Skip to main content

दहशतवादाचे कूळ आणि मूळ

सोमवार, 16/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का? थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते... असे असताना , त्याला कुवेत वर आक्रमण करण्याची दुर्बुद्धि सुचली आणि तेलाच्या राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी टपलेली अमेरिका ताबडतोब इराकवर तुटून पडली ... बरे त्यातून इराकी सैन्याला माघारी ढकळल्यावर अमेरिकेचे काम संपलेले असताना सूडबुद्धीने "सद्दाम हा क्रूरकर्मा हुकूमशहा असून त्याच्याकडे बायोकेमिकल वेपन्स आहेत " असा कांगावा अमेरिकेने जगभर केला (जो की नंतर खोटा असल्याचे उघड झाले !कारण टी जैवरासायनिक शस्त्रे कधीच सापडली नाहीत , ब्रिटिश मंत्र्यांनी याची कबुली दिलेली आहे) तर येनकेन प्रकारेण सद्दाम ला शत्रू ठरवून अमेरिकेने त्याला संपवले... त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद सगळे उपाय केले . बंडखोर अतिरेकी संघटनांना पैसा आणि शस्त्रे पुरवली. ( जे अमेरिकेने तालिबानसोबत आधी अफघणिस्तान मध्ये देखील केलेले होते , रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनेच तालिबान ला पैसा आणि शस्त्रे पुरवली होती ) हाच प्रकार सीरिया /लिबिया आणि अन्य ठिकाणी देखील केला ... पण आपले ईप्सित साध्य झाल्यावर इराकची पुनर्बांधणी करून त्या देशात सुव्यवस्थित शासनव्यवस्था अन शांतता नांदेल याची जबाबदारी घेण्याचे मात्र अमेरिका टाळत आली आहे. म्हणजे आधी अतिरेक्यांच्या साथीने देश बेचिराख करायचा अन मग हात वर करायचे ! ही हरामखोरी अमेरिका नेहमीच करीत आलेली आहे . म्हणूनच मी मागे तृतीय विश्वायुद्धासंबंधीच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे दहशतवाद -विरोधी युद्ध बेगडी आहे आणि त्यांचे हेतु शुद्ध नाहीत . आज इराक /सीरिय व अन्य भागात अमेरिकेच्या पैशानेच उभे राहिलेल्या अतिरेक्यांची सुधारित आवृत्ती म्हणून "आयसीस" उभे राहिले असून हा दहशतवादाचा भस्मासुर थांबवणे आता महाकर्मकठीण बनले आहे... पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !

वाचने 9661
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !
हे मोदींना कोणीतरी समजावयास हवे.

In reply to by याॅर्कर

जर रशीयाचा उघड शत्रु इस्त्राएल मोदींचा समर्थक/मदतनीस आहे तर मोदी रशियासोबत गेलेले कसे दिसतील ? तसेही अमेरीकेवर जोरदार अणूहल्ला होत नाही तो पर्यंत जगात काड्या करायची अमेरीकेची खोड मोडली जाणार नाही आणी हे जेंव्हा होइल तेंव्हा अमेरिका जो जोरदार प्रतिहल्ला करेल त्यात कोण वाचेल ? अमेरीका हे सर्वात सुसज्य अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे हेच त्यांचे प्रमुख सामर्थ्य बाकी आर्थीक ताकत वगैरे वगैरे दादागीरीसाठी निव्वळ पुरक गोष्टी आहेत.

विषय ठिक, पण मध्यपूर्वेचा सर्व आधूनिक इतिहासातील युरोमेरीकन ढवळाढवळ पहिल्या महायुद्धात ओटोमन (आताच्या तुर्कस्थानातले) साम्राज्य कोसळल्या नंतर सुरु झाली त्याच काळात इराक मधील मोसूल प्रांतात तेल मिळताच ब्रिटीश आणि फ्रेंचांनी इराक आणि सिरीया मधील सिमांच्या वाटाघाटी कशा केल्या, इझ्राएलात ज्युंना नेऊन बसवणे वगैरे सगळेच हैराण करणारे आहे. १) पहिल्या महायुद्धोत्तर ओटोमन साम्राज्य तुटताना इराक आणि सिरीया त्यांच्या पद्धतीने लावण्याचा फ्रेंच ब्रिटीशांनी प्रयत्न करून पाहीला तो स्थानिक बाथीस्ट चळवळींच्या हातात हे देश जाऊन फसला. हि बाथीस्ट चळवळ गांधींनी राजकारणात धार्मीक स्पिरीच्युआलीझम ला महत्व देतानाच सत्ता आणि धर्म याच्या फारकत करण्याची भूमिका काँग्रेसच्या माध्यमातून घेतली आणि सोशीआलीझमचा स्व:तचा फंडा जसा राबवला तशीच काहीशी फिलॉसॉफी बाथीस्टांची होती फक्त रेफरन्स इस्लामीक स्पिरिच्युआलीझमचा होता. जोडीला पॅन अरेबीझम धार्मीक अंगाने नव्हेतर भाषिक कारणांनी सर्व अरबांचा एकच देश असावा अशी फिलॉसॉफी जी प्रत्यक्षात राबवता आली नाही तिही होती. इजिप्तच्या नासेरांचीही साधारणता अशीच भूमिका होती. हि सर्वमंडळी नेहरुंसोबत अलिप्त देश चळवळीत होती. इजिप्त सिरीया आणि इराक मधील राजकारणात आणि भारतीय काँग्रेस मध्ये दोन फरक दिसतात ते म्हणजे त्या तीन देशांनी त्यांचे राजकीय पक्ष केवळ विचारवंतांचे म्हणून जोपासले म्हणजे सामान्य माणसाची पक्षातील एंट्रीवर रोक आला ज्याचा पक्षांतर्गत एकाधिकारशाही अधिक प्रमाणात जोपासली गेली, दुसरा फरक काँग्रेसने अनेकपक्षीय लोकशाही जोपासली टोकाचे विचार असलेले कम्युनिस्ट भाजपा असो वा मुस्लीम लिग स्वतंत्र भारतात यांनाही राजकारणात सहभागी होता आले ते इजिप्त, सिरीया आणि इराक मध्ये तेथील राज्यकर्त्यापक्षांनी दाबले. जो पर्यंत तुम्ही सत्ता उपभेगून पहात नाही तो पर्यंत सत्तेत नसलेल्या विचार प्रणालीचे आकर्षण वाढत जाऊ शकते. तसे पाहता इंग्रज प्रोतेस्टंट असतात स्वतः ख्रिश्चनांमधली कडवी मंडळी किंवा अरबस्थानातील ओमान घ्या मुस्लीमांमधली खरी कडवी असूनही हे दोन्ही देश बाकी धर्मीय अथवा देशांशी डिल करताना तेवढा कडवटपणा दाखवत नाहीत, काही शहाणपण सत्तेनेच येत असते, सत्तेत भाजपा आलीतरी काद्यांने डोळ्यात पाणी आणले की जनता भाजपाला पाय उतार करते, कम्युनीस्ट टांटांची बाजू घेताना कम्युनीस्ट नसलेला पक्ष आम्ही शेतकर्‍यांना अधीक चांगले रिप्रेझेंट करतो म्हणून निवडून येऊ शकतो कम्युनीस्टांना पाय उतार व्हावे लागते हे सगळे लोकशाही मार्गाने होते. आणि नेमके तेथेच स्वतःची राजकीय व्यवस्था राबवताना इजिप्त, सिरीया, इराक, आमेरीकेच्या हस्तक्षेपामुळे इराण येथील व्यवस्था चुकत गेल्या त्यांनी मल्टीपार्टी सिस्टीम न राबवल्याने असंतुष्ट घटकांना सत्तेत संधी नाही मिळाली की जमिनीखाली अदृष्यमार्गे असंतोष धुमसत राहतो आणि ती दबलेली वाफ संधी मिळताच कुठून ना कुठून बाहेर पडते. हि वाफ दाबली जाण्याला बराक ओबामांची निती जबाबदार वाटत नाही पण बाहेरुन इंजिनीअरींग करून मल्टीपार्टी डेमॉक्रसी ही लादता येत नाही हे ही ओबामांच्या नेतृत्वाने लक्षात न घेता तिथल्या चळवळींना मदत करण्यात प्रमाणाच्या बाहेर जाऊन उत्साह दाखवला का अशी शंका वाटत राहते ? (असाच काहीसा अती उत्साह भारताने नेपाळच्या बाबातीत अलिकडच्या इतिहासात दाखवलेला दिसतो) २) बर्‍याचदा मोठ्या संघर्षस्थितीत पॉलीटीकल आणि धार्मीक भाषिक सगळेच दिखाऊ असू शकते. तेलाचा आणि इतरही नैसर्गीक साधनसामग्रीचा विचार केल्यास वापरकर्त्या देशातील जनतेचा त्यावर प्रत्यक्ष कंट्रोल नसतो ते स्वकमाईचा पैसा मोजत असतात आपले ग्राहक जी नैसर्गीक साधसामग्री वापरतात त्यावर कंट्रोल व्यापारी वर्गास हवा असतो, व्यापारी वर्गास स्वतःच्या व्यापाराच्या सुरक्षेपुरती शांतताही हवी असते त्यासाठी व्यापारी वर्ग बर्‍याचदा शांततेच्या सद्भावी व्यक्तींची पाठराखणही करताना दिसतो. विरोधाभास असा की त्याच व्यापारीवर्गातला एक गट कोणत्याही परिस्थितीत व्यापार आपल्या फायद्यात रहावा म्हणुन व्यापारी फायदा अधिक फायद्यासाठी गुंतवत राहतो हे करताना राज्यकर्ते राजकारण मिडीया सर्वांना गुंडाळले जाते. सांगण्याच तात्पर्य अस की इथे आमेरीका देश म्हणून पाहून चालत नाही त्या पडद्यांमागे असलेले व्यापारी हितंसबंध जे बर्‍याच सहज उघड होत नाहीत. आपल्या देशातील लोक सोने वापरतात पण आपले व्यापारी युरोमेरीकनांप्रमाणे सोन्याच्या खाणींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाहीत तेथेही युरोमेरीकनांचे साम्राज्य आहे, कांगो देशात अतिरेक माजवून त्यांना सोन्यासाठी कसं लूटल गेल याचा एक रिपोर्ट आत्ताच वाचत होतो. सिरीया आणि इराक मध्ये इसिसच्या ह्युमन राइट रेकॉर्डवर टिकाकरूनही इसिसचा तेलाचा व्यापार उत्पन्न चालू आहेच हे तेल कस आणि कोण विकत घेत आहे त्यांच्या आजूबाजूच्या लँड बाऊंड्रीवरून जाऊन जाऊन किती तेल जाईल बाकीची तेलाची टंकर्स समुद्र मार्गेच जात असण्याची शक्यता नाही का ? तिथे युनो सहीत युरोमेरीकनांचाच प्रभाव नाही का ? त्यांच्या पर्यंत शस्त्रास्त्रे कशी पोहोचताहेत ? सगळच गोंधळात टाकणार आहे.

इतक्यात पाहण्यात आलेले एक बोलके चित्र

आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !
आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश स्वत;चे हितसंबंध जपत असतो आणि रशीया सुद्धा त्यांच्या हितसंबंधाचिच काळजी घेत असतो या पलिकडे त्यांच्याही भूमिकेकडे कितपत पाहता येईल या बद्दल साशंकताच आहे.

In reply to by माहितगार

ह्याबाबतीत काहीच दुमत नाही माहितगार जी, फ़क्त एक सुचवतो की जी हार्डपॉवर ग्लोबल लेवल वर कॉमन मिनिमम प्रोग्राम ची बहुसंख्य तत्वे कवर करेल ती अन तिची कारवाई अधिक विश्वासर्ह मानल्यास काही गैर नसावे नाही का? अमेरिकन इतिहास पाहता सर्वात मोठा टेरर फण्ड प्रोवाइडर तोच आहे असे दिसते अर्थात अमेरिकेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असा नाहीच असला तर तो मिनिमम हेजिंग प्रोग्राम मात्र आहे असे माझे वैयक्तिक मत पड़ते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भारत आमेरीकेच्या जवळ गेला की रशिया लगेच पाकीस्तानला जवळ करतो असे जवळ करण्यापुर्वी पाकीस्तानानल्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची अट रशिया सुद्धा घालत बसत नाही, तेही एवढ्या वर्षांची दीर्घ मैत्री असून; जगभरातल्या अतिरेक्यांकडून वापरल्या जाणार्‍या मशिनगन्स मध्ये रशियन कलाश्निकोव्हांचाही भरपूर मोठा वाटा असावा.

In reply to by माहितगार

एक तांत्रिक बाब, कलिशनिकोव ओरिजिनल खुप कमी आहेत बहुसंख्य आहेत ते ग्रे मार्केट क्लोन्स आहेत, बाकी रशियाने पाकिस्तान कधी न कसा जवळ केला हे थोड़े विस्ताराने सांगितले तुम्ही तर वाचायला नक्की आवडेल मला

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाकी रशियाने पाकिस्तान कधी न कसा जवळ केला हे थोड़े विस्ताराने सांगितले तुम्ही तर वाचायला नक्की आवडेल मला +१११

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इंग्लिश विकिपीडियवर लेख आहे Pakistan–Russia relations त्यात Improvement in relations हा भाग पहा. In 2010, Prime Minister Vladimir Putin of Russia stated that Russia was against developing strategic and military ties with Pakistan because of Russian desire to place emphasis on strategic ties with India. हि प्रोइंडीया भूमिका २०११ पासून बदलत पाकीस्तानसाठी सॉफ्ट होत चालल्याचे त्या नंतरच्या विसृत विवेचनावरून दिसेलच. त्यातील "''...This was seen as an improvement in ties as Russia's longtime ally India moved towards US. Pakistan, Russsia signs a landmark defence deal in 2015. This deal includes sale of four Mi-35 ‘Hind E’ attack helicopters to Pakistan..''" हे लक्षात घेण्यासारखे असतात. शेवटी म्हणण्याचा मतितार्थ की राजकारणात आणि आंतराराष्ट्रीय राजकारणात नक्कीच कुणीही कायमचे मित्र अथवा कायमचे शत्रु नसतात, इंटरेस्ट-हितसंबंधांवर तेथील राजकारण अवलंबून असावे.

In reply to by माहितगार

विकिपीडिया दिसणारी सर्व माहिती हि आधारभूत नसते नॉट reiable...आंतरराष्ट्रीय राजकारण हे वव्यवहारावर आधारित असते.थोडक्यात तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला मित्र हजार.

In reply to by आरोह

आंतरराष्ट्रीय राजकारण हे व व्यवहारावर आधारित असते.थोडक्यात तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला मित्र हजार.
सहमत होय मला वाटते मी सुद्धा तेच म्हणतो आहे. रशिया सुद्धा स्वतःचा व्यवहारच पहाते एवढाच माझा पॉइंट. सध्या आमेरीकेचे पुतीन आणि सिरीयाच्या राष्ट्राध्यक्षाशी सख्य नाही. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र असे साधे सरळ गणित तेथे आहे. बाकी प्रथम दर्शनितरी संबंधीत विकिपीडिया लेख पुरेशा संदर्भांसहीत असावा. मी प्रतिसादातून प्रश्न विचारल्यामुळे तत्काळ संदर्भासाठी विकिपीडिया लेख वापरला तरी आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी बाबत माझ्या संमातर स्वतंत्र वाचनानेही तसेच मत होते आणि आहे की रशिया मागील २-४ वर्षांपासून पाकीस्तानला जरासा सॉफ्ट होत चालला आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कलिशनिकोव च्या निर्मित्यानी भारतातील खाजगी शेत्रातील कंपन्यांच्या सोबत भारतात उत्पादनासंबंधी बोलणी करत आहेत. रशिया पाकिस्तानच्या जवळ जाण्यास मर्यादा आहेत ह्याचे एकमेव कारण रशिया व भारतातील व्यवहार चोख व रोख आहे तर अमेरिका व पाकिस्तान मधील शस्त्र करार हा खैरातीवर अवलंबून असतो. रशियाने पाकिस्तानला अमेरिका नाकारत असलेले तंत्रञान देण्याचा प्रयत्न भारत पूर्ण होऊ देणार नाही, भारताचे आजही रशियाशी अनेक सामरिक संबंध आहेत व मेक इन इंडिया साठी रशियाने भारतात यावे ह्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील आहे. रशिया व पाकिस्तानच्या संबंधांच्या बाबतीत अजून एक महत्वाचे म्हणजे अफगानिस्तान सिरीया व इराण विषयी त्यांचे विचार जुळत नाहीत रशिया शिया पंथीय राष्ट्रांना पाठीना देतो तर पाकिस्तान सुन्नी पंथीय अरब राष्ट्रांना त्यांच्या कडून मदरसे व पाकिस्तानी अर्थ व्यवस्थेला नेहमीच मदत मिळते. जेव्हा भारत अमेरिका व इजरैल च्या जवळ अधिक जाईल तेवढे भारतावर दबावतंत्र म्हणून रशिया पाकिस्तान च्या जवळ जाईल , पाकिस्तानी लष्कर व काही विचार्वात अश्या जवळकीने खुश होत आहेत कारण अमेरिका व भारत जवळ येत आहेत, मात्र जनता व धार्मिक नेते ह्यांच्यात विशेष उत्साह दिसून येत नाही जो चीन बाबतीत नेहमीच दिसून येतो. पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

यांची परराष्ट्र नीती पाहिली तर त्यात समतोल किंवा Balance या तत्वाला प्राधान्य दिलेलं आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धात अमेरिकेने भारताला आणि सोविएत रशियाने चीनला मदत केली होती. १९६५ च्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने पाकिस्तानला आणि रशियाने भारताला मदत केली होती पण खूपच कमी. १९७१ च्या युद्धाच्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी अमेरिकेपासून दूर जाण्याचा आणि सोविएत रशियाशी मित्रत्व वाढवण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यामागे निव्वळ भारत-पाकिस्तान युद्ध किंवा बांगलादेश हे कारण नव्हतं. तेव्हा चीन आणि रशिया यांचे संबंध बिघडलेले होते आणि चीन-अमेरिका-पाकिस्तान असा त्रिकोण बनू पाहात होता. अमेरिकन अध्यक्ष निक्सन चीनला भेट देणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. या सगळ्या पार्श्वभूमीला छेद गेला तो अफगाणिस्तानात १९७९ मध्ये सोविएत फौजा घुसल्यावर. अमेरिकेने रशियाला झुंजवून दमवण्यासाठी आणि रशियाची अर्थव्यवस्था जर्जर करण्यासाठी अफगाणिस्तानात भरमसाट पैसे आणि शस्त्रास्त्रं ओतली. त्यातून अल कायदा आणि तालिबान या दोघांचा जन्म झाला. पुढे गोर्बाचेव रशियाचे राष्ट्रप्रमुख झाल्यावर त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जी पावलं उचलली त्यातून पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळल्या अाणि शेवटी १९९१ मध्ये सोविएत युनियनचंही पतन झालं. त्यामुळे अमेरिकेला आणि भांडवलशाही बाजाराधिष्ठित पद्धतीला पर्याय उरला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धार्मिक कट्टरवाद आणि दहशतवाद या गोष्टी अलगद जाऊन बसल्या. १६४८ साली (चूभूद्याघ्या) झालेल्या वेस्टफालिया कराराने State या संकल्पनेचं श्रेष्ठत्व आणि सर्वसमावेशकत्व अधोरेखित केलं होतं. आताच्या दहशतवादाने State या संकल्पनेला अाव्हान देऊन एक वर्तुळ पूर्ण केलं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

युके सुद्धा भांडवलशाहीच समर्थक होते आणि आहे (आमेरीकेपेक्षा अधिक पुण्यवान असे म्हणावयाचे नाही) तरीपण त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य व्यवहारात अल्पसा संयम जाणवतो कदाचित दीर्घकाळ जगावर राज्य करण्याचा अनुभव असल्यामुळे असेल, आमेरीकन उत्साह चटकन ओसंडावयास लागतो आणि उद्देश आणि मर्यादांचे कुठेतरी उल्लंघन होऊ लागते. कदाचीत आमेरीकन प्रेसिडेंशीअल सिस्टीममध्ये प्रेसिडेंटशीप चार वर्षांचीच असते आणि त्याच्या आत रिझल्ट देण्याची या प्रेसिडेंट मंडळींना घाई पडते का ? रेगन बूश आणि बराक ओबामांचे काम वेगळ्या दिशेचे लोकशाही चळवळींना पाठबळ देण्याचे असले तरी त्यातही घाई थोडी अधिकच वाटते. इराक मधून अफगाणीस्तानात जावयास नकोहोते गेलात तर काम पुर्ण करून अजून वीसवर्षांनी बाहेर पडलेतरीही चालते. हस्तक्षेप केला तर व्यवस्थीत तरी करावा, त्यांचा दुसर्‍या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीतला हस्त़क्षेप दीर्घकालीन होता कि ज्याने त्या दोन्ही देशांना स्टॅबिलिटी दिसते. इतरत्र मात्र त्या दृष्टीकोणाचा अमेरीकन व्यवहारात अभाव वाटतो. लोकशाहीसाठी मिरवणूक निघाली की लागलीच सत्ता परीवर्तनाची घाई कशा साठी ?

In reply to by माहितगार

युके आणि संयम ..... युके ची भांडवलशाही अर्थव्यवस्था ही वसाहतवादाच्या रोपट्यावर बांडगुळ म्हणून अनेक शतके पोसल्या गेली, दुसरे महायुद्ध संपतांना वसाहतवाद सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेले. वेस्ट जर्मनी जपान ह्या वसाहतवदशिवाय व्यापार करणे ठाऊक होते त्यात अमेरिका युद्ध काळात बलवान झाली होती तेव्हा युके मागे पडली. त्यांनी मग बॉंड शिनेमातून जगातील कोणत्याही समस्येवर नैतिक तोडगा काढण्याचा मक्ता स्वताकडे ठेवला. कालांतराने अमेरिकन बटिक अशी स्वतःशी कुकीर्ती मिळवली इयु शी चार हात लांब ठेवल्याने जर्मनी फ्रेंच ह्यांची युरोपियन बाजारपेठेवर जसे नियंत्रण ठेवले तसे युके ला करता आले नाही डेविड आल्यापासून त्याने अमेरिकेशी चार हात लांब राहायचे ठरून इयु च्या जवळ जायचे ठरवले व जगाशी स्वतः संबंध वाढवायचा ठरवला. इराक अफगाण युद्धात त्यांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली व परत युके मध्ये जिहादी तत्वे वाढली त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली. लंडन मध्ये बॉंब ब्लास्ट झाले. तेव्हा कुठे त्यांना उपरती झाली दोन्हीकडून सैन्य माघारी बोलावले , लिबिया व सिरीया पासून ते म्हणूनच चार हात लांब आहेत. पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

दहशतवादाचे कूळ आणि मूळ काही विशिष्ट वाळवंटी पंथांत आहे. अमेरिकाही अशाच एका वाळवंटी पंथाच्या अतिरेकास बळी पडलेली आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समस्या आहेत, समस्यांना नाकारण्याचा उद्देश नाही, बाळाला आंघोळ घालून जे घाण पाणी फेकतो त्यासोबत निरपराध बाळ फेकले जात नाही याची काळजी घेणे महत्वाचे. एखाद्या मानवी समूहावरील मिथके आणि त्याअनुषंगाने येणार्‍या शब्दप्रामाण्याचा 'तत्कालीन' प्रभाव असणार्‍यांचा प्रभाव यावर अवलंबून असते किंवा कसे, इराण मधला सर्वधर्मसमभाव सांगणारा बहाई धर्म, इजिप्त, इराक, सिरीयातील नासेरीयन अथवा बाथीस्ट सेक्युलॅरीझम किंवा ओमानचे इतर धर्मीयांशी सलोखा (आपल्या भाषेत समरसता) हे तिथल्या तिथल्या मातीतच जन्मले आहेत. दुर्दैवाने इराण, इजिप्त, इराक, सिरीया या चारही जागांची वासलात लागण्यात अमेरीकेच्या अतीउत्साह कारणीभूत आहे. त्यांच्या प्रतिक्रीयावादास ब्रिटन आणि आमेरीकेने कृत्रीमपणे केलेले राजकीय हस्तक्षेपसुद्धा अल्पांशानेका असेनात कारणीभूत आहेत, (ह्याने अतिरेकाचे समर्थन होते असे नाही) पण ह्या तथ्यांचा अगदीच विसर पडला असेही होऊ नये असे वाटते.

In reply to by माहितगार

असं कसं, असं कसं? आपलं काय ठरलंय..? "जो जो मुस्लिम तो तो दहशतवादीच" हे पक्के ध्यानात ठेवा. त्यांच्यात सहिष्णु हा प्रकारच नसतो हो. तुम्ही सांगताय ते बहाइ, इत्यादी कपोलकल्पित गोष्टी आहेत. दंतकथा, भाकडकथा आहेत. खरे ते एकच चित्र, माणसाच्या गळ्यावर सुरी फिरवणारे, बॉम्बने स्वतःला, इतरांना ऊडवून देणारे, तोंडावर कापडं बांधलेले, हातात तलवार, बंदुका असलेले, तेच ते, कुराणातल्या भडक आयती, सर्व कुराण फक्त 'गैरमुस्लिमांना मारा' हे एवढं एकच वाक्य एक लाख वेळा लिहिलेलं पुस्तक आहे. ते मानणारे सर्व मुस्लिम तसलेच. अमेरिका सांगते ना.. मग खोटे कसे असेल?

अमेरिकेच्या नावाने ओरड्नार्यांना इसीस चा फुल फोर्म माहित नाही का ? त्याचं उद्दिष्ट , त्यांचा हेतू काय आहे जर स्पष्ट करून सांगता का भाऊ ? इस्लामिक स्टेट , खलीफाच राज्य ह्याच्याबद्दल जर उलगडून सांगाल का ? अमेरिका , रशिया कोणाच्या घरी जावून आमंत्रण देत नाही आमची शस्त्र विकत घ्या म्हणून . ह्या गोष्टी मुस्लिम राष्ट्रांतच का घडतात ? इतर धर्मीय राष्ट्रांमध्ये का नाही ? कारण शस्त्रांचा वापर सर्वाधिक कोणाकडून होईल हे उघड आहे . हा हल्ला म्हणजे म्लेंछ संहार होण्याची वेळ आली आहे ह्याचच द्योतक आहे

In reply to by तुडतुडी

ज्या अमेरिकेचे तुम्ही गोडवे गात आहात ना ताई , त्या अमेरिकेसारखा संधिसाधु देश दुसरा नसेल. मढयाच्या टाळूवरचे लोणी खाणे हां प्रकार अमेरिका वास्तवात करून दाखवते. पेंटागॉन हे फ़क्त अमेरिकन संरक्षण खाते नव्हे तर शस्त्र निर्मिती देखील करते. अमेरिकेचे हित ते जगाचे हित हे जगाला पटवले जाते. बुशच्या विरोधात उभ्या राहिलेल्या अल गोर या नेत्यांने अमेरिकन जनतेला आपण किती प्रदूषण करत आहोत व् कशाप्रकारे जंगले नाहीशी करत आहोत हे एका डोक्युमेंटरी द्वारा पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण बुशनी अमेरिकेच्या हिताच्या आड़ येणाऱ्या अशा सर्व गोष्टीचा विरोध केला होता. अमेरिकन जनतेची मानसिकता यापेक्षा वेगळी नाही. पाकिस्तान त्याला मिळणाऱ्या मदतीचा उपयोग दहशतवाद्याना पोसण्यासाठी करतो हे गुपित नाही राहिले आहे. ९/११ चा भीषण हल्ला करुन अमेरिकेची पुंगी वाजवण्याऱ्या लादेनला पाकिस्तानने आश्रय दिला होता. तरिही अमेरिका पाकिस्तानला मदत करते. का?

In reply to by तुडतुडी

=)) =)) =)) अजुनही भारतातीयांच्या हा म्लेंछप्रकार अस्तित्वात आहे तर...

दिड शहाने युरोपिअन मुस्लिम निर्वासितांना आसरा देत आहेत,आज गरज आहे म्हणून घुसलेली ही पिलावळ उद्या जिहादच्या नावाखाली तिथे थैमान घालणार नाही कशावरुन?? सर्व मुस्लिम देशांना तंत्रज्ञान, वैद्य्कीय मदद , आर्थिक मदद जगाने नाकारली पाहीजे...... let force them to stone age,then they will have no guns no weapens no technology to use against the world

आयसीस पुर्वीच्या दहशतवादी संघटनांपेक्षा कैकपटीने जास्त घातक आहे. १- त्यांच्या कडे अनेक मार्गांनी कमवलेला पैसा तेलविक्री ते अ‍ॅन्टीक वस्तु/मुर्ति विक्री ते ड्र्ग्ज विक्री अनेक मार्गांनी फार मोठा फंड आयसीस ने जमवलेला आहे. याचा गैरवापर करुन अनेक कारवाया त्यांना प्रत्यक्षात आणता येतात. २-क्रौर्याच्या बाबतीत आजपर्यंतची सर्वात क्रुर संघटना माणसे मारण्याचे अगदी भयावह क्रुर रीतीने माणसे मारण्याच्या मेथड्स त्यांनी विकसीत केलेल्या आहेत. ज्याने फार मोठी भीती त्यांनी निर्माण केलेली आहे. ३-यात विशेष म्हणजे ७० % पेक्षा अधिक तरुण २४ वयाच्या आतले च आहेत. आणि विशेष बाब म्हणजे अनेक युरोपियन अमेरीका आदी देशांतील तरुण ही ही संघटना जॉइन करत आहेत. यापुर्वी इतक्या विवीध देशांतुन इतके सभासद कुठल्याच अतिरेकी संघटनेला मिळालेले नाहीत. ४-सर्वात मोठा धोका त्यांनी उपलब्ध फंडद्वारे एखाद्या पाकीस्तान सारख्या अस्थिर कडुन अण्वस्त्रे विकत घेण्याचा आहे. हे संपुर्ण जगाच्या द्रुष्टीने फारच विनाशकारी अशी शक्यता सर्वात वाईट अशी शक्यता आहे.

In reply to by मारवा

यापुर्वी इतक्या विवीध देशांतुन इतके सभासद कुठल्याच अतिरेकी संघटनेला मिळालेले नाहीत.
भविष्यात हेच त्यांचं कमकुवत स्थान ठरेल कदाचीत.

नदीचे मुळ आणि साधूचे कुळ शोधू नये असे म्हणतात. तसेच दहशतवादाचे कुळ आणि मुळ शोधू नये. त्यामुळे खालील गोष्टी घडतात - १) दादा दरेकर (आत्ताचे मोगा ? ) आणि तर्राट जोकर सारखे लोक मिपावर धुमाकूळ घालतात. २) त्यांच्या कृपेने आपण सर्वांस नवीन इतिहास समजतो. ३) इस्लाम मधील शांततावादी आणि माणुसकीच्या तत्वांचा ( पोट धरून हसण्याची स्मायली ) फुकटात प्रसार केला जातो. ४) सगळी भानगड अमेरिकेने करून ठेवली आहे. आपण म्हणजे धुतल्या तांदळासारखे स्वछ आहोत असा प्रसार केला जातो. ५) धागा शंभरी ओलांडतो आणि नंतर वाचनमात्र केला जातो. ६) अल्प संख्याकांच्या (खरच आहेत का हो ते ?) भावना दुखावतात. ७) खान्ग्रेसी लोकांची वोट बँक कमी होते. आणि MIM ची वाढते. ८) देशात असहिष्णुता वाढू लागते. ९ ) लोक पुरस्कार परत द्यायला सुरवात करतात.

In reply to by बाप्पू

१०) स्पा भौं च्या घराजवळील ईमारत कोसळते ११) थेटरात टग्यांची संख्या फोफावते १२) पॅरिस मधे हल्ले होतात १३) बंडूची उपासमार होते १४) काहीजं सेकंड हनीमून करायला जातात आणखी बरेच काही होते...

ज्या दिवसही जगात रशिया कडे सुद्धा अणु बॉंब आला व क्षेपणास्त्रे आंतरखंडीय बनली तेव्हा शीत युद्ध जोमात चालू झाले कारण प्रत्यक्ष युद्ध म्हणजे काही मिनिटात खेळ खलास तेव्हा रशिया व अमेरिका ह्यांना नवीन मित्र जमविण्यासाठी व त्यासाठी एकमेकांवर कुरघाडी करण्यासाठी दोन्ही देशांच्या हेर संस्थांनी अनेक देशातील चळवळींना पाठीन्वा देत पैसे शस्त्र प्रशिक्षण दिले त्यामुळे जगात अनेक ठिकाणी सीमेचे प्रश्न अजून चिघळले. व अनेक राष्ट्रात अतिरेकी संघटनांनी पाया रोवला. अफगानिस्तान मध्ये रशिया आल्यावर धर्मांची नशा त्यातून येणारे कडवेपण व त्यातून निर्माण होणारा दहशतवादाने रशिया मोडला तेव्हापासून त्याचा उपयोग अनेक देशात बडी राष्ट्रे आपापल्या फायद्यासाठी करतात. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे बड्या देशांचा शस्त्रत्रांचा व्यापार ह्या व्यापारात बड्या देशातील खाजगी शेत्रातील शस्त्र बनविणाऱ्या कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय झाल्या त्यांचे अर्थ संकल्प हे छोट्या राष्ट्र्यांच्या अर्थ संकल्पाहून मोठे झाले. आता कोक पेप्सी जशी भारतात जाहिरात करतात तशी अमेरिकन विमाने व शस्त्रात्रे आपल्या उत्पादनाची जाहिरात करू शकत नाही एकतर जगातील कोणतेही सरकार स्वतःच्या रक्षणासाठी शत्रे विकत घेतात, तेव्हा स्वताचे रक्षण करावे असे एखाद्या राष्ट्रा वाटण्यासाठी त्या राष्ट्राला असुरक्षित वाटणे आवश्यक असते. मग बड्या देशांची हेर संस्था प्रसार माध्यमे व सरकार दोन देशातील भांडणे वाढवते त्याला फूस देते मग दोन्ही देशांना शत्रे विकली जातात भारत व पाकिस्तान अनुक्रमे रशिया व अमेरिकन शास्त्रात्रानी युद्धे लढतात . लिबिया मध्ये फ्रेंच लढाऊ विमाने बॉंब हल्ले करतात व भारताला तुम्ही आमच्यासोबत हवाई इतिहासातील सर्वात महागडा सौदा केला ती विमाने कशी गुणाची आहेत हे पुराव्याने शाबीत केले जाते. द्रोण तंत्रान्यांची जाहिरात करण्यासाठी पाकिस्तानात त्यांचे प्रात्यक्षिक केले जाते. त्यामुळे जो पर्यंत शस्त्रत्रांचा बाजार ह्या जगात आहे तेथे छुपे युद्ध दहशतवादाच्या स्वरुपात नेहमीच चालू राहणार आनंदाची गोष्ट भारतीयांच्या साठी अशी कि आता आपण ग्राहकांची भूमिका सोडून मेक इन इंडिया च्या अंतर्गत संरक्षण शेत्रात स्वावलंबी होणार आहोत व पुढे कदाचित आपण सुद्द्धा अमेरिका रशिया फ्रांस ब्रिटन जर्मनी व चीन सारखे अव्वल शस्त्र विक्रेते होऊ ते होण्यासाठी अजून १५ ते २५ वर्षांच्या कालावधी आहे. चीन शत्र विक्रेता होतांना आम्ही झोपा काढत होतो, आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

@भंकस बाबा . मी अमेरिकेचे गोडवे गात नाहीये ओ . अमेरिका हा संधीसाधू देश आहे हे मलाही माहित आहे . पण इसीस ची निर्मिती केवळ अमेरिका, रशिया विरोधात झालेली नाहीये . त्यांचा मुख्य उद्देश सोडून आपण चर्चा वेगळ्याच अंगाने करत आहोत . आपला माल विकण्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी कोणीही प्रयत्न करणारच . पण खरेदी करणार्याला समजायला नको का . तुम्ही जे म्हणताय ते बरोबरच आहे . त्यात वादच नाही . पण माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत . अमेरिका , रशिया , इस्राइल पापी . आपण मात्र नैतिक , धुतल्या तांदळासारखे स्वछ असा खोटा प्रचार मुस्लिम राष्ट्रांकडून करण्यात येतोय . नाण्याच्या दुसर्या बाजूवरही चर्चा व्हायला हवी . @बाप्पू -. १ नंबर बोललात बघा .
धागा शंभरी ओलांडतो आणि नंतर वाचनमात्र केला जातो.
ह्याची तक्रार मी सुधा केली होती पण उत्तर द्यायचं सुधा सौजन्य सं. मं कडे नाहीये . आता नीलकांतलाच सांगणारे .

मूळ विषय- या जरतरच्या गोष्टी झाल्या तरी असे झालेच नसते असेही नाही. अरब क्रांतीच्या वादळात इतर हुकुमशहासारखे कदाचित सद्दाम हुसेन यांचे सिंहासनही कोलमडले असते.
तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते.
लोकप्रिय नेता होता आणि त्याने जनतेला सुखाचे दिवस दाखवले, असे म्हणता येणार नाही. उत्तरेकडच्या कर्द लोकांना आणि दक्षिणेकडच्या शियांना (इराकमध्ये बहुसंख्यांक असलेल्या) त्यांनी वारंवार ठेचले. एवढेच म्हणता येईल, की बाथ पार्टीचे असल्यामुळे सुन्नी असूनही त्यांनी मूलतत्त्ववादी शक्तींना फोफावू दिले नाही. पण तरीही हुकुमशाही राजवट टिकवण्यासाठी पंथातल्या तेढीचा फायदा करून घेतला. अमेरिकेच्या धोरणाबाबत मात्र सहमत. मध्यपश्चिम आशियातल्या प्रत्येक देशाची दुखणी वेगवेगळी आहेत आणि अमेरिकेने त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी योग्य तेव्हा, योग्य तसा उपयोग करून घेतला आहे.
आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !
रशिया, इराण आणि सिरीया अशी मैत्री आधीपासून आहे. (पुतीन आता इराणमध्ये पोहोचलेय.) सीरियाचे काय करावे, हे गणित अमेरिकेला सोडवणे अवघड झालेय. असादांना विरोध तर करायचा, पण ते जावेत असेही मनापासून वाटत नाही. त्यामुळे रशियाने यात उडी घेतल्यावर थोडीफार बोंबाबोंब करून अमेरिका शांत बसली.