प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग २
पहिल्या भागात आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसाराला कशी सुरवात झाली आणि भारतीय शास्त्राध्यापक तिबेटपर्यंत कसे पोहोचले ते पाहिले.
या भागात आपण चीन आणि इतर आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला ते पाहुया.
हान राजघराण्यातील 'मिंग ती' या सम्राटाच्या आमंत्रणानुसार इ. स. ६७ मध्ये 'कश्यप मार्तंग' आणि 'धर्मरक्षित' हे दोन भारतीय विद्वान चीनमध्ये गेले आणि त्यानंतर नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला आणि ओदान्तपुरी येथील अनेक विद्वान तेथे पोहोचले.
ख्रिस्त पश्चात चौथ्या शतकात 'वी' राजघराण्यातील सम्राटाने बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून घोषित केला. त्यावेळी तिथे असलेले 'आचार्य कुमारजीव' यांना सम्राटाने संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत अनुवाद करण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद केला असे सांगितले जाते.
अत्यंत प्रसिद्धी पावलेले आणखी एक विद्वान योगी म्हणजे 'बोधिधर्म' किंवा चीनी भाषेमध्ये 'दा मो' (ख्रिस्त पश्चात ५ वे ते ६वे शतक)
- 'शाओ लीन' या प्रसिद्ध बौद्ध मठाचे मठाधिपती, 'शाओ लीन कुंग फू' या जगप्रसिद्ध स्वसंरक्षण युद्धकलेचे जनक, आणि 'चान' (प्रत्यक्षात 'ध्यान') किंवा जपानीमध्ये 'झेन' या बौद्ध धर्माच्या शाखेचे संस्थापक म्हणून ते विद्वान जगतामध्ये तसेच जनसामान्यांमध्येही तितकेच प्रसिद्ध आहेत.
बोधिधर्म यांच्या जीवनावर अलीकडेच एक भारतीय चित्रपटही येऊन गेला.
ख्रिस्त पश्चात तिसऱ्या शतकात भारतीय बौद्ध विद्वान चीन देशालगतच्या कोरिया मध्येही जाऊन पोहोचले. प्रथम बौद्ध महंत 'सुन्दो' हे इ. स. ३५२ मध्ये बुद्ध प्रतिमा आणि बौद्ध सुत्रांसहित येथे पोहोचले. त्यानंतर आचार्य मल्लानंद आणि अनेक बौद्ध विद्वान येथे येऊन पोहोचले. त्यांनी 'प्योंग यांग' येथे दोन बौद्ध मठांची स्थापना केली, त्याचबरोबर भारतीय तत्वज्ञान, शिल्पकला, चित्रकला, धातूविज्ञान व धातूकला यांचा प्रसार केला.
त्यानंतर अनेक कोरियन विद्वान देखील भारतात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. भारतीय विद्यापिठांतून त्यांनी खगोल शास्त्र, फलज्योतिष, वैद्यक आणि इतर शाखांमधून अभ्यास केला.
'चान' (ध्यान योग) ख्रिस्त पश्चात आठव्या ते नवव्या शतकात कोरिया मध्ये येउन पोहोचला. कोरियन राजे, राण्या, मंत्री आणि योद्धेदेखील ध्यान योगाचा अभ्यास करित असत.
बौद्ध धर्माचा आणि त्यायोगे भारतीय संस्कृतीचा प्रवेश जपान मध्ये इ.स. ५५२ मध्ये झाला असे मानले जाते. त्या काळच्या कोरियन सम्राटाने जपानच्या सम्राटाला बुद्ध मूर्ती, बौद्ध सूत्रे, पुजेची साधने, कलाकार, चित्रकार आणि स्थापत्यविशारद इ. भेट म्हणून पाठवले आणि त्यातून जपान मध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला असे म्हंटले जाते.
त्या आधीही संस्कृत भाषा जपानमध्ये पवित्र भाषा मानली जात होती. अनेक जपानी विद्यार्थी संस्कृतचे शिक्षण घेत होते. ज्या जपानी लिपीमध्ये सूत्रे लिहिलीजात असत, त्याला 'शित्तन' म्हंटले जाते. या शब्दाचा उगम 'सिद्धम' या शब्दापासून झाला असे मानले जाते.
सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला पाठविले हे तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील प्रमुख धर्म आहे हेही आपल्याला माहित आहे.
ख्रिस्त पश्चात पहिल्या शतकापासून भारतीय व्यापारी, ब्राह्मण वर्ग (शिक्षक आणि उपाध्याय), कारागीर आणि कलाकार म्यानमार (ब्रह्म देश) येथे स्थायिक व्हायला सुरवात झाली. म्यानमार किंवा ब्रह्म देश हा चीनच्या सागरी मार्गावरील पहिला देश असल्यामुळे भारतीय बंदर शहरांमधील लोक, म्हणजे अमरावती, ताम्रालीप्ती इत्यादी शहरांमधील लोक ब्रह्म देशात स्थलांतरित झाले. नजीकच्या काळापर्यंत ब्रह्म देशात दरबारी अधिकारी वर्गात पंडित (पोन्ना) म्हणजे मणिपूरमधून स्थलांतरित झालेल्या ब्राह्मण वर्गाचा भरणा असे. अकराव्या शतकापासून म्यानमारमध्ये बौद्ध धर्माचे प्राबल्य निर्माण झाले.
त्याचप्रमाणे थायलंड (पूर्वीचे सयाम, सुवर्णभूमी) येथेही भारतीय व्यापारी, ब्राह्मण आणि इतर कामे करणारे लोक ख्रिस्त पश्चात पहिल्या शतकापासून स्थलांतरित झाले. यामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्मागुरुंचाही समावेश होता. त्यामुळे येथील समाजजीवनावर हिंदू संस्कृतीचा, रामायण, महाभारत इत्यादींचा मोठा पगडा होता. थायलंडमध्ये तिसऱ्या व चौथ्या शतकात हिंदू आणि बौद्ध मंदिरांचे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. तेथील शहरांची नावेही भारतीय (आता अपभ्रंशीत) आहेत - कांचनबुरी (कांचनपुरी), राजबुरी (राजपुरी), लोबुरी (लवपुरी), प्राचीनबुरी (प्राचीनपुरी), सिंघाबुरी (सिंहपुरी), अयुथ्थिया (अयोध्या) इत्यादी.
याद्या
6405
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती
भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती
लेख आवडला, संदर्भ नमुद
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती
In reply to लेख आवडला, संदर्भ नमुद by माहितगार
म्हणजे ??
किमान या लेखात -लेखन ससंदर्भ
In reply to म्हणजे ?? by अर्धवटराव
असेल असेल
In reply to किमान या लेखात -लेखन ससंदर्भ by माहितगार
महानता
वाचतोय. भारतीय संस्कृतीचा र्
बौद्ध धर्म अहिंसक असल्याने भारतावर आक्रमणे झाली
मग चीन व जपान ही बौद्ध असुनही
In reply to बौद्ध धर्म अहिंसक असल्याने भारतावर आक्रमणे झाली by मोगा
त्यामुळे येथील समाजजीवनावर
भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती
In reply to त्यामुळे येथील समाजजीवनावर by माहितगार
भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती