
प्रत्येक घरात किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांच्यात प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास पदार्थाची खासियत असते. काकूच्या हातचे काही, मामीच्या हातचे काही, आजीचे काही.. न संपणारी यादी. बरेचदा मग सवयीने आपल्याला तो पदार्थ त्याच व्यक्तीच्या हातचा आवडतो, अशीच आमच्या समस्त गोतावळ्यात 'श्रीखंडाच्या वड्या' हा माझ्या आईच्या काही पेटंट पदार्थांपैकी एक. आता याचा शोध तिला कसा लागला आणि ती कशी शिकली, याचीही कथा रोचक आहे. घराजवळच राहणारी एक आजी, तिच्या ओळखीतल्या कुणी एक काकू या वड्या करायच्या आणि विकायच्या. त्या काही पाककृती सांगायच्या नाहीत, कारण त्याना त्यांचा कॉपीराईट वाटत असावा किंवा ते त्यांचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्या सहजी देत नसाव्यात. मग आता प्रयत्न करायचा म्हणून आई आणि आजी, या दोघींनी ठरवले की हा प्रकार शिकू या. आपल्याला काही या विकायच्या नाहीत, पण यायला हव्यात. मग दोघींनी प्रयोग सुरू केले. अगदी वाटीभर चक्का आणायचा आणि करून बघायचे. मग या प्रयोगात त्या कधी सपशेल बिघडल्या. कधी थोड्या जमल्या, तर कधी परफेक्ट जमल्या. असे करत करत काही वर्षात दोघींचाही हात बसला आणि मग काही वेगळे करायचे असेल तर या वड्या करायला सुरुवात झाली. मग श्रीखंडाच्या वड्या म्हणजे आईच करणार असे आमच्या घरात समीकरण झाले. ज्यांच्यासाठी हा प्रकार नवीन असतो आणि आवडतो - विशेषतः गोडघाशी मंडळी - त्यांच्याकडून मग नेहमीच वाहवा मिळते आणि आईला समाधान. पण यात गंमत अशी की माझ्या जिभेचे आणि या वड्यांचे काही कधी जमले नाही. मी नावाला एखादी वडी खायचे फक्त. त्यामुळे घराघरात ऐकावे लागणारे "एवढ्या मेहनतीने करायचे आणि हिचे नखरे" हे मीही ऐकून घ्यायचे आणि अजूनही घेते. किंबहुना आता जास्तच ऐकावे लागते, कारण… जावयाला हा प्रकार भयंकर आवडला. तेव्हापासून तर विचारायलाच नको. त्यामुळे प्रत्येक वेळी "जावई येती घरा, श्रीखंडाच्या वड्या करा" हे कसोशीने पाळले जाते. आग्रहही केला जातो आणि येताना 'त्याला आवडतात ना, मग घेऊन जा जास्तीच्या' असे ऐकून चार वड्या जास्तच डब्यात भरल्या जातात. तर अशी ही यामागची कहाणी.
आजवर या प्रकाराच्या वाट्याला मी कधी गेले नव्हते. मुळातच वड्या, लाडू हे प्रकार अवघड वाटतात. पण रुची अंकातला '
अन्नपूर्णेचा वारसा' वाचून आई, मामी यांचे जे पदार्थ आठवले, त्यात हाही आठवला. मग ठरवले की प्रयत्न करू या, जमल्या तर देऊयात दिवाळी अंकात. आता जमले हे तुम्हाला लक्षात आले असेलच. तर बघा पुढे साहित्य आणि कृती.
साहित्य :
चक्का - १ वाटी (मला इथे चक्का मिळत नाही. दह्याचा चक्कासदृश एक प्रकार मिळतो, पण तेही तसेच्या तसे वड्यांना उपयोगी नाही. म्हणून ते आणून स्वच्छ कपड्यात बांधून ठेवले आणि सगळे पाणी काढून मग तो चक्का वापरला.)
साखर - २ वाट्या (दिवाळी आहे, जरा जास्त गोड चालतं ;) )
वेलदोडा (वेलची) पूड
थोडी पिठीसाखर, मिश्रण कोरडे होऊन वड्या थापण्यासाठी सोपी म्हणून (मी घेतली नाही, त्याऐवजी चमचाभर तूप वापरले)
सजावटीसाठी केशर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप.. यातले काहीही आवडेल ते.
कृती:
चक्का आणि साखर एकत्र करून गरम करायला ठेवा. सतत ढवळत राहा.

मिश्रण जरा घट्ट झाले किंवा बुडबुडे येऊ लागले की चमच्यावर घेऊन हाताने अंदाज घ्या. ते हाताला कोरडे लागले पाहिजे किंवा कढईच्या कडा कोरड्या होताना दिसल्या पाहिजे. हे झाले की गॅस बंद करा आणि बाजूला घेऊन पुन्हा तेवढ्याच पेशन्सने ढवळत राहा. हे फार महत्त्वाचे, कारण जर जास्त वेळ गॅसवर राहिले, तर जास्त कडक होतात. त्यापेक्षा गॅस थोडा आधी बंद करून नंतर जास्त वेळ ढवळले तर चालते किंवा थोडे कमी झाले तर एकवेळ मऊ वड्या खाता येतात. वेलदोडा (वेलची) पूड घाला. आता घट्ट गोळा होईल असे वाटले की एका ताटलीत पिठीसाखर भुरभुरवा किंवा तूप लावा. त्यावर हे मिश्रण ओतून सेट होऊ द्या. वरूनही थोडी पिठीसाखर लावू शकता, म्हणजे त्या पटकन कोरड्या होतात.

व्यवस्थित गार झाले की वड्या पाडा. आपल्या आवडीप्रमाणे सजवा. श्रीखंडाच्या वड्या तयार आहेत.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!!
फोटो सौजन्य - नवरा

क्या बात, वाहवा !! आधीचं
वाह मस्तच, आवडता पदार्थ
हं,श्यामच्या आईची आठवण झाली
अप्रतिम सादरीकरण
श्रीखंडाच्या वड्या अगदी
मस्त !! शेवटचा सादरिकरणाचा
झकास सादरिकरण.करणार..
ओहो
पारंपारिक रेशिपी दिल्याबद्दल
छान रेसेपी , शेवटचा फोटो झकास
छान!
भारी दिसतायत वड्या. मी कधी
व्वाह! आमच श्रीवर्धन आठवल
वा! खुमासदार वर्णन वाचून आणि
चवदार,बहारदार रेसिपी !!!
क्लास
मस्त, मस्त!!
वाह, मस्तं यम्मी वड्या.
सुंदर!
वा!!!
In reply to वा!!! by सुमीत भातखंडे
खूप आवडायच्या या गोळ्या!
आई गं!! खत्री दिसतायेत वड्या.
तोंपासु!
श्रीखंडाच्या वड्या
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamमस्त दिसताहेत वड्या.करुन
छानच !!
वाचक आणि प्रतिसादकांचे
पाकृ आवडली. माझ्या एका
In reply to पाकृ आवडली. माझ्या एका by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद. नवीन प्रकार कळले.
आ हा !
छान
वाह!
_/|\_
सुंदर!