बाजारात कोथिंबिरीचे ढीग जागोजागी दिसू लागले की कोथिंबिर वड्यांचा बेत हमखास होतो. जपानमध्ये ती दृष्टीसही पडायची नाही. तर जर्मनीत कधीमधी मिळायची, पण हल्ली आमच्या गावात भारतीय, तुर्की, श्रीलंकन दुकानातून चांगली कोथिंबिर मिळते. त्यामुळे हवी तेव्हा कोथिंबिरवडी करता येते. ह्या दिवाळीला खूप वर्षांनी भाऊ भेटणार होता आणि त्याच्या गावात फार कोथिंबिर मिळत नसल्याने त्याच्यासाठी ह्या वड्या केल्या.
तर ह्याकरता लागणारे साहित्य- १ जुडी कोथिंबिर,
१ टे. स्पून तिखट,(तिखटाचे प्रमाण कोथिबिरीच्या प्रमाणानुसार आणि स्वत:च्या जिभेच्या तिखटपणानुसार कमीजास्त करता येईल.)
१ टेबलस्पून जिरेपूड, चवीनुसार मीठ.
३-४ चमचे डाळीचे पीठ, १ चमचा तांदळाची पीठी,
थोडे तेल, खायचा सोडा २ चिमूट.
कृती- कोथिंबिर निवडून, धुवून, चिरून घ्या. त्यात तिखट, जिरेपूड घाला. चमचाभर तेल (गरम न करता) घाला.
३-४ चमचे डाळीचे पीठ (बेसन) घाला. चमचाभर तांदळाचे पीठ घाला चवीनुसार मीठ घाला. पाणी घालून सरसरीत भिजवा. २ चिमूट सोडा घाला व चांगले ढवळा.
कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्या, त्यात हे मिश्रण घाला आणि शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवा.
पूर्ण गार झाले की वड्या पाडा आणि तळा, शॅलो फ्राय करा किवा एअर फ्राय करा.
एअर फ्राय करताना- १८० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा.
वड्यांवर तेलाचा ब्रश फिरवा आणि ६ मिनिटे १८० अंशावर ठेवा. मग उघडून वड्या पलटून परत ३-४ मिनिटे ठेवा.उघडून पहा, वाटल्यास अजून एखादा मिनिट ठेवा.
खमंग आणि कुरकुरीत कोथिंबिर वड्यांचा आस्वाद घ्या.


वाचने
15929
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लासच ताई कोथिंबीरवड्या!!!
किती ते अत्याचार करशील
पुडाच्या वड्या प.
In reply to किती ते अत्याचार करशील by मधुरा देशपांडे
कोल्हापूरच्या पुडाच्या वड्या
In reply to पुडाच्या वड्या प. by मांत्रिक
सहही !
ताई _/\_
काय मस्त दिसतायत. पाकृही थोडी
वा!
छान छान दिसतायत वड्या
आवडली पाक्रु. :)
छान दिसत आहेत वड्या. माझी
एअरफ्रायर असे वाचावे.
In reply to छान दिसत आहेत वड्या. माझी by सानिकास्वप्निल
मस्त!
मस्त ! आवडती वडी !!
अकोला अमरावती यवतमाळ वाशीम
अत्यंत आवडत्या वड्या
मस्त ग
मस्तं चटपटीत पाककृती!
माझ्या आवडत्या आहेत या वड्या
मस्त वडी
कोथिंबीरवडी
खमंग पदार्थ !
मस्त ! :)
+१
In reply to मस्त ! :) by मदनबाण
सं.मं.ला विनंती आहे ,त्यांनी
नवा विभाग करावा असे म्हणायचे
नवा विभाग करावा असे म्हणायचे
हे राम!
मस्त वड्या..
आवडल्या.
वा! मस्तच