Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 12/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, छायाचित्रणकला स्पर्धेच्या १४व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रवेशिका व स्पर्धेसाठी नसलेली छायाचित्रेही एकाहून एक होती. मत नोंदवणार्‍या अनेक मिपाकरांनीही हीच भावना व्यक्त केली आहे. तृतीय क्रमांक मिळाला आहे, मिनियन यांच्या येलोस्टोन तलावाच्या छायाचित्राला. द्वितीय क्रमांक मिळाला आहे, फोटोग्राफर243 यांच्या पुण्याजवळील एका जलाशयाच्या छायाचित्राला. अन प्रथम क्रमांक मिळाला आहे, स्पा यांच्या 'राजगडावरील एक तळे' या छायाचित्राला. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. ता.क. छायाचित्रणकलेच्या पुढच्या भागाची घोषणा लौकरच करण्यात येईल. ---------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3802
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

स्पा, फोटोग्राफर243 व मिनियन यांचे अभिनंदन. शक्य असल्यास या छायाचित्रांबाबत तपशीलवार लिहावे. म्हणजे छायाचित्रकाराच्या नजरेतून वाचकांना तेच चित्र बघता येईल.

वा! या स्पर्धेच्या निमित्ताने एकाहून एक अप्रतिम छायाचित्रे पहावयास मिळाली याबद्दल सर्व स्पर्धकांचे आणि 'जलाशय' हा विषय सुचवणार्‍या श्रीरंग यांचे मनःपूर्वक आभार!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, लवकरच माहिती टाकतो...