मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाह्नवे! येशिल बाळंतून?

स्वामी संकेतानंद · · दिवाळी अंक
. . (प्रेरणा :- पाखरा! येशिल का परतून?) जाह्नवे! येशिल बाळंतून? महत्प्रयासाने, किती मास झाले ते अठवून? जाह्नवे! ||१|| सेटवर मिसळलेल्या श्रीच्या निःश्वासा वळखून? जाह्नवे! ||२|| टाळशील अजून किती दिवस 'काहीही हं' म्हणून? जाह्नवे! ||३|| थांब, मोजू दे एपिसोड हे झाले किति पाहून! जाह्नवे! ||४|| टीव्ही उघडता मज दिसे ही डोहाळ्याची खूण! जाह्नवे! ||५|| विसरशील तू, पण प्रेक्षकच म्हणती तुला 'जपून!' जाह्नवे! ||६|| घे आताच कळा शेवटच्या चार ज़रा सोसून! जाह्नवे! ||७|| -- स्वामी संकेतानंद -- ('बाळंतून'सारखा मराठी शब्द नाही हे माहीत आहे, पण मालिकांमधला एकूणच कृत्रिमपणा अधोरेखित करायला हा शब्द निर्मिला आहे.) .

वाचने 22279 वाचनखूण प्रतिक्रिया 30

आतिवास Tue, 11/10/2015 - 14:53
जमलीय आता कदाचित एक एपिसोड या गाण्यात घालवतील.

मारवा Wed, 11/11/2015 - 11:15
तुमची कविता धाडली तर न जाणो तात्काळ बाळंतेल हो जान्हवी म्हणजे तुमच्या कवितेच्या धक्क्याने कधी कधी अस ऐकलय एक धक्काच पुरेसा असतो........ ते देण्याच काम तुमची कविता करेल अन तमाम महाराष्ट्र तुम्हाला दुवा देइल.

पैसा Wed, 11/11/2015 - 12:49
=)) तुला ही सीरियल बघायची वेळ का बरे आली?

श्रीरंग_जोशी Fri, 11/13/2015 - 10:34
लैच खतरा भाष्य केले आहे रे स्वाम्या. कुणीतरी या कवितेचा दुवा या मालिकेच्या निर्माता दिग्दर्शकांपर्यंत पोचवण्याची कृपा करावी. मालिका तर कधी पाहिली नाही. पण सतत फिरत राहणार्‍या विनोदांमुळे ती काय पोचलेली मालिका असेल याचा अंदाज येतो. श्री मी नव्हेच फेम - रंगा.

शब्दबम्बाळ Fri, 11/13/2015 - 17:59
डिरेक्ट प्रसंगच उभा राहिला ना डोळ्यांसमोर भाऊ! महाएपिसोड मध्ये गायक मांडी घालून, एक हात कानावर ठेऊन दुसरा हात शक्य तितका हवेत हलवून, एक डोळा बंद करून, दुसर्या डोळ्यावरची भुवई किंचित तिरपी करून, चेहऱ्यावर अत्यंत आर्त भाव आणून शेवटच्या कडव्यात जान्हवीला आवाहन करतोय आणि दुसरीकडे कित्येक भाग इस्पितळात कळा सोसत असलेली जान्हवी त्याच्या आर्जवाना प्रतिसाद देऊन अखेर बाळन्तिण होतेय आणि त्रिभुवनात पुष्प वृष्टी होतेय... देवांच्यात उगीच कुजबुज: लास्ट टाइम १०० कौरव याच्यापेक्षा लवकर जन्मले होते नै!

In reply to by मारवा

नाखु Sat, 11/14/2015 - 09:49
स्वामी कुर्नीसात बाकी बाण राव काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे?? उगा आपली (बारीक) शंका.

In reply to by नाखु

मदनबाण Tue, 11/17/2015 - 16:43
@ मारवा थांकु... :) @ नाखुराव काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे?? माहित नाय बाँ... पुतण्याच्या चिंतेची पोझ असावी का ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी

चौकटराजा Fri, 11/13/2015 - 20:53
जेंव्हा टी आर पी कोसळेल सपाटून तेंव्हा येईन मी बाळ्न्तून आपली जानू