चित्र फारच छान आहे. अल्ट्रामरीन हा कोबाल्ट ब्लूपेक्षा जास्त प्रभावी वाटतो आकाशासाठी. पाण्यातली प्रतिबिंबे तरल आली आहेत. वॉश-इन-वॉशवर तुमचे प्रभुत्व आहे. समुद्र आणि आकाश यांना जोडणारी क्षितिजरेषा इतकी सुस्पष्ट क्वचितच असते. ती जरा पुसट दाखवली असती आणि समुद्राचाही रंग त्याला खेटलेल्या आकाशाच्या शेडपेक्षा खूप जास्त गडद नसता तर समुद्र फार दूरवर आहे असा पर्स्पेक्टिव्ह निर्माण झाला असता. फारच छान.
तुमची अजून चित्रे पहायला आवडतील मिपाकरांना. पुचिशु.
चांगलं जमलंय चित्र.पुढच्या पाण्यातल्या खडकाचे प्रतिबिंब ठळक वैशिष्टय आहे.वॅाटरकलरमध्ये असेल तर उत्तमच कारण मूळ चित्र मिलिंद मुळीकच्या "ओपेक कलर" पुस्तकात आहे ते ओपेक कलर वापरून केलेले आहे.फोटोत कळत नसला तरी प्रत्यक्ष डोळ्यांना वॅाटरकलरचा तरलपणा ओपेकपेक्षा जाणवतो.
@एस ते "पुचिशु" विचित्रं वाटतंय पुर्ण वाक्यच हवं.
ओके. पुलेशु प्रमाणेच पुचिशु म्हणजे पुढील चित्रास शुभेच्छा असं म्हणायचे होते. तसा बदल पहिल्या प्रतिसादात सध्याच्या संपादकांना वेळ मिळाल्यास करावा अशी विनंती.
धन्यवाद सगळ्यांना.
मी वॉटरकलर्स मिलिंद मुळीकांच्या पुस्तकांनुसार प्रॅक्टिससाठी काढते.
एस, अल्ट्रामरीन खरंच चांगला दिसेल तिथे. पर्स्पेक्टिवची प्रॅक्टिस करते आहे.
तुमची चित्र खूप सुंदर आहेत, तुमच्याकडून कौतुक म्हणजे भरून पावलं :)
पैसा, थोडी पर्स्पेक्टिवची गडबड आहे म्हणून तसं वाटत असेल.
आदुबाळ, फोटोची साइज कमी केल्यामुळे टेक्श्चर नीट दिसत नाहिये.
कंजुस, बिंगो! तेच चित्र आहे पण मी वॉटरकलर वापरले आहेत..
एक एक करून अपलोड करीन आता..
ओकेटोके.
खालच्या डाव्या बाजूचा भाग जमलाय अगदी.
सजेशन म्हणले तर एकचः प्लीज, प्रॅक्टीस करायचीच असेल तर अगदी घराशेजारचे का असेना पण अॅक्चुअल बघून काढा. चित्र पाहून नको. ;)
प्लीज, प्रॅक्टीस करायचीच असेल तर अगदी घराशेजारचे का असेना पण अॅक्चुअल बघून काढा. चित्र पाहून नको.
अभ्या सर , आपण चित्रकला कशी शिकावी ह्यावर एखादी छानशी लेखमाला का बरे लिहित नाही !
आम्ही गणिताचे विद्यार्थी असल्याने अम्हाला चित्रकला कधी जमलीच नाही हो , आम्हाला कंपास अन पट्टी अन रोलर असल्या शिवाय साधी सरळ रेषही काढता येत नाही :(
एखादे छोटुस्से सजेशन काय दिले, तुम्ही तर आमचा बाजारच ऊठवला पोपशास्त्री.
केवळ एका लाल रंगाच्या अगणित शेड्स दाखवणार्या कलाकाराला मार्गदर्शन करायची आमची औकात नाही. ;)
पुस्तक हे तंत्र शिकण्यासाठी आहे.कल्पना तुमचीच हवी.आता त्या चित्रात रोख पाण्यांल्या धोंड्यावर आहे अथवा दुसरीकडे काचेची /स्टीलची भांडी आहेत तर तुम्ही काहीतरी वेगळा धोंडा,वेगळी होडी,वेगळी भांडी घ्यावी ही अपेक्षा आहे.पुण्यापासून समुद्र दूर आहे तर इंद्रायणी नदी घ्या.घरांसाठी पेठा आहेत.
तंत्र जमले आहे हे पुन्हा सांगतो पण चित्र हुबेहुब तेच नको अथवा उल्लेख तरी करा ३४ पानावरचे या पुस्तकातले चित्र इत्यादी.
कंजूसकाका प्लीज.
असे सांगितले की राग येतो/वाईट वाटते नवोदीत चित्रकारांना. हा माझा अनुभव आहे.
बघून चित्र काढणे ह्या पध्दतीत परस्पेक्टीव्ह कायमचे गंडते. शॅडोचा अंदाज येत नाही.
मुळिंकाचे डेमो आमच्या कॉलेजात असताना त्यांचा हाच सल्ला एकल्याचे स्मरते.
अभ्या, राग नाही आला, पुढच्या वेळी नक्की स्वतः काढायचा प्रयत्न करेन.
कंजूस,ओके. आता कुठल्याही पुस्तकातून बघून केलं तर नाव नक्कीच देईन. लपवण्याचा हेतू नव्हता..
प्रतिक्रिया
खूप छान आहे चित्र ...........
मस्त!
मस्तं चित्र! आवडलं.
मस्त चित्र!
चित्र आवडले
आवडले.
वाहव्वा! झकास!
झकास चित्र!!!
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा ... :- Ustad Imtiaz Ali Riaz Aliचांगलं जमलंय चित्र.पुढच्या
+१
ओके. पुलेशु प्रमाणेच पुचिशु
वा !! सुरेख.
धन्यवाद सगळ्यांना.
ओकेटोके.
प्लीज, प्रॅक्टीस करायचीच असेल
एखादे छोटुस्से सजेशन काय दिले
अभ्या, धन्यवाद. बाहेर जाता
ओकेओके. नो प्रॉब्लेम. कीप
पुस्तक हे तंत्र शिकण्यासाठी
कंजूसकाका प्लीज.
चितर आवडले :)
अभ्या, राग नाही आला, पुढच्या
चित्र आवडले.
थांबतो.या महिन्यात आणखी एक