मिपावरील अतीरूंद काथ्या - मुख्यत्वे जिलब्या - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:त गुंफलेले निव्वळ ट्यार्प्यार्थी टाइमपाशे रेचक(?)
कोणाच्याच जिलब्यांबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या टाईमपासचा मार्ग असू शकतो.
माझ्या मते या अर्ध्या भोकाच्या जिलब्या मिपाला मानसिकदृष्ट्या असहिष्णू करण्याचे काम करत आहेत; समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.
रोजास किमान एक अशा वर्षानुवर्षे(डू आय डी मोजल्यास) तेच ते आंबलेले पीठ घोळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. ताजे पीठ घेऊन मोजक्या पण गुणवान वेढ्यात स्वादिष्ट जिलब्या असे असायला हवे. पण त्याऐवजी खवय्यांना आंबीलचे व्यसन लावण्याचे आणि बद्धकोष्ठ बनवण्याचे काम केले जाते या न पचणाऱ्या अतीरूंद काथ्यांमुळे.
तेव्हा किमान शंभर प्रतिसाद हे जंत-रीक वा स्वार्थीक कारण असो की इतर काही, हे स्वत:मधे गुरफटलेले लेखकच या गुंत्याला जबाबदार आहेत यात शंका नाही.
एरवी कोणत्याच जिलब्या कमी दर्जाच्या नसतात. पण हे लेंड्याघोळू धागीक (खरे तर धागीक म्हणायला हे नालायक - लेंड्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. लेंड्या-गीक्स – लेंड्या घोळणारे गीक्स).
चर्चा-मंचनाच्या नावाखाली सतत आपलेच किंवा दुसऱ्यां खरकट्या पानातून उचललेले न पचणारे खडे, शिळ्या पीठाचे बोंडले, तेचतेचपन्हे, अतीचीतेलकटपणा, अबरटचरबट इनो-द या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच मंचनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा तळण केले असते का? त्यामुळे असे नरड्यात कोंबले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे.
स्वादिष्ट जिलब्या दिल्या तर कोणाला नको आहेत? मिपावर चरण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी त्यां जिलब्या खाल्ल्या काय आणि न खाल्ल्या काय, काय फरक पडतो?
कोणी म्हणेल, की टाकल्याटाकल्या न खाण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुनिग्रही आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिल्या तरी ओठ बंद करू शकतील. मात्र येथे बहुसंख्य खवय्ये तेवढे निग्रही नसतात. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधील खवय्यांच्या अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा शिळ्या जिलब्या खादाडांना मठ्ठा पिलवतात, स्वत:ची पचनशक्ती गमवायला भाग पाडतात, जिलब्या पाडणाऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांची खाज जिरावी म्हणून जिलब्यांच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक मिपाचे गुन्हेगारच आहेत.
जे मनापासून घोळले ते टाकले.
शीर्षकातील रेचक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना रेचक म्हणावे तरी कसे यासाठी आहे.
आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....टाकणारे टाकतात, खाणारे खातात, माझे काय जाते, जिभेचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल टीवीवर डिबेट पहा, तुला कोणी थांबवलेले आहे.....यात रेचकाचा दोष नसतो, कां तर ते तुमच्या पोटात जसा दबाव असेल तसे काम करत असते ..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहाण्यास आवडेल.
वाचने
5168
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
जमलं नै !
जगावर सांगितलेला हक्क
In reply to जमलं नै ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to जगावर सांगितलेला हक्क by मारवा
लिंक वगैरे द्या की त्या
In reply to बिरुटे सर by मारवा
जव्हेर जी
In reply to लिंक वगैरे द्या की त्या by जव्हेरगंज
मग व्यनि काय कामाचा!! द्या
In reply to जव्हेर जी by मारवा
एक दिवस घेऊ
In reply to लिंक वगैरे द्या की त्या by जव्हेरगंज
हाहा
In reply to बिरुटे सर by मारवा
अशी कशी झाली दैना?
आमच्या कार्यालयाच्या खाली मदर
लय भारी बेअरींग पकडलय तुम्ही!
In reply to आमच्या कार्यालयाच्या खाली मदर by विवेकपटाईत
विवेक जी ते मिष्टी पण फार छान
In reply to आमच्या कार्यालयाच्या खाली मदर by विवेकपटाईत
त्याला मिष्टी दोही म्हणतात.
In reply to विवेक जी ते मिष्टी पण फार छान by मारवा
आपण स्वत: देखील इथे जिलब्या
अपेक्षित च्या ऐवजी उपेक्षित
बरेच जणांनी तुम्हाला काय
चला, निदान एक तरी उपेक्षित
In reply to बरेच जणांनी तुम्हाला काय by मांत्रिक
अरेच्चा काय चूक झाली कळलं
In reply to चला, निदान एक तरी उपेक्षित by अरुण मनोहर
लाईक !
In reply to अरेच्चा काय चूक झाली कळलं by मांत्रिक
अशा आईडीला
In reply to अरेच्चा काय चूक झाली कळलं by मांत्रिक
एवढी मेहनत घ्यायची गरज नव्हती
अरुण काका
पिंगा बद्दल पण माझे हेच मत
In reply to अरुण काका by पैसा
भाई, अनकुथ म्हणजे काय?
हायला हे भारी आहे. आत्ता
विशाल ही घे स्पे. मिपाजिल्बी.
In reply to हायला हे भारी आहे. आत्ता by विशाल कुलकर्णी
अभ्या
In reply to विशाल ही घे स्पे. मिपाजिल्बी. by अभ्या..
:)
अरे ते टा.कु. च्या पुष्प -