पुणे ओरिगामी कट्टा – चित्रवृत्तान्त
|| श्री गुरवे नम: ||
पुणे ओरिगामी कट्टा – चित्रवृत्तान्त
रविवारी २२ तारखेला पुण्याला जायचा योग अनेक वर्षांनी आला. सप्टेंबरमध्ये भाजे लेणी कट्ट्यादरम्यानच ठरवलं होत की पुण्याला नोव्हेंबरमध्ये ओरिगामी प्रदर्शन मिपाकरांना दाखवायला पुण्यात यायचं. त्याप्रमाणे ट्रेनची तिकीटंही काढली. कट्ट्यासंबंधी धागाही मिपावर झळकला. प्रचेतसने स्टेशनवरून मला उचलून (म्हणजे पिक अप करून) आम्ही प्रदर्शनस्थळी पोहोचलो, तेव्हा काही मिपाकर तिथे आधीच पोहोचले होते. दूरदूरहून - अगदी नदीपलीकडहूनही मिपाकर आले होते. मग सर्वांना प्रदर्शन दाखवायला सुरुवात केली. प्रदर्शनात मांडलेल्या ओरि-कलाकृतींपेक्षा मी मिपाकरांचेच फोटो काढले. इतर मिपाकरांनी ओरि-कलाकृतींचे फोटो काढले आहेत, ते इतर मिपाकर टाकतीलच.
विविध प्राणी आणि मिपाकर
डावीकडून वरद (चि. नाद खुळा) त्याची छोटी बहीण, तिच्यामागे बॅटमॅन, प्रचेतस, कॅप्टन जॅक स्पॅरो, मागे पगला गजोधर, नाखुकाका आणि (झोपलेल्या पिल्लूसह) ५० फक्त. (बॅटमॅनच्या मागे ओरिगामी मित्रचे देवकर.)
प्राण्यांमधले ‘दैत्य’ : ड्रॅगन आणि डायनोसॉर
एव्हाना अत्रुप्त, अद्द्या, प्रगो अवतरले होते. नंतर सूड उगवला.
डावीकडून पगला गजोधर, अत्रुप्त, सुधांशुनूलकर, बॅटमॅन, प्रचेतस, नाखुकाका, प्रगो, अद्द्या
पक्षी आणि कीटक
आम्ही सर्व जण प्रदर्शन बघत होतो, फोटो काढत होतो, तेवढ्यात अगदी अचानक विमे तिथे आले. त्यांना भेटून आनंदित मिपाकर.
कुसुदामा आणि विविध आकाराची पात्रं, फूलदाण्या इ.
प्रदर्शन बघून सगळे - अगदी अत्रुप्तसुद्धा - 'त्रुप्त' झाले. मग काही जणांनी निरोप घेतला. आता कट्ट्याचा दुसरा अध्याय – खानपान. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते, त्यामुळे ‘रस्सा’ या जवळच्याच भोजनालयाकडे पावलं आपसूक वळली. बसायला भरपूर जागा असल्यामुळे, स्थानापन्न होऊन मिपागप्पांना सुरुवात झाली. त्यात भर घालण्यासाठी, आपली सर्व वैयक्तिक कार्य संपवून बिपीन कार्यकर्तेही सामील झाले.
डावीकडून बिपीन कार्यकर्ते, अद्द्या, कॅप्टन जॅक स्पॅरो, विमे, प्रचेतस, त्यांच्यासमोर सूड, (शेजारी रिकामी खुर्ची - सुधांशुनूलकर), बॅटमॅन आणि प्रगो. महाभारतापासून इंद्रायणी भातापर्यंत, इतिहासापासून आधुनिक भारतापर्यंत अनेक विषय चर्चिले गेले. (थोडक्यात म्हणजे, मी आणि सूड गप्प होतो.) औरंगजेब आणि इतर काही मुघल राज्यकर्ते खरोखरच कसे मेले, याबद्दल बिपीन कार्यकर्ते यांनी मौलिक आणि गोपनीय माहिती पुरवली. (ती गोपनीय असल्यामुळे इथे उघड करता येत नाहीये.) या चर्चांबरोबरच पुढ्यातल्या कोंबडी-बकर्यांना सद्गती देण्याचं काम सुरू झालं.
मस्त जेवण झाल्यावर सर्वानुमते जवळच्याच इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. बाहेरच दोन रिकामी बाकडी बघून तिथेही गप्पांचा फड रंगला. शेवटी घड्याळाकडे लक्ष जाताच, आपल्याला मुंबईची ट्रेन पकडायची असेल तर ताबडतोब निघालं पाहिजे ही जाणीव झाली. आम्ही दोघे मुंबईकर रिक्षाने स्टेशनाच्या दिशेने (सवयीप्रमाणे) धावत सुटलो. रात्री घरी पोहोचल्यावर थोडंसं खाऊन अंथरुणावर अंग टाकलं आणि लागलीच झोपेच्या अधीन झालो.. पुढच्या कट्ट्याची स्वप्नं पडायला लागली होतीच...
प्रतिक्रिया
वा वा!
माझं अत्यंत आवडतं गाणं...
मस्त कट्टा!
त्रोटक पण सुंदर वृत्तांत !
प्रदर्शनाची बातमी कळताच सकुसप
हे हॉटेल कुठेशी आहे? तिलक
माझ्या अंदाजाप्रमाणे हे
यायची आणि
अटेन्टीवनेस
=))
मस्तच वृत्तांत .
अरे वाह, मस्तं कट्टा झालेला
हा कट्टा मिसवला ;)
झकास वृ.
मस्त झाला कट्टा!! जेवत असताना
मस्त झालेला डिस्टोय कट्टा.
स्वल्पविराम योग्य जागी द्या
कट्टा छानच झाला.
मुंबई ओरिगामी कट्टयाला
ब्याट्याने सविस्तर लिहिलंच
+१
वाह छान झालेले दिसतय प्रदर्शन
मस्त झालाय कट्टा व्रुतांत पण
ते वेटर ला १६ प्रकार चे
खिक्, अजुन फोटु असतील
कलाकारी बहारदार कट्ट्याचा
धन्यवाद.
तुम्हाला भेटायची आणि तुमच्या
वृत्तांत आवडला. रच्याकने
मस्त वाटलं सगळे फोटो बघून. :)
फोटो आवडले. विविध डायनोसोर व
झकास वृत्तांत.
अरेरे! पुन्हा एक चांगला कट्टा
चांगला झालेला दिसतोय कट्टा.
वॄतांत आवडला !
छानच !!
कट्टा भारीच झाला की. पण मला
आमचं
कट्ट्याला यायची फारच इच्छा
*काही कामांमुळे
कट्टा जोरदार झालेला दिस्तोय.