Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user अभ्या..
Submitted by अभ्या.. on गुरुवार, 12/03/2015 - 15:05
दिव्य पेर्णा : http://www.misalpav.com/node/33935 अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर मी काम करतो. रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर. एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान. गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी स्कीम एखादी मोठ्या कॅम्पेनिंगची काल्पनिक कारंजी उसळतात जाहीरातींचे लेआऊटवर लेआऊट प्रिंटतात नव्या कन्सेप्टची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा रडतो डिझाईनर टेबलावर डोके ठेवून एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो. आर्टिस्ट. व्हिज्युअलायझर, मेंटॉर.

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 12/03/2015 - 15:10

Permalink

हाण्ण तेजायला. काम करू करू

हाण्ण तेजायला. काम करू करू वैतागलेला अभ्य एकदम डोळ्यांसमोर उभा राहिला.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 12/03/2015 - 15:10

Permalink

एजन्सी बदला. ;)

एजन्सी बदला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 12/03/2015 - 15:17

Permalink

वाह !

वाह ! कामसु हुशार होतकरु अभ्या !
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 12/03/2015 - 15:28

Permalink

अरे रे !

अरे रे ! काय डिझाईन बिघडलंय कवीचं... पण कविता मात्र जबर झालीय!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 12/03/2015 - 15:31

Permalink

पुन्हा

नव्याने लिहा "प्रुफे " तपासा, काय जमेल ते तपासा... सभीक्षक नाखु स्वगतः जबरी लिहिलयं... ही खरी वास्तववादी कवीता... बाकी सारं जोडकाम उर्फ जुगाड
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on गुरुवार, 12/03/2015 - 15:31

Permalink

:)

खफवर आत्ताच खरडून आले तेच कॉपी पेस्ट, Thu, 03/12/2015 - 15:24 ऑफिस लौकरात लौकर सोडलं पाहिजे हे कळतंय पण वळवता येत नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 12/03/2015 - 15:58

Permalink

आंतरीक संघर्षाची नेहमीचीच अभिव्यक्ती

अप्रतिम कविता हजारो कॅम्पेननंतर येणारे एखादे ग्रेट डीप्रेशन या कवितेवरुन सर्वात अगोदर माझाच हा शेर आठवला इसकी मांकी, मुझे रोके प्रिंट करनेसे कहां है वो प्रुफ क्लायंट मेरे पीछे है तो डेडलाईन मेरे आगे ग्रेट डीप्रेशन. खरचं इतक्या वेळा ती क्लायंट ब्रीफं वाचलेली पण त्यातुन असे एखादे डीप्रेशन जन्माला येऊ शकते असे कधीच वाटले नाही. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान ही ओळ तर विलक्षणच म्हणावी ही ओळ वाचल्यावरच दोन चार घाणेरड्या शिव्या आल्या भळ्ळकन् ! धन्यवाद अभ्या... जी अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on गुरुवार, 12/03/2015 - 16:11

Permalink

प्रतिभावंतांच्या कथा आणि

प्रतिभावंतांच्या कथा आणि व्यथा. भारी वाटतंय जे काय आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 12/03/2015 - 16:18

Permalink

हेहेहे!!! ;-)

हेहेहे!!! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 17:10

Permalink

मूळ पेर्णा हुच्च असल्याने

मूळ पेर्णा हुच्च असल्याने अजिबात झेपली नव्हती. पण ह्या कवितेतली साध्या सोप्या शब्दांत व्यक्त केलेली डिझाईनरची व्यथा काळजाला भिडली.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 12/03/2015 - 17:29

Permalink

बॉबौ!! असं कधीपासून व्हायला

बॉबौ!! असं कधीपासून व्हायला लागलं अभ्या? =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 18:47

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 18:54

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा

Permalink

तुम्हाला ही कविता झेपली नै

तुम्हाला ही कविता झेपली नै काय? नै एका कलाकाराच्या व्यथेवर अगदी खदखदून हसताय म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 19:09

In reply to तुम्हाला ही कविता झेपली नै by प्रचेतस

Permalink

मी इ डंबना वर हसलो... असो!

मी इ डंबना वर हसलो... असो!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/03/2015 - 19:11

In reply to मी इ डंबना वर हसलो... असो! by अत्रुप्त आत्मा

Permalink

ह्ही ह्ही ह्ही ... हसलेल्याला

ह्ही ह्ही ह्ही ... हसलेल्याला आत्मरंजक वृतीणुसार खदखदून असं आपलं आपणच ठरवून कसं काय घेतल? असो...चालायचेच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/03/2015 - 20:27

In reply to ह्ही ह्ही ह्ही ... हसलेल्याला by अत्रुप्त आत्मा

Permalink

खी खी खी. =))

खी खी खी. =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिव कन्या on गुरुवार, 12/03/2015 - 19:08

Permalink

मूळ पेर्ने वर आत्ताच डोकं

मूळ पेर्ने वर आत्ताच डोकं आपटून आले....तर समोर हे! अभ्या भौ , होतं असं!!! सिद्धेश्वर तळ्याकाठी चक्कर मारून ये. रच्याकने, कविता चांगली आलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 12/04/2015 - 05:14

Permalink

हा हा हा

झकास आहे. विडंबन नाही, याला मी सुडंबन म्हणेन. निओकॉर्टेक्समध्ये अगदीच सन्नाटा असलेल्यांना समजायला सोपे व्हर्जन. शिवाय या निमित्ताने मूळ दिव्य पेर्णा डोळ्याखालून घालण्याचे कष्ट आणखी काही लोकांनी घेतले असतील; त्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 12/04/2015 - 10:56

Permalink

आमेन!

एका मास्टरस्ट्रोक कन्सेप्टच्या जन्माची प्रार्थना करतो.
आमेन!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 12/04/2015 - 11:06

Permalink

धन्यवाद वाचकहो. त्रिवार

धन्यवाद वाचकहो. त्रिवार धन्यवाद. खुद्द निरंजनरावांना आवडली म्हणजे आम्ही हवेतच हो भौ. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 12/04/2015 - 11:11

Permalink

झकास !

खरं तर हे विडंबन वाटत नाही, तर स्वतंत्र अभिव्यक्ती वाटते. पण 'अभ्या..' टच नसलेली.....
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 12/06/2015 - 00:14

Permalink

जबरा

जबरा
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 12/06/2015 - 18:48

Permalink

हृदयस्पर्शक !

हृदयस्पर्शक !
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 12/06/2015 - 19:36

Permalink

बॅट

डोंबिवली फास्ट, सारखी एक बॅट हाताशी ठेवा.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6490 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com