ना त्याचा जो मायेने डोक्यावरुन मायेचा हात फिरायचा तो हात आता कधीच नाही फिरणार......मन उदास झाले आहे...... तुमच्या लेखाने परत काहि प्रसन्गाना उजाळा मिळाला.......
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 01/25/2009 - 12:39 नवीन

दुसरे भावंडं!

मला एकच मुलगी आहे आणि तिला स्वतःला भाऊ-बहीण नाही हे तिला खूपच सुखदायक वाटते. आता ती वयानेही मोठी आहे पण तिचे लहानपणापसूनचे ते मत अजूनही कायम आहे. कारण...सगळ्याच गोष्टींवर तिचा अनिर्बंध अधिकार आहे. तिला कोणाचीही स्पर्धा नाही. इतर भावा-बहिणींची भांडणे-वाद पाहून तर ती नेहमीच आपल्याला भावंडं नाही ह्याबद्दल खूश असते. आता बोला! शीतल लेख मस्त आहे. तुम्हा भावा-बहिणीचे प्रेम पाहून अंमळ हळवा झालो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 01/25/2009 - 12:58 नवीन

मोठी बहिण...

मोठी बहिण असणे हे एक वेगळेच सुख. माझी बहिण माझ्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. शाळेतुन तक्रार आली आणि ''पालकांना' घेऊन ये' अशी तंबी मिळाली की मी ताईला (आधीच दम भरुन) घेउन जायचो. शिक्षकांसमोर मला खोटं खोटं रागवायचं आणि घरी प्रकार कळू द्यायचा नाही. हे कर्तव्य ती बंधूप्रेमापोटी करायची . मला तो माझा हक्कच वाटायचा. एकुलती एक बहिण. सासरी निघाली, धो धो रडलो. आजही तिच्याशी तात्विक वादविवाद होतो. पण मी जास्त ताणून धरत नाही. ती मोठी आहे. माघार घेतो. हे सुख माझ्या मुलाला नाही देऊ शकलो. (आता वेळ निघून गेली) असो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा