यापॅकी नाही ला मत दिले आहे. याचे कारण खिचडी म्हटल्यावर माझ्या डोळ्यापुढे मुगाच्या डाळीची खिचडी येते.
एक किस्सा आठवला -
मागे एकदा मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती (नाही नाही गुरुवार, एकादशी वगैरे काही नाही. सहजच बनवली होती). खाउन झाल्यावर माझ्या एका वैदर्भिय मित्राने म्हटले, "साबुदाण्याची उसळ चांगली झाली होती".
मी पटकन म्हणालो, "अरे उसळ नाही ती, खिचडी आहे".
नंतर झालेल्या चर्चेतून मला झालेले ज्ञान असे - मुंबई-पुण्यात (किंवा कोंकण-प. महाराष्ट्र म्हणूयात) साधाराणपणे एखादी डाळ + तांदूळ एकत्र शिजवलेल्या पदार्थास खिचडी असे म्हणतात (अपवाद साबूदाण्याचा). विदर्भात असा अपवाद केला जात नाही. तांदूळ नसलेल्या अशा पदार्थास उसळ म्हटले जाते.
अवांतर - तसे खिचडी शब्द वाचून बिरबलाचीही आठवण येते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सकाळी खिचडी खायची आहे म्हणले तर साबुदाणा खिचडी डोळ्यासमोर येते आणि रात्री जेवायला खिचडी आहे म्हणले की खिचडी भात.
खाण्याचा संदर्भ नसताना खिचडी असा उल्लेख आला तर काही तरी गडबड झाली आहे असे डोळ्यासमोर[ध्यानात] येते.
खिचडी म्हटले की आमच्या डोळ्यासमोर पांथंस्ताने बनवलेली कोळंबीची खिचडी येते.
http://www.misalpav.com/node/4578 येथे पहा.
तुमच्याही खिचडीच्या आधीच्या संकल्पना गळून पडतील आणि फक्त हीच खिचडी डोळ्यासमोर दिसेल.
कवटी
खरतर आधी मला खिचडी म्हणल तर फक्त आणि फक्त साबुदाण्याची भरपुर शेंगदाण्याचे कुट घातलेली आईने बनवलेली खिचडीच दिसायची डोळ्यासमोर (आणि तोंडात लिटरभर लाळ)
लग्न झाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली आहे. खिचडीभात देखील येतो डोळ्यास॑मोर :D
ह्या दोन्हीला मत देणे शक्य नसल्याने मी यापैकी काहि नाहीला मत दिले आहे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मला खिचडी म्हणल्यावर १९७७ सालचा जनता पक्ष डोळ्यासमोर येतो! :D
हल्लीचे डाव्यान्च्या आभार उपकारावर तगलेले केन्द्रीय सरकार देखिल खिचडीसारखेच वाटते :) काही हरकत? :P
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
पहिल्या पानावर सगळे कौल आणायचा चंग बांधला की काय मॅडम ?
बहुदा आपण "कौलाराम काढणे" ह्याचं कोणतंतरी पुस्तक वाचलंय आणि त्यामुळे आपलं हृदयपरिवर्तन झालंय !
असो :)
-(उत्खणण मत्री सोणमचा फॅन) टार्या
चालूद्या. आजकाल लोकांची आवडनिवड बदललेली आहे साहेब. मग आपणच मागे का?
हे घ्या : http://www.misalpav.com/node/9436
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
प्रतिक्रिया
पर्याय ३
पर्याय एक
In reply to पर्याय ३ by सुनील
साबूदाण्याची उसळ आणि सांबार...
In reply to पर्याय ३ by सुनील
हाच किस्सा
In reply to पर्याय ३ by सुनील
पर्याय २
असेच म्हणतो!
In reply to पर्याय २ by पांथस्थ
वेळवर अवलंबुन
खिचडी
खिचडीची संकल्पना!
In reply to खिचडी by कवटी
खरतर आधी
मला वाटतं -
In reply to खरतर आधी by झकासराव
साबुदाणा खिचडी ...
मला
आपल्याला तर बॉ
पहिला
पहिल्या
In reply to पहिला by सोनम
चालूद्या.
In reply to पहिल्या by टारझन