Skip to main content

काय होणार आपले??

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 12/02/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमूळे पाकिस्तान हा एक वादग्रस्त विषय झाला होता. त्यात पाकिस्तानाने निर्माण केलेल्या विध्वंसक अणूऊर्जा-निर्मित शस्त्रांबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल? अ) भारत- पाकिस्तान युध्दात पाकिस्तानाचा सर्वनाश होईल. ब) भारत-पाकिस्तान युध्दात भारताचा सर्वनाश होईल. क) भारत-पाकिस्तानामधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही देशात सौख्य निर्माण होईल ड) भारत-पाकिस्तान अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील. ई) भारत-पाकिस्तान युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल. काहीही झालं तरी शेवटी आपलीच माणसे हकनाक मारली जातील.

वाचने 8556
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

खरोखर भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. पण नुसतं 'आलीया भोगासी असावे सादर' असे न म्हणता अनिष्ट घटनांना विरोध केला गेला पाहिजे. आज भारताला हे युध्द मिटवायचे आहे. कदाचित पाकिस्तानालाही मिटवायचे असेल, पण नाक खुपसणा-यांच्या चिथावणीमुळे युध्द व मतभेद आजही टिकून आहेत हे खरे.

अमेरिका चीन जपान कुणीतरी ह्याचा फायदा घेईल कदाचित......

In reply to by नितिन५८८

भलताच आशावाद बुवा. त्या विन्ग्रजांनी १५० वर्ष राज्य करण्या आधी एकाच होते कि? कोण घाबरले ? कोणी पण येवून टप्पू मारून जातंय.

In reply to by बॅटमॅन

काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
कोणीतरी म्हटले आहे-- मला अमर कर असा वर मनुष्यप्राणी देवाकडे मागू शकत नाही. मग त्यावर उपाय काय? तर मला याची देही याची डोळा पॅलेस्टाईन, काश्मीर आणि बेळगाव हे तीनही प्रश्न सुटलेले बघायचे आहेत :)

In reply to by बॅटमॅन

मिपावरही बरेच न सुट्टणारे (आणि बिचारे मिपाकर त्यातूनही न सुटणारे ) प्र्शन आहेत की??? त्यांचं काय करायचं (साठे तुमचा मुलगा काय करतो या चालीवर वाचा)

In reply to by नाखु

काही होणार नाही. जान्हवी एकदाची बाळंत झाली की सर्व प्रश्न सुटतील. "अनंतकाळची स्युडोमाता" हा किताब बाकी तिला एकदम परफेक्ट लागू पडेल.

In reply to by बॅटमॅन

आयला ती शिरेल एक काय संपायला तयार नाही. २ वर्षामागे जानेवारीत २१ इंची सीआरटी टीव्ही बिघडला म्हणून नवीन ३९ इंची एलईडी टीव्ही घेतला होता. पहिल्याच दिवशी हट्टंगडी काकू एकदम क्लोजअप मधे दिसल्या. एव्हढ्या भल्यामोठ्या टीव्हीवर हट्टंगडी काकू ईतक्या क्लोजअप मधे बघून घाबरलो. त्यांचा फक्त चेहराच दिसायचा अख्ख्या टीव्हीत. टीव्ही घेतल्या दिवशीच गंडला का काय असा विचार करून रात्र भर झोप नाही आली. दुसर्‍या दिवशी सकाळीच दुकानदाराला फोन केला. तो म्हणाला एकतर सीआरटीचा स्क्रीन रेशो ४:३ असतो, एकदम एलईडीचा १६:९ बघायची सवय नसते आणि त्यात शिरेलिंंमधे नको इतका क्लोजअप असतो. एखादा ईंग्लिश पिच्चर चेक करा. तसं चेक केल्यावर कळलं - काही गंडलेलं नाही :) तोपर्यंत मात्र हट्टंगडी काकूंनी घाबरवून दिलं होतं :)

In reply to by गॅरी ट्रुमन

मला सलमान खानच्या लग्नात मनमोहन सिंगजींशी गप्पा मारायच्या आहेत असं पण ऐकलेलं - कधीही पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांमध्ये.

२००८ पासून आता २०१६ आला तरी काहीच झाले नाही, तर पुढे कुठले काय होणार ?

'भाग्यसंकेत' या भविष्याला वाहिलेल्या दिवाळी अंकाचे संपादकीय वाचले. त्यानुसार २०१६ पासून फक्त भारतच नव्हे, तर जगभर अराजक माजणार. पुण्याच्या श्रीराम भटांनी लिहिले आहे.

नास्त्राडेमसनी पुर्वी असेच काहिसे भाकित केले होते , त्याचे पुढे काय झाले ?

In reply to by नाव आडनाव

शेजारच्यांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना करवत नाही. अर्थात हे "उत्तमे ढमढमे" मधले अणुबाँब की "फुस्कुली राणी" वाले अणुबाँब असतील त्यावर नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे म्हणा.