आई:- मग काय ठरलं तुझं? इतक्या पाहिल्या आतापर्यंत... कुठली पसंत पडतेय का? तुझ्या मनात दुसरी कुठली असेल तर स्पष्ट सांग बाबा.
मी:- (मनाचा हिय्या करून) होय आई... ठरलंय माझं.
आई:- (सुस्कारा टाकत) वाटलंच मला... बोल कोणती? नाव काय तिचं? आणि कुठे भेटली तुला?
मी: "अंजली".. अगं मागे नाही का एका दुकानात गेलो होतो आपण? तिकडेच पाहिली होती तिला. तुही म्हणाली होतीस बरी वाटतेय नई!!
आई:- अरे माझ्या कर्मा!! ती अंजली!! त्या गुजरात्याची!! काय एव्हढ बघितलंस तिच्यात? ऐकलं आहे मी तिच्याबद्दल.. काही कामाची नाही ती!
मी:- अगं आई तू आता पूर्वीसारखी अढी मनात ठेवू नकोस. आता जमाना बदलला आहे. नव्या विचारांची आहे ती! माझं जमेल तिच्याबरोबर काळजी नको करूस.
आई:- अरे काळजी वाटते म्हणून तर बोलते ना मी!!.. मागे अशीच नव्या विचारांची की काय ती घेऊन आलास आणि केला ना तुझा विश्वासघात!! किती रडलास आठवतंय ना?
मी:- नाही आई!! ह्यावेळेस नाही होणार तसं. आणि तू कितीही विरोध केलास तरी मी आता अंजलीशिवाय राहू शकत नाही.. मी तिला घरी आणणार आणि माझ्याबरोबर फॉरेनलाही घेऊन जाणार.…आपण असं करूयात का? तु वाटल्यास थोडेदिवस तुझ्यासोबत ठेव.. बघ तुला नक्की आवडेल ती.
आई:- कसं जमणार माझं? तिची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी. नको रे बाबा. आणि सगळ्यांना, तुझ्या त्या फेसबुक फ्रेंड्सना कधी सांगायचं ठरवलंयस?
मी:- आधी नको.. जरा रुळू देत तिला मग सांगतो सगळ्यांना.
आई:- बघ माझे अनुभवाचे बोल आहेत. नाद सोड त्या अंजलीचा.
मी :- नाही आई.
आई:- अरे राजा ऐक!!
मी:- नाही!! नाही म्हणजे नाही.
आई:- मग भोग आपल्या कर्माची फळे!! आणि रडत बस… म्हणतात ना "मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी!!
.
.
.
.
.
.
.
.
.
तर मंडळी!! आम्ही मिया-बिवी ने म्हणजे मी आणि कीर्ती ने सगळ्यांचा विरोध मोडून काढत "आत्माराम पटेल" ग्रुपच्या "अंजली किचन वेअर" ब्रांडच्या कांदा चिरायच्या माशिनीला घरात आणलं आणि पहिल्या वापरातच आईची भविष्यवाणी खरी ठरली..
ह्या अंजलीने पहिल्या वापरताच रडवलं अक्षरशः!!
कांद्याचे मीडियम तुकडे केल्याशिवाय पठ्ठी कामच करत नाही! आणि साफ करण्यात एव्हढा वेळ जातो की त्या वेळात अजून 10 कांदे चिरून होतात... आणि पँप्लेटमधे चांगल्या वापरासाठीच्या धमक्याही बऱ्याच.
च्याआयला!! आपली सुरीच बरी!! आईचं ऐकलं असत तर हि ब्याद गळ्यात तरी पडली नसती.
वाचने
9570
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाजीप्रभू आयडी घेऊन कांदे
प्रतिसाद आवडला.
In reply to बाजीप्रभू आयडी घेऊन कांदे by अभ्या..
हूह ! कहानी मी ट्विस्ट
धन्यवाद!
In reply to हूह ! कहानी मी ट्विस्ट by पियुशा
:)
:) मजेदार आहे.
च्यायला =)) कांदेखिंडीची लढाई
कांदेखिंडीची लढाई =))
In reply to च्यायला =)) कांदेखिंडीची लढाई by बॅटमॅन
खिंडीची लढाई =))
In reply to कांदेखिंडीची लढाई =)) by कपिलमुनी
वाजलेलं दिसतय.
शंभर टक्के खरी बात. अशा
सहमत
In reply to शंभर टक्के खरी बात. अशा by गवि
+१००
In reply to शंभर टक्के खरी बात. अशा by गवि
वैज्ञानिक खेळणी, ढेरी कमी
In reply to +१०० by सस्नेह
"विज्ञानाचा चमत्कार- अनोळखी
In reply to वैज्ञानिक खेळणी, ढेरी कमी by गवि
माझ्याकडे एक चारचाकी
In reply to "विज्ञानाचा चमत्कार- अनोळखी by बॅटमॅन
मसाजमेकर वाचूनच फुटलो =))
In reply to माझ्याकडे एक चारचाकी by सस्नेह
त्या गाडीला तो एकच शब्द योग्य
In reply to मसाजमेकर वाचूनच फुटलो =)) by बॅटमॅन
मी पाहीलेलं हाय असलं प्रदर्शन
In reply to माझ्याकडे एक चारचाकी by सस्नेह
लिहिलंत, बरे झाले. पैसे वाया.
In reply to मी पाहीलेलं हाय असलं प्रदर्शन by अभ्या..
एक पार्किंग
In reply to माझ्याकडे एक चारचाकी by सस्नेह
हो हो. हायवे ढाब्यांवर खूप
In reply to "विज्ञानाचा चमत्कार- अनोळखी by बॅटमॅन
पॉपकॉर्न मेकर? यासाठी यंत्र
In reply to +१०० by सस्नेह
१००% सहमत
In reply to शंभर टक्के खरी बात. अशा by गवि
रोटीमेकर... फसव प्रकरण..
रोटीमेकर
In reply to रोटीमेकर... फसव प्रकरण.. by जेपी
अंजली
:)
हुरोम
हुरोम
In reply to हुरोम by योगी९००
स्लो ज्यूसर? आँ?!! स्लो कुकर
In reply to हुरोम by योगी९००
भाजीप्रभु, चांगलय आसच चालु
:)
आमची प्रेमळ हिस्ट्री
खि खि खि.. रोटी मेकर ने अशीच
हा हा हा!
मस्तानी किधर हय?
कचऱ्याच्या डब्यात
In reply to मस्तानी किधर हय? by DEADPOOL
बाजी नावाची किमया
छान!
धन्यवाद!
In reply to छान! by स्वाती दिनेश
हा हा!छान !
धन्यवाद!
In reply to हा हा!छान ! by इशा१२३
मस्तच हं