सद्गुरू २
एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: व कष्टी होवून गप्प बसले होते .
ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?'
नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी दुखी: व कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच न ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील .
नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले . त्यांनी त्या कोळ्याला अत्यंत विनयाने विचारले 'ओ उर्नानाभा अष्टपादा , सद्गुरु कसे ओळखावे व ते कसे दिसतात हे मला समजावण्याची आपण कृपा करावी '. कोळ्याने नारद मुनींकडे एक कटाक्ष टाकला व बोलण्यासाठी मुख उघडण्याच्या आतच तो मृत झाला ! नारद मुनींना खूप वाईट वाटले व परतून त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्यास सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले ' काही काळजी करू नकोस पुत्रा! सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत नुकतीच एक गाय व्याणार आहे . तू तिथे जा व त्या नवजात पाडसाला तुझा प्रश्न विचार .ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देयील . नारद पुन्हा पृथ्वीतलावर सहस्त्रगुण राजाच्या गोशालेत आले . तिथे एक गाय एका पाडसाला जन्म देत होती . जन्मताच पाडस उठून उभे राहिले . नारद मुनींनी त्या पाडसाला पुन्हा तो प्रश्न हात जोडून विचारला , पाडसाने एक कटाक्ष नारद मुनींन टाकला व काही बोलण्यासाठी मुख उघडण्या आत ते मृत झाले !नारद मुनी काहीतरी शाप लागण्याच्या भीतीने घाबरून गेले व दुखी: मानाने पुन्हा परतले . त्यांनी सर्व वृतांत आपल्या पित्याला सांगितला . कोळी आणि पाडस माझे मुख पाहताच माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्या आगोदरच मृत झाले .मी इतका का वाईट आहे कि ती दोघे माझ्हे मुख पाहता क्षणीच मृत झाली ? ब्रह्मदेवांनी नारद मुनींना काळजी न करण्याचे आश्वासन दिले व म्हणाले ' नारदा सहस्त्रगुण राजाची राणी एका सुंदर मुलाला लवकरच जन्म देणार आहे तेव्हा तू तिथे जा , ते मुल तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला नक्की देयील '.नारद मुनी सहस्त्रगुण राजा कडे गेले . राजाने त्यांचा आदरसत्कार केला व म्हणाला ' मुनी मला नुकतीच पुत्र prapti झाली आहे तेव्हा तुम्ही त्याला येवून आशीर्वाद द्यावा ' व नारद मुनींना घेवून तो आपल्या महालात गेला . त्या नवजात बालकाला पाहताच जड अंतकरणाने त्याला आपला प्रश्न विचारला . ते नवजात बालक बोलू लागले ' ओ श्रेष्ट नारद मुनी ! आपण मला ओळखले नाही का ? मी तोच कोळी ! माझ्या आयुष्याच्या अन्त्क्षणी तुम्ही मला दर्शन दिले व मी कोळ्याच्या वोनीतून वरच्या योनीत जन्म घेतला व एका गायीच्या पोटी पाडस म्हणून जन्माला आलो ! माझे आहो भाग्य की जन्मताच मला तुमचे दर्शन झाले व तत्क्षणी मी त्या योनीतून मुक्त होवून एका राजकुळात मनुष्य रूपाने जन्म घेतला .तुमची परम कृपा की इथेही तुम्ही मला दर्शन दिलेत व आपल्या कृपेने आता मी मोक्ष पावून या जन्म मरणाच्या बंधनातून कायमचा मुक्त होत आहे '. असे म्हणून ते बालक तत्क्षणीच मृत झाले .
गोष्टीचे तात्पर्य :
सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप असतात , त्यांच्या एका कृपाकटाक्षात सर्व पापांना व संस्कारांना जाळून मोक्ष देण्याची ताकद असते .
ध्यान मुलम गुरुर मूर्ती
पूजा मुलम गुरुर पदम
मंत्र मुलम गुरुर वाक्यं
मोक्ष मुलम गुरुर कृपा .
ॐ श्री सद्गुरुवे नमः
ॐ श्री चैतन्य सद्गुरु गिरीशनाथाय नमः
Book traversal links for सद्गुरू २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१००फिक्स
काय म्हणतो अभ्या, काय करू बोल
merge all layers, save as
Mast
मंथुनि नवनीता तैसे घे अनंता
गुरुवीण अनुभव कैसा कळे
भंकस
भंकस
टिपीकल हरीदासी बंडलबाजी
सद्गुरु हे शुद्ध चैतन्य रूप
विलासराव, लै मनाला लावून नका
येस सर.
अगदी अगदी!!
डांगे साहेब व विलासराव
Kay faltupana ahe ha. Varcha
सुन्दर कथा. आवडली.
सदगुरु काही प्रश्न आहेत
काही प्रश्न आहेत