Skip to main content

शेअर ट्रेडिंग कोर्स

लेखक पथिक
मंगळवार, 24/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मराठीतूनही समजावून सांगतील असा, कोथरूड, सिंहगड रोड भागात एखादा चांगला शेअर ट्रेडिंग कोर्स आहे का ? (टीप - शेअर किंवा अन्य कुठल्याही आर्थिक बाबींच्या देवाण घेवाणीशी मिपाचा काहिही संबंध नाही. याबाबतीत मिपाने दिलेले निवेदन वाचावे. - नीलकांत)

वाचने 5535
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

शेअरबाजार विषयक कोर्सचे माहित नाही...खरे तर प्राथमिक माहिती घेवुन स्वानुभव घेणे (आणि कोर्सची द्यावी लागणारी फी भांडवल म्हणुन वापरणे) अधिक श्रेयस्कर, उगी गादीवर पडुन पोहोण्याचे ट्रेनिंग कशाला घ्या ?? असा माझा बाळबोध विचार होता, जो मी अनेक वर्षांपुर्वी अंमलांत आणला होता. आणि हो... माझे कार्यालय सिंहगड रोडवरच आहे. ,

In reply to by पथिक

मार्गदर्शन वगैरे शब्द फार मोठे आहेत हो... तेवढा अधिकार नाही माझा. काही छोटी मोठी मदत करु शकेन.

शेअरबाजार आणि अनुषंगिक ताज्या घडामोडी यावर मी माझ्या कुवती व आकलनानुसार WAच्या माध्यमातुन भाष्य करित असतो. यात रस असलेल्या कोणी मला व्यनी करुन आपले नाव व भ्रमण्धवनी क्र. देवुन विनम्ती केल्यास त्यांचा माझ्या यादीत समावेश करावयास आवडेल. अर्थात मी फक्त माझे स्वतःचेच अथवा अर्थविषयक महत्वाचेच पोस्ट करीत असल्याने अन्य सदस्यांसही GM/GN..RIP या वर्गातले वा ढकलपंची पोस्ट सक्तीने वर्ज्य आहेत.

डॉ. दिपक गोखले पुणे ९८२२० ६८८४० (बेसिक फ्युचर अ‍ॅन्ड ऑप्शन्स टेक्निकल अ‍ॅनालिलीस) माझा स्वतःचा अनुभव नाही पण खूप लोकांकडून ऐकले आहे. उत्तम कोर्स आहे भारतात असेन तेव्हा जॉइन करायचे असे ठरवतॉ आहे. फोन करून तर बघा.

Dr. Deepak Gokhale Share Market Classes 1116/B, Ganga NIwas, Near Nimbalkar Talim Chouk, Opp. Gambhir's Classes, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 www.sbcmsolutions.com

छंद म्हणून कि व्यवसाय म्हणून? शिवाय तुम्ही ट्रेडिंग म्हणताय, मी इन्वेस्टर असल्याने फारशी मदत करू शकणार नाही.