मेदुवडे एअर फ्रायर मध्ये प्रायोगिक तत्त्वावर केले, पण अजून चांगले कसे होतील ह्यावर प्रयोग चालू होते. मेदुवडा मेकर ह्या नावाखाली शोधत असता गुगलबाबाने डोनटमेकर आणि डोनट मोल्ड दाखवले. म्हणून मग डोनट मोल्डचा वापर करून वडे केले. ते बरे झाले, पण चांगले नाही. म्हणून मग परत दुसर्या मोल्ड मध्ये करून पाहिले. ते छान झाले. म्हणून ही मेदुवडे रेसिपी शेअर करते आहे.
वड्यांसाठी:- २ वाट्या उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, उडदाचे पीठ १- २ चमचे
ओल्याखोबर्याचे लहान तुकडे ,कढिलिंबाची ५-६ पाने- बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या- बारीक तुकडे करून, थोडी मीरपूड किवा ५-६ मिरे ठेचून
तळणीसाठी तेल किवा एअर फ्रायर
उडदाची डाळ ४ ते५ तास भिजत घाला, त्यातच मेथ्याही घाला. नंतर जाडसर भरड वाटा. वाटताना कमीतकमी पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. वाटलेले पीठ हाताने उभे वरखाली करून भरपूर फेसा म्हणजे ते हलके होईल. त्यात खोबर्याचे तुकडे, मिरपूड किवा ठेचलेले मिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,कढिलिंबाची बारीक चिरलेली पाने घालून परत एकदा चमच्याने फेसा.
कितीही कमी पाणी घालून वाटले तरी ते नीट वाटले जायला थोडेफार पाणी कमीजास्त करावे लागते अशावेळी सगळे पीठ वाटून झाले की त्यात चमचा दोन चमचे उडदाचे पीठ घाला. त्याने पीठाला घट्टपणा येईल. (ही माझ्या एका मद्रदेशीय मैतरिणीची टीप)
तेल तापत ठेवा. हात पाण्यात ओला करून घ्या आणि हातावर वडा तयार करून मध्ये गोल भोक करून तळणीत टाका. तांबूस रंगावर तळा.
एअर फ्रायर वापरायचा असल्यास हातावर असे वडे करून अॅलु.फॉलीच्या छोट्या तुकड्यांवर ठेवा. किवा डोनट मोल्डला तेलाने ब्रश करून घ्या व त्यात वड्याचे मिश्रण घाला. डोनट मोल्ड मध्ये वडे घालताना पीठ थोडे पातळ हवे.
१८० अंश से वर ए फ्रा प्रिहिट करा.
वडे आधी ९ मिनिटे ए फ्रा करा. मग ते बाहेर काढा, मोल्ड मधून ताटलीत उपडे करा. ते घट्टसर झालेले असतील. त्याला ब्रशने ऑइल ग्रिझिंग करा आणि आता मोल्डशिवाय वडे अजून ५ मिनिटे ए फ्रा करा, उघडून पहा. लागल्यास अजून एखाद दोन मिनिटे एअर फ्राय करा.
सांबारासाठी:- तुरीची डाळ २ वाट्या,
२ ते ३ चमचे सांबार मसाला (मला एमटीआर सांबार पावडर आवडते), १ चमचा तिखट, १ लाल सुकी मिरची,
१ मध्यम कांदा,१ लहान टोमॅटो, दुधी भोपळयाचा वाटीभर फोडी होतील एवढा तुकडा ,एक लहान वांगे,२ शेवग्याच्या शेंगा, हवा असल्यास १ लहान बटाटा, मीठ चवीनुसार,
फोडणीचे सामान,१/२ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ,थोडा गूळ(ऑप्शनल)
डाळ शिजवून घ्या.डाळीबरोबरच शेंगाही शिजवा. तेलावर खमंग फोडणी करून घ्या,त्यात लाल मिरची ,कांदा घालून परता,सांबार मसाला व तिखट घालून परता. कांदा जरा गुलाबी झाला की इतर भाज्या घालून परता.शेंगा घाला. झाकण ठेवून एक वाफ आणा. चिंचेचा कोळ व डाळ घाला, पाणी घालून हवे तसे पातळ करा. उकळी आली की मीठ व हवा असल्यास गूळ घाला. खळखळून उकळू द्या.
चटणीसाठी:- १ वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी डाळं, ४-५ हिरव्या मिरच्या, पेरभर आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर
चटणीसाठीचे सगळे पदार्थ थोडे पाणी घालून वाटा.. दही किवा ताक घालून सरसरीत कालवा.
वरुन तेल, मोहरी, उडीदडाळ, कढिपत्ता यांची फोडणी घाला.


वाचने
14490
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो बघूनच तृप्त! झक्कास!!!
तोंडाला पाणी सुटले !!!!
+१ तोंडाला पाणी सुटले !!!!
मस्त! धन्यवाद!
डोनट मोल्डचा वापर करून वडे केले. ते बरे झाले, पण चांगले नाही. म्हणून मग परत दुसर्या मोल्ड मध्ये करून पाहिले. ते छान झाले.दुसरा मोल्ड कुठला वापरला? त्याचा दुवा मिळेल? आणि खात्री करून घेण्यासाठी:१८० अंश से वर ए फ्रा प्रिहिट करा. वडे आधी ९ मिनिटे ए फ्रा करा. मग ते बाहेर काढा, मोल्ड मधून ताटलीत उपडे करा. ते घट्टसर झालेले असतील. त्याला ब्रशने ऑइल ग्रिझिंग करा आणि आता मोल्डशिवाय वडे अजून ५ मिनिटे ए फ्रा करापहिल्यांदा एअर फ्राय करतांना मोल्डसकट करायचं ना? (म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हनला धातू चालत नाही तसा काही निर्बंध फ्रायरला नसावा....) आता एअर फ्रायर घेण्याचा प्लॅन प्रत्यक्षात आणायलाच हवा असं वाटायला लागलंय, गृहस्वामिनीकडून शिव्या न खाता परवानगी मिळवण्याचा काही सोपा मार्ग आहे का? ;-) स्नॅपडील वर ४००० रुपयांपासून पुढे बरेच ऑप्शन्स दिसताहेत.मोल्ड
In reply to मस्त! धन्यवाद! by बहुगुणी
आधी पहिल्या चित्रातले मोल्ड
In reply to मस्त! धन्यवाद! by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to आधी पहिल्या चित्रातले मोल्ड by स्वाती दिनेश
तोंपासु च!
वा!
निषेध!
वाह !!!
ए फ्रा मध्ये वड्यांची कल्पना,
मस्त!
हम्म
हा.. हा..
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
+ १
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
मस्त आहे रेसेपी
एअर फ्रायर घेतलाच पाहिजे आता
एअर फ्रायर घेतलाच पाहिजे आता
खूपच मस्तं.
छोटी मॉडिफिकेशन आणि हीच रेसिपी चायनीज मध्ये कन्व्हर्ट करा
मस्त